Home जीवनशैली marathi Cervical Cancer वॅक्सीन कसं काम करते? कोणत्या वयात आणि किती घ्याव्या?

Cervical Cancer वॅक्सीन कसं काम करते? कोणत्या वयात आणि किती घ्याव्या?

1
0

Source :- ZEE NEWS

Cervical Cancer: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतामरण यांनी गुरुवारी, 1 फेब्रुवारी 2024 रोजी नव्या संसदेमध्ये देशाचा 2024- 25 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. आगामी निवडणुकांच्या (Loksabha Elections 2024) धर्तीवर सादर झालेला हा अंतरिम अर्थसंकल्प असून, त्यामध्ये फार मोठ्या घोषणा अर्थ मंत्र्यांनी केल्या नसल्या तरीही अर्थमंत्र्यानी सर्व्हाकल कॅन्सरसंदर्भात मोठं विधान केलं आहे. 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी त्यांच्या अंतरिम बजेट 2024 चा भाग म्हणून 9 ते 14 वयोगटातील मुलींसाठी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविरूद्ध लसीकरणावर लक्ष केंद्रित करण्याच्या सरकारच्या योजनेबद्दल माहिती दिली. ही लसीकरण मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती आहे. 

कोणत्या वयात घ्यावी ही लस?

मुंबईच्या सायन रूग्णालयातील स्त्रिरोग विभागाचे डॉ. निरंजन चव्हाण यांनी सांगितलं की, “देशात सर्व्हाकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे रूग्ण आणि मृत्यूंची संख्या अधिक आहे.सरकारने बजेटमध्ये याचा विचार केला या गोष्टीचा आनंद आहे. सरकारच्या या निर्णयाने कर्करोगाला आळा घालण्यासाठी मदत होणार आहे. भारत नाही मात्र ऑस्ट्रेलिया सारख्या देशामध्ये ही लस पुरुषांना देखील देण्यात येते.”

चाळीशीनंतर घेता येईल का? 

ही लस 9-45 वयोगटातील महिलांना देण्यात येते, असं डॉ. चव्हाण यांनी सांगितलंय.

कोणत्या वयात घेतलेलं सर्वोत्तम?

डॉ. चव्हाण म्हणाले की, वयाच्या नवव्या वर्षापासून सध्या ही लस देण्यात येतेय.

चाळीशीनंतर घेता येईल का?

डॉक्टर चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार, 40 ते 45 वयोगटापर्यंत ही लस देण्यात येते. 

एकच घेतली तर चालेल का?

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, 1-2 डोस या लसीचे देण्यात येतात.

गर्भाशयाच्या कॅन्सरचं प्रमाण किती?

भारतात सर्व्हायकल कॅन्सरच्या रूग्णांची संख्या कमी नाही. गर्भाशय मुखाच्या कॅन्सर सर्वाधिक रुग्ण आढळणारा भारत हा पाचवा देश आहे. भारतात दरवर्षी सुमारे सव्वा लाख रुग्णांची नोंद होताना दिसतेय. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 75 हजार महिलांचा मृत्यू होत असल्याची नोंद आहे.‘एचपीव्ही’ उपप्रकाराच्या सततच्या संसर्गामुळे गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचा धोका अधिक आहे.

एचपीव्ही वॅक्सिन काय करते?

HPV लस सामान्यतः कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी वापरली जाते. ही लस दिल्याने HPV मुळे होणाऱ्या योनी, लिंग किंवा गुदद्वाराच्या कॅन्सरपासून संरक्षण मिळतं. ही लस जननेंद्रियातील चामखीळ किंवा गुठळ्या आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून देखील संरक्षण करते. 

SOURCE  ZEE NEWS