Home मनोरंजन marathi विक्रांत मेस्सीचा कॅब चालकाला पैसे देण्यास नकार; संतप्त व्हिडीओ समोर, म्हणाला ‘इतके...

विक्रांत मेस्सीचा कॅब चालकाला पैसे देण्यास नकार; संतप्त व्हिडीओ समोर, म्हणाला ‘इतके पैसे असूनही…’

1
0

Source :- ZEE NEWS

Vikrant Massey Fights With Cab Driver : बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सी हा कायमच काही ना काही कारणांनी चर्चेत असतो. विक्रांत मेस्सीला ‘12th fail’ या चित्रपटामुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. आयपीएस पोलीस अधिकारी मनोज शर्मा यांच्या संघर्षावर आधारित असलेल्या या चित्रपटामुळे तो घराघरात पोहोचला. सध्या विक्रांत हा ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. आता विक्रांत मेस्सीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत त्याने एका कॅब ड्राईव्हरला पैसे दिलेले नसल्याचे समोर आले आहे. 

इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत एक कॅब ड्राईव्हर हा विक्रांत मेस्सीला किती पैसे झाल्याचे सांगताना दिसत आहे. त्यावर विक्रांत मेस्सी हा “मी जेव्हा निघालो तेव्हा ४५० रुपये दाखवत होते आणि आता जास्त दाखवत आहेत.” त्यावर तो ड्राईव्हर ‘तुम्ही हे पैसे देणार नाही म्हणजे’ असे म्हणतो. त्यावर विक्रांत मेस्सी “मी पैसे देणार, पण इतके कसे झाले”, असे परत बोलताना दिसतो. 

नेमकं प्रकरण काय?

‘माझे नाव आशिष आहे. मी एक कॅब ड्राईव्हर आहे. मी एका प्रवाशाला त्याच्या नियोजित ठिकाणी पोहोचवलेले आहे. पण आता तिथे पोहोचल्यानंतर तो व्यक्ती मला पैसे देत नाही. तसेच उलट तो प्रवाशी माझ्याशी वाद घालत आहे. तो मला शिव्याही घालत आहे’, असे तो कॅब चालक या व्हिडीओत सांगताना दिसत आहे. 

त्यानंतर तो हा प्रवाशी विक्रांत मेस्सी असल्याचे दाखवत आहे. यानंतर विक्रांत मेस्सी म्हणतो की “तू हे सर्व कॅमेऱ्यात का दाखवतोस? मी काय चुकीचं तर बोललो नाही. अचानक इतके पैसे कसे काय वाढले? हे अजिबात चालणार नाही.” यावर ‘का नाही चालणार सर यात माझी काय चूक आहे. हे सर्व अॅपची चूक आहे. त्यांची मनमानी आहे. माझं यात काहीही नाही’, असे तो ड्राईव्हर म्हणतो. यावर विक्रांत हा “मी तेच तुला सांगतोय की यात तुझी काहीही चूक नाही. हा सर्व अॅपचा मनमानी कारभार आहे. ही मनमानी मला पटलेली नाही. हे चुकीचे आहे”, असे म्हणतो. 

त्यावर तो ड्रायव्हर ‘सर तुम्ही इतके पैसेवाले आहात, तरीही उगाचच माझ्याशी वाद घालताय’, असे म्हणतो. त्यावर विक्रांत “हा पैसे असू दे नसू दे. माझे असू दे किंवा तुझे. पण ते मेहनतीचे आहेत आणि तुम्ही स्वत:च सांगता की हा अॅपचा मनमानी कारभार आहे. मग या गोष्टी अजिबात खपवून घेतल्या जाणार नाहीत”, असे त्याने म्हटले. सध्या विक्रांत मेस्सीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यावर अनेक नेटकरी कमेंट करताना दिसत आहेत. 

दरम्यान विक्रांत मेस्सी हा ‘12th fail’ या चित्रपटामुळे लोकप्रिय झाला. त्यापूर्वी त्याने ‘बालिका वधू’, ‘धरम वीर’, ‘बाबा ऐसो वर ढूंढो’ अशा मालिकांमध्ये काम केले होते. तसेच तो ‘छपाक’, ‘हसीन दिलरुबा’, ‘लूटेरा’, ‘गिन्नी वेड्स सनी’ आणि ‘12th fail’ या चित्रपटात झळकला.

SOURCE : ZEE NEWS