Home LATEST NEWS ताजी बातमी NEET परीक्षेची नवी तारीख NTA ने केली जाहीर, जाणून घ्या नेमकी कधी...

NEET परीक्षेची नवी तारीख NTA ने केली जाहीर, जाणून घ्या नेमकी कधी होणार?

15
0

Source :- BBC INDIA NEWS

NEET परीक्षा आता 21 जूनला होणार

फोटो स्रोत, Getty Images

Published 12 मे 2026

अपडेटेड 23 मिनिटांपूर्वी

वाचन वेळ: 4 मिनिटे

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने भारत सरकारच्या मंजुरीनंतर NEET (UG) 2026 ची पुनर्परीक्षा रविवार, 21 जून 2026 रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

पेपर फुटीचे आरोप होत असतानाच एनटीएने 3 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली NEET (UG) 2026 परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच, ही परीक्षा पुन्हा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

एनटीएने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करताना म्हटलं होतं, “हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून आणि ज्या विश्वासावर आपली राष्ट्रीय परीक्षा प्रणाली आधारलेली आहे, त्या विश्वासाचा मान राखून घेण्यात आला आहे.”

“पुन्हा परीक्षा आयोजित केल्यामुळे उमेदवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना निश्चितच मोठा आणि प्रत्यक्ष त्रास सहन करावा लागेल, याची संस्थेला पूर्ण जाणीव आहे. एनटीए या त्रासाकडे अत्यंत गांभीर्याने पाहत आहे”, असंही एनटीएनं नमूद केलं होतं..

X पोस्टवरून पुढे जा

परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी ‘स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा’.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

मजकूर उपलब्ध नाही

Xवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

तपास संस्थांनी एनटीएला तपासातील निष्कर्ष सांगितल्यानंतर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला. यानंतर एनटीएनं या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राखली जावी यासाठी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं होतं.

तपासातील निष्कर्षावरून ही सध्याची परीक्षा प्रक्रिया कायम ठेवणे योग्य ठरणार नाही, हे सिद्ध झाले आहे, असंही एनटीएनं नमूद केलं होतं.

नाशिक पोलिसांनी काय सांगितलं होतं?

नाशिक शहर पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी सांगितलं होतं, “सकाळी राजस्थान पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेण्याविषयी विनंती आली होती. त्याप्रमाणे त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. .”

“क्राइम ब्रांच युनिट 2 च्या पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतले आहे. या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचं पथक येणार आहे. ते पथक आल्यावर या आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात येईल,” अशी माहिती त्यांनी दिली होती.

“आरोपीने त्याचा वेश बदलला होता, केस कापले होते. त्यामुळे त्याची माहिती मिळत नव्हती. मात्र, तांत्रिक कौशल्य आणि जिकिरीने तपास करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं,” असंही त्यांनी नमूद केलं होतं.

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

एनटीएने परीक्षा पुन्हा आयोजित करण्याबाबत म्हटलं होतं की, “ही परीक्षा पुन्हा कधी आयोजित केली जाईल याच्या तारखा आणि नव्याने जारी केल्या जाणाऱ्या प्रवेशपत्रांचे वेळापत्रक यासह पुढील सर्व सूचना, एजन्सीच्या अधिकृत माध्यमांद्वारे जारी केल्या जातील.”

“उमेदवारांनी आणि पालकांनी केवळ या अधिकृत माध्यमांवरच विश्वास ठेवावा आणि समाजमाध्यमांवर प्रसारित होणाऱ्या, खात्री नसलेल्या बातम्यांकडे किंवा वृत्तांकडे दुर्लक्ष करावे,” असं आवाहन एनटीएनं केलं होतं.

दरम्यान, यानंतर या प्रकरणी आणखी दोन जणांना अटक करण्यात आली. सीबीआय या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे.

शॉर्ट व्हीडिओ पाहा

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

SOURCE : BBC