Home जीवनशैली marathi पोटभर जेवल्यानंतरही भूक लागते? ‘या’ 5 चुका तुम्ही तर करत नाहीयेत ना!

पोटभर जेवल्यानंतरही भूक लागते? ‘या’ 5 चुका तुम्ही तर करत नाहीयेत ना!

2
0

Source :- ZEE NEWS

Health Tips In Marathi: भूक लागल्यानंतर आपण जेवण करतो. मात्र पोट पूर्णपणे भरल्यानंतरही काही तरी खावं असं वाटत राहतं. तुम्हाला देखील असंच वाटत असेल तर समजून जा काहीतरी चुकतंय. डाएटिशियन आयुषी यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेवण केल्यानंतही हंगर क्रेव्हिंग होत असेल तर यामागे 5 कारणं असू शकतात. आज आपण ही कारणं जाणून घेऊया. 

प्रोटीन आणि फायबरची कमतरता 

प्रोटीन आणि फायबर हे असे दोन पोषकतत्वे असतात जे दीर्घकाळापर्यंत आपलं पोट भरलेले ठेवू शकतात. त्यामुळं सतत काहीतरी खावंस वाटणं यापासून सुटका होईल. त्यामुळं तुमच्या आहारात या दोन पोषकतत्वांची कमतरता असू शकते. त्यामुळं तुम्हाला सतत भूक लागण्याची समस्या होत असेल. 

शरीरात पाण्याची कमतरता

जर भरपेट जेवण केल्यानंतरही तुम्हाला भूख लागत असेल कर याचा अर्थ तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता आहे. त्यामुळं दिवसातून 8 ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. जेवतानाही थोडे-थोडे पाणी प्या. 

हाय ब्लड शुगर लेव्हल

जेवल्यानंतरही हंगर क्रेव्हिंग होत असेल तर हे हाय ब्लड शुगरचे साइड इफेक्ट असू शकते. जर तुम्ही डायबिटीक किंवा प्री-डायबेटिक असाल तर तुमची ब्लड शुगर नियमित तपासा किंवा मेटेंन असेल याची खातरजमा करा. 

लवकर-लवकर खाण्याची सवय

जर तुम्हालाही लवकर लवकर जेवण्याची वाइट सवय असेल तर जितक्या लवकर शक्य असेल ती सवय टाळा. असं म्हणतात की, एक घास 32 वेळा चावावा. 32 वेळा अन्न चावण्याचा एक फायदा म्हणजे आपण बर्‍याच वेळासाठी अन्नाची चव घेऊ शकता. बराच वेळ अन्न चघळण्यामुळे अधिक पोषक आणि ऊर्जा शोषण्यास मदत होते. यामुळं तुम्हाला लवकर भूक लागणार नाही. 

अतिप्रमाणात व्यायाम

जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त व्यायम करत असाल तर तुम्हाला जास्त कॅलरी इनटेक करण्याची गरज भासणार आहे. त्याचबरोबर, प्रोटीन आणि फायबर असलेले पदार्थही खावे लागणार आहेत. जर तुम्ही जास्त कॅलरी असलेले जेवण सेवन केले नाही तर जेवल्यानंतरही भूक लागेल आणि शरीरात अशक्तपणा जाणवेल. 

या सवयी अंगी बाळगा

1 प्रोटीन आणि फायबर युक्त असा रिच हेल्दी नाश्ता घ्या

2 दिवसभर पर्याप्त मात्रेत पाणी प्या

3 लंचमध्ये गरजेचे पोषकतत्वे असतील असा आहार घ्या

4 तणावमुक्त आयुष्य जगा

5 ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवा

6 रोज आठ तास झोप घ्या

7 भूक लागल्यानंतर हेल्दी आहार घ्या

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

SOURCE  ZEE NEWS