Home LATEST NEWS ताजी बातमी सार्वजनिक शौचालयांमध्ये आतल्या व्यक्तीचे पाय दिसतील अशी रचना का केलेली असते?

सार्वजनिक शौचालयांमध्ये आतल्या व्यक्तीचे पाय दिसतील अशी रचना का केलेली असते?

12
0

Source :- BBC INDIA NEWS


सार्वजनिक शौचालयांच्या डिझाईनमध्ये कालांतरानं बदल झाले आहेत

फोटो स्रोत, Getty Images

“ही काही अलीकडेच उदयास आलेली नवीन कल्पना नाही. ती अमेरिकेत बऱ्याच काळापासून अस्तित्वात आहे. तिथूनच इतर देशांनी देखील या कल्पनेचं अनुकरण केलेलं आहे.”

हे आर्किटेक्ट किंवा वास्तुविशारद किरणमयी यांनी दिलेलं उत्तर आहे. सार्वजनिक शौचालयांमध्ये बाहेरून आतल्या व्यक्तीचे पाय दिसतील, अशी रचना का केली जाते, या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिलं.

“याप्रकारे रचना केल्यामुळे शौचालयाच्या आत पुरेसं व्हेंटिलेशन राहतं. म्हणजे हवा खेळती राहते. त्याची स्वच्छता करणं सोपं असतं आणि अशी रचना कमी खर्चिकदेखील असते. शिवाय फरशी कोरडी राहते. हे या रचनेचे फायदे आहेत,” असं नागेश्वर राव म्हणाले.

ते हैदराबाद जिल्ह्यातील अनेक कार्यालयांमध्ये स्वच्छतेच्या कामकाजांचं व्यवस्थापन पाहतात.

विमानतळ, शॉपिंग मॉल, हॉस्पिटल, कॉर्पोरेट कार्यालयं, स्टेडियम आणि चित्रपटगृह यासारख्या गर्दीच्या ठिकाणी शौचालयांचे दरवाजे आणि जमीन म्हणजे फरशी यांच्यामध्ये एक छोटी फट किंवा मोकळी जागा ठेवली जाते. दरवाजा थेट फरशीला टेकलेला नसतो.

या शौचालयांमध्ये 3 बाजूंना फटी असतात. दरवाजाच्या वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूलादेखील फट किंवा मोकळी जागा ठेवलेली असते.

या शौचालयांमध्ये फक्त पाश्चात्य पद्धतीचे शौचकुप (वेस्टर्न टॉयलेट्स) असतात. त्यासाठी अतिशय कमी पाण्याचा वापर होतो.

आर्किटेक्ट किरणमयी म्हणतात की, शौचालयांच्या दरवाजांच्या वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला काही इंच मोकळी जागा किंवा फट ठेवण्याचे अनेक फायदे आहेत.

गणेश, बांधकाम उद्योगात सुपरवायझर म्हणून काम करतात. ते म्हणाले की आपात्कालीन परिस्थिती, देखभाल, स्वच्छता करणं आणि जिथे लोकांची अधिक वर्दळ असते, अशा ठिकाणी याप्रकारची रचना अत्यंत सोयीची ठरेल.

ही कल्पना कशी पुढे आली?

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या रचनेमध्ये काळानुसार बदल होत आले आहेत. जास्त-वर्दळीच्या ठिकाणी असणारी शौचालयं (टॉयलेट्स) आणि मुतारी (युरिनल्स) अधिक आधुनिक होत आहेत.

मेघना कन्नेकंडी अहमदाबादमधील सीईपी विद्यापीठात आर्किटेक्टच्या प्राध्यापिका आहेत.

मेघना म्हणाल्या की, इमारतीच्या बांधकामामधील बदल आणि अधिक चांगल्या सुविधा निर्माण करण्याचा भाग म्हणून काहींनी याप्रकारचं डिझाईन किंवा रचनेला अंतिम रूप दिलं आहे.

फ्रँक लॉईड राईट या प्रसिद्ध आर्किटेक्टनं 1903 ते 1950 दरम्यान न्यूयॉर्कमधील बफेलोमधील सुप्रसिद्ध लार्किन ॲडमिनिस्ट्रेशन बिल्डिंगसाठी हे डिझाईन वापरलं होतं.

फ्रँक लॉईड राईट फाऊंडेशनच्या वेबसाईटवर नमूद केलं आहे की, त्यांच्या अनेक उपक्रमांपैकी एका उपक्रमाचा भाग म्हणून शौचालयांचे अशा प्रकारचे दरवाजे नंतरच्या व्यावसायिक इमारतींसाठी एक सामान्य मानक (स्टँडर्ड) बनले होते.

अमेरिकेतील शौचालयासंदर्भातील कायदा

सध्याच्या या रचनेमुळे शौचालयांचा बांधकाम खर्च आणि देखभाल खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.

हे डिझाईन अमेरिका आणि कॅनडामध्ये विकसित झालं. आज ते जगातील अनेक देशांमध्ये सार्वजनिक शौचालयांसाठीचं एक स्टँडर्ड किंवा मानक बनलं आहे.

शौचालयांच्या दरवाजाच्या वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेमुळे हवा खेळती राहते

फोटो स्रोत, Getty Images

व्हीलचेअर वापरणाऱ्यांसाठी शौचालयं बांधण्यासाठी अमेरिकेच्या सरकारनं ‘अमेरिकन्स विथ डिसॅबिलिटीज ॲक्ट’ (एडीए) हा कायदा तयार केला होता.

या कायद्यामध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की, शौचालयांमधील पार्टिशन किंवा दोन शौचालयांमध्ये असणाऱ्या पॅनेलखाली आणि दरवाजांखाली एक फट किंवा मोकळी जागा असली पाहिजे.

या कायद्यात असंही म्हटलं आहे की, शौचकुप (टॉयलेट सीट) मुलांना बसता यावं इतकी आरामदायी असली पाहिजेत.

बांधकाम तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, अधिक वर्दळीच्या ठिकाणी अशाप्रकारच्या शौचालयांचे काही विशिष्ट फायदे आहेत.

आपत्कालीन परिस्थिती, सुरक्षा यासंदर्भातील फायदे

सार्वजनिक शौचालयं सर्वसामान्यपणे 3 फूट रुंद आणि 5 फूट लांब किंवा त्याहून कमी असतात. जर एवढ्या छोट्या जागेतील हवा आणि प्रकाश पूर्णपणे बंद केला. तर त्यातून अनेक समस्या निर्माण होतील.

जर अचानक वीजपुरवठा खंडित झाला, तर आत असलेले लोक घाबरू शकतात. जर जागा छोटी असेल, तर काहीजणांना चिंता आणि भीती वाटू शकते, असं मेघना म्हणतात.

मेघना कन्नेकंडी म्हणाल्या की बांधकाम क्षेत्रात खर्च कमी करणारे आणि सुविधा आणि आरामदायी नवीन डिझाईन उदयास येत आहेत

फोटो स्रोत, Meghana Kanneganti

पूर्णपणे बंदिस्त असणाऱ्या सार्वजनिक शौचालयांमध्ये ग्राफिटी, भिंतीवर चित्र काढणं आणि अमली पदार्थांचं सेवन यासारख्या समाजविघातक वर्तनाच्या घटना घडल्या आहेत.

पूर्वी, शौचालयं सर्व बाजूंनी बंद असायची. त्यामुळे त्यांच्या आतला भाग अनेकदा दमट आणि दुर्गंधीयुक्त असायचा.

या शौचालयांमध्ये लावण्यात आलेल्या पाईपमधून जी पाण्याची गळती होते, त्यामुळे दुर्गंधी निर्माण होऊ शकते, तसंच अपघात होऊ शकतात.

याव्यतिरिक्त, शौचालयाच्या आतल्या बाजूला जर एखादी आपत्कालीन किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली, तर फरशी आणि दरवाजा यांच्यामध्ये फट किंवा मोकळी जागा असल्यामुळे त्वरित मदत मिळू शकते.

अशा शौचालयांमध्ये जर दरवाजाचं लॉक तुटलं. तर कोणतीही काळजी न करता तुम्ही तात्काळ मदत मागू शकता. मात्र जर शौचालयांचे दरवाजे फरशीपर्यंत पूर्णपणे बंद असतील, त्यात कोणतीही फट नसेल, तर हे शक्य नसतं.

कमी खर्चिक आणि देखभाल करण्यास सोपे

अशाप्रकारची शौचालयं बांधकामाच्या ठिकाणी कुठेही बसवता येतात.

बांधकाम खर्चाचा विचार करता, ही शौचालयं कमी खर्चिक असतात. शिवाय त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवणंदेखील सोपं असतं. अशा शौचालयांचं काही नुकसान झालं, तर ती लगेच बदलता येतात.

शॉपिंग मॉल, चित्रपटगृह आणि विमानतळासारख्या ठिकाणी दररोज हजारो लोक जातात. त्यापैकी अनेकजण शौचालयांचा वापर करतात.


तज्ज्ञ आर्किटेक्ट म्हणतात की अशा शौचालयांचा बांधकाम खर्च कमी असतो आणि त्यांचं बांधकाम वेगानं पूर्ण करता येतं

फोटो स्रोत, Getty Images

शौचालयांचं अशा प्रकारचं डिझाईनं त्यांची वारंवार साफसफाई करण्यासाठी आणि त्यांना कोरडं व स्वच्छ ठेवण्यासाठी आदर्श असतं. त्यामुळे वारंवार वापर झाल्यावरही तिथे दुर्गंधी निर्माण होत नाही.

पूर्णपणे बंदिस्त असलेल्या शौचालयांमध्ये जीवाणू आणि इतर विषाणूंना आश्रय मिळतो, त्यांची तिथे वाढ होते. यामुळे दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. शौचालयं सर्व बाजूंनी बंदिस्त असल्यास, आतल्या बाजूला दमटपणा किंवा ओलावा निर्माण होतो. यामुळे कालांतरानं शौचालयांचे पॅनेल खराब होऊ शकतात.

मात्र, अशा शौचालयांचं डिझाईन, दरवाजांखाली जागा किंवा फट ठेवण्यासाठी तयार केलेलं असतं. त्यामुळे अशा समस्या कमीत कमी किंवा अल्प प्रमाणात असतात.

भरपूर हवा आणि प्रकाश असणारी वैशिष्ट्यपूर्ण रचना

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

सार्वजनिक शौचालयांचा वापर मोठ्या संख्येनं लोक करत असल्यामुळे ती अनेकदा ओलसर किंवा दमट होतात. जर तिथे पुरेशा प्रमाणात व्हेंटिलेशन नसेल म्हणजे हवा खेळती नसेल, तर त्यातून दुर्गंधी किंवा उग्र वास येऊ शकतो.

या शौचालयांच्या दरवाजांच्या खाली असलेल्या फट किंवा मोकळ्या जागेतून हवा खेळती राहिल्यामुळे ते लवकर सुकण्यास मदत होते. तसंच तिथे दुर्गंधी किंवा उग्र वास निर्माण होण्याची शक्यता कमी होते.

अशा प्रतिबंधात्मक व्यवस्थेमुळे इमारतीला आग लागल्यास लगेच शोध घेणं शक्य होतं.

या रचनेमुळे, तुम्हाला सहजपणे दिसतं की कोणतं शौचालय रिकामं आहे.

शौचालयाचा दरवाजा आणि फरशी यामधील फट किंवा मोकळ्या जागेमुळे तो दरवाजा न उघडता सफाई कर्मचाऱ्यांना फरशीची साफसफाई करता येते.

ज्या शौचालयांचे दरवाजे बंदिस्त म्हणजे फरशीला लागून असतात, त्यांच्या तुलनेत ही शौचालयं बांधायला आर्थिकदृष्ट्याही सोपी असतात, असं तज्ज्ञ म्हणतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC