Home sports news marathi SL vs Afg Test : ज्याची भीती होती तेच झालं! अफगाणिस्तान टेस्टसाठी...

SL vs Afg Test : ज्याची भीती होती तेच झालं! अफगाणिस्तान टेस्टसाठी श्रीलंकेच्या ‘या’ तीन नव्या छाव्यांना संधी

1
0

Source :- ZEE NEWS

SL vs Afg Test Match : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी कसोटी सामन्यांचा हंगाम सुरू आहे. अशातच श्रीलंका आणि अफगाणिस्तान (SL vs Afg Test) यांच्यात एकमेव कसोटी सामना 2 फेब्रुवारी 2024 रोजी खेळवला जाणार आहे. त्यासाठी श्रीलंका क्रिकेटने 16 सदस्यीय संघाची घोषणा केली. या संघात अशा तीन खेळाडूंना संधी दिली गेलीये, ज्याची अफगाणिस्तान संघाला भीती होती. श्रीलंकेने संघात तीन अनकॅप्ड खेळाडूंचा समावेश केला आहे. यामध्ये लाहिरू उदारा, चमिका गुणसेकरा आणि मिलन रथनायके यांचा समावेश आहे.

चमिका गुणसेकरा आणि मिलन रथनायके या दोन फास्टर गोलंदाजांना संघात घेतल्याने आता अफगाणिस्तानच्या अडचणी वाढणार आहेत. तर लाहिरू उदारा याने याआधी टी-ट्वेंटी आणि वनडे सामने खेळले आहेत. मात्र, तो आता टेस्ट डेब्यू करणार आहे. अशातच आता श्रीलंकेचं स्कॉड पाहून अफगाणिस्तानचं टेन्शन वाढलंय.

धनंजय डी सिल्वाच्या नेतृत्वाखालील श्रीलंका संघ तर, हसमुतल्ला शाहिदीच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तान संघ खेळेल. कुसल मेंडिस यांच्या खांद्यावर संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आलीये. तर  दिमुथ करुणारत्ने, अँजेलो मॅथ्यूज आणि माजी कर्णधार दिनेश चंडिमल या तीन वरिष्ठ खेळाडूंना देखील संधी देण्यात आलीये.

दरम्यान, श्रीलंकेच्या संघात फलंदाज पथुम निसांकाला स्थान मिळालं नाही. तर मुंबई इंडियन्सने आपल्या ताफ्यात सामील करून घेतलेल्या दिलशान मदुशंका याचा पत्ता देखील कट करण्यात आला आहे. 

श्रीलंका टीम

धनंजय डी सिल्वा (C), कुसल मेंडिस (VC), दिमुथ करुणारत्ने, निशान मदुष्का, एंजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडीमल, सदीरा समरविक्रमा, रमेश मेंडिस, असिथा फर्नांडो, विश्वा फर्नांडो, कासुन राजिथा, कामिन्दु मेंडिस, प्रभात जयसूर्या, लाहिरू उदारा, चमिका गुणसेकरा, मिलन रथनायके

अफगानिस्तान टीम

हशमतुल्लाह शाहिदी (C), इब्राहिम जादरान, अब्दुल मलिक, नूर अली जादरान, रहमत शाह (VC), बहिर शाह, नासिर जमाल, इकराम अलीखिल (WK), मोहम्मद इशाक (WK), कैस अहमद, जिया-उर-रहमान, जहीर खान, यामीन अहमदजई, निजात मसूद, मोहम्मद सलीम और नवीद जादरान.

SOURCE ZEE NEWS