Home world news marathi पहिल्या तीन महिन्यातच मोडला कणा; ‘या’ कंपनीकडून 6000 कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची तयारी,...

पहिल्या तीन महिन्यातच मोडला कणा; ‘या’ कंपनीकडून 6000 कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची तयारी, नावांची यादीही तयार

1
0

Source :- ZEE NEWS

Layoff News : फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या महिन्यांदरम्यान अनेक कंपन्यांमध्ये लगबग पाहायला मिळते ती म्हणजे पगारवाढीची.  वर्षभर जीवतोड काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या संस्थेकडून समाधानकारक पगारवाढीची अपेक्षा असते आणि याच अपेक्षेच्या बळावर हे कर्मचारी संस्थेप्रती एकनिष्ठेनं काम करत असतात. पण, यंदाचं वर्ष यास अपवाद ठरू शकतं. कारण, Annual Appraisal च्या दिवसांमध्ये एका आग्रगणी कंपनीनं आणि जगातील बऱ्याच कंपन्या त्यातही IT कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे. 

जागतिक स्तरावर नावाजलेल्या या कंपनीतून तब्बल 6000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पहिल्या त्रैमासिक अहवालानंतर हा निर्णय घेण्याचत आला आहे. ही कंपनी म्हणजे, एलॉन मस्क (Elon Musk) यांची Tesla. जगातील सर्वात धनाढ्य व्यक्ती अशी ओळख असणाऱ्या एलॉन मस्कची मालकी असणाऱ्या टेस्ला कंपनीच्या पहिल्या त्रैमासिक कामगिरीची आकडेवारी नुकतीच समोर आली. या आकडेवारीनुसार जानेवारी ते मार्त या काळादरम्यान कंपनीच्या सरासरी उत्पन्नात 55 टक्क्यांची घट झाल्याची बाब समोर आली, ज्यामुळं या कंपनीतून 6000 कर्मचाऱ्यांना नोकरीला मुकावं लागणार आहे. 

त्रैमासिक आढाव्यासंदर्भातील माहिती जाहीर करण्यात आल्यानंतर टेस्लाकडून एका कॉन्फरन्स कॉलचं आयोजन करण्यात आलं. जिथं नोकरकपातीच्या निर्णयामुळं टेस्लाच्या वार्षिक उत्पन्नामध्ये दरवर्षी 1 अब्ज डॉलर इतकी मोठी बचत होणार असल्याची माहिती Financial Officer वैभव तनेजा यांनी दिली. 

मागील काही काळापासून टेस्लाचे शेअरही वाईट कामगिरी करताना दिसत असून, त्यामुळं कंपनीच्या वार्षिक उत्पनामध्येही याचे थेट परिणाम दिसून येऊ लागले आहेत. एकूण उत्पन्नामध्ये झालेली घट आता एलॉन मस्क यांच्या श्रीमंतांच्या यादीतील जागतिक क्रमवारीवरही परिणाम करताना दिसत आहे, जिथं मस्क पहिल्या स्थानावरून चौथ्या स्थानावर घसरले आहेत. 

बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार खुद्द मस्कनंच 6000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार असल्याची बाब जाहीर केली. यासाठी कंपनीकडून एक यादीसुद्धा तयार करण्यात आली असून या यादीनुसार कॅलिफोर्निया युनिटमधून 3332 कर्मचारी आणि टेक्सास युनिटमधून 2688 कर्मचाऱ्यांना नारळ दिला जाणार आहे. 

अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार 14 जून 2024 पासून कंपनीत ही नोकरकपात सुरु होणार आहे. मागणीत झालेली घट आणि उत्पन्नातील फरक पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं. या निर्णयाचे थेट परिणाम टेस्लाच्या बफेलो आणि न्यूयॉर्क युनिटमध्ये काम करणाऱ्या 285 कर्मचाऱ्यांवरही पडणार आहे. 

SOURCE : ZEE NEWS