Home जीवनशैली marathi Health Benefits of Blue Cheese : हाडांना लोखंडासारखा टणक करेल ब्लू चीज,...

Health Benefits of Blue Cheese : हाडांना लोखंडासारखा टणक करेल ब्लू चीज, खाण्याचे जबरदस्त फायदे

1
0

Source :- ZEE NEWS

चीजमध्येही तुम्हाला अनेक प्रकार मिळतील. आज आपण निळ्या चीजबद्दल म्हणजे ब्ल्यू चीजबद्दल जाणून घेणार आहोत. यूएस डिपार्टमेंट ऑफ ॲग्रीकल्चरच्या मते, ब्लू चीजमध्ये कॅल्शियम भरपूर असते, जे निरोगी दात आणि हाडांसाठी आवश्यक आहे. याच्या सेवनाचे इतरही अनेक आरोग्य फायदे असू शकतात. हे फायदे समजून घेऊया. 

आरोग्यासाठी फायदेशीर 

  • आहारात ब्ल्यू चीजचा समावेश करून हृदयविकाराचा धोका कमी करू शकता. सायंटिफिक वर्ल्ड जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, जे लोक नियमितपणे ब्ल्यू चीजचे सेवन करतात त्यांना ब्ल्यू चीजचे सेवन न करणाऱ्यांच्या तुलनेत हृदयविकाराचा धोका कमी असतो.
  • ब्लू चीज खाल्ल्याने तुमच्या कोलेस्ट्रॉलची पातळीही कमी होते.
  • ब्ल्यू चीजमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात. सूज आणि वेदना कमी करण्यासाठी ब्लू चीजचे सेवन फायदेशीर मानले जाते.
  • ब्ल्यू चीजमध्ये फॉस्फरस देखील आढळतो, ते खाल्ल्याने हाडे आणि दात मजबूत होतात.
  • ब्ल्यू चीजमध्ये प्रथिने आढळतात, त्याचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जा मिळते.
  • कॅल्शियम असल्यामुळे ब्ल्यू चीज खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. अशा प्रकारे सांधेदुखीचा धोकाही कमी होतो.
  • ब्ल्यू चीजचे सेवन केल्यास कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते आणि हृदयविकार कमी होतात.

(हे पण वाचा – आज जेवणात काय बनवलंय? भारतात चवीने खाल्ला जाणारा हा खाद्यपदार्थ जगातील सर्वात नावडता!) 

ब्ल्यू चीजचे साईड इफेक्ट्स 

  • ब्लू चीजमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. जर तुम्ही जास्त प्रमाणात सोडियमचे सेवन केले तर उच्च रक्तदाब, हृदयाच्या समस्या आणि सूज यासारखे आजार होऊ शकतात.
  • ज्या लोकांना लैक्टोज असहिष्णुता आहे त्यांना ब्लू चीज खाल्ल्यानंतर मळमळ, उलट्या, पोटदुखी आणि जुलाब यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते.
  • जर तुम्हाला मोल्डची ऍलर्जी असेल तर त्यामुळे पोट खराब होऊ शकते.

(हे पण वाचा – Bad Cholesterol ला मुळापासून दूर करण्यासाठी सकाळीच प्या ‘हा’ चहा, रात्रीपर्यंत दिसेल फरक) 

  • ब्लू चीजमध्ये मायकोटॉक्सिन असते. याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने पोटदुखी आणि जुलाब सारख्या समस्या उद्भवू शकतात.
  • ब्लू चीजमध्ये चरबीचे प्रमाण जास्त असते, ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या उद्भवू शकते.

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

SOURCE  ZEE NEWS