Home LATEST NEWS ताजी बातमी NEET पेपरफुटीप्रकरणी CBI नं अटक केलेले शिवराज मोटेगावकर कोण आहेत? त्यांच्या RCC...

NEET पेपरफुटीप्रकरणी CBI नं अटक केलेले शिवराज मोटेगावकर कोण आहेत? त्यांच्या RCC क्लासेसची सुरुवात कशी झाली?

10
0

Source :- BBC INDIA NEWS

शिवराज मोटेगावकर

फोटो स्रोत, Shivraj Motegaonkar

Published 18 मे 2026, 14:55 IST

अपडेटेड 3 तासांपूर्वी

वाचन वेळ: 5 मिनिटे

लातूरमधील एका प्रसिद्ध क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना आज (18 मे) पुण्यातून केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं (CBI) अटक केली. त्यानंतर त्यांना दिल्लीतील Rouse Avenue Court येथे हजर करण्यात आलं.

त्याठिकाणी CBI ने मोटेगावकर यांची 10 दिवसांची कोठडी मागितली होती. पण मोटेगावकर यांचे वकील म्हणाले, ही कोठडी जास्त होत आहे. एवढ्या जास्त दिवसांची गरज काय आहे? त्यावर शेवटी कोर्टाने CBI ला मोटेगावकर यांची 9 दिवसांची कोठडी दिली.

कोर्टात माहिती देताना CBI वकील म्हणाले की, रविवारी (17 मे) सायंकाळी 7.15 वाजता मोटेगावकर यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. तसंच याआधीही काही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

शिवराज मोटेगावकर

फोटो स्रोत, Shivraj Motegaonkar

याआधी CBI ने दिलेल्या माहितीनुसार, शिवराज मोटेगावकर यांनी 2026 चा NEET UGचा फुटलेला पेपर वितरित केला आहे. यामध्ये एक मोठी साखळी असल्याचं आम्हाला समजलं आहे. आता आम्ही या सगळ्यांच्या लिंक तपासत आहोत. याशिवाय CBI वकिलांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, आरोपी RCC कोचिंग क्लास चालवत असत. तर संशयित आरोपी प्रल्हाद कुलकर्णी हेही मोटेगावकर यांच्या संपर्कात होते.

कोर्टाने मोटेगावकर आणि CBI यांच्या वकिलांची बाजू ऐकल्यानंतर मोटेगावकर यांना 9 दिवसांची CBI कोठडी सुनावली आहे.

या दरम्यान, माध्यमांच्या प्रतिनिधी यांनी मोटेगावकर यांना काही प्रश्न विचारले पण त्यावर बोलण्यास त्यांनी नकार दिला.

कोण आहेत शिवराज मोटेगावकर?

मराठवाड्यातील ‘लातूर पॅटर्न’ म्हटलं की, काही मोजकी नावं सर्वप्रथम घेतली जातात. त्यामध्ये प्रा. शिवराज मोटेगावकर यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं.

केमिस्ट्री विषयाचे प्राध्यापक म्हणून ओळख असलेल्या मोटेगावकर यांनी NEET, JEE परीक्षा मार्गदर्शन क्षेत्रात स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण केलं.

2003 साली या संस्थेची सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला RCC द्वारे MH-CET साठी कोचिंग दिले जायचे.

दरम्यान, मोटेगावकर यांची 17 मे रोजी जवळपास 10 तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर 18 मे रोजीही त्यांची चौकशी सुरू होती. त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.

या प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं (CBI) रविवारपर्यंत 9 आरोपींना अटक केली. त्यात आता शिवराज मोटेगावकरांची भर पडल्यानं एकूण अटक झालेल्या आरोपींची संख्या 10 वर पोहोचलीय.

NEET, JEE आणि MHT-CET परीक्षांसाठी महाराष्ट्रातील मोठ्या कोचिंग नेटवर्कपैकी RCC एक मानलं जातं.

शिवराज मोटेगावकर

फोटो स्रोत, Shivraj Motegaonkar

RCCच्या अधिकृत वेबसाईटवरील माहितीनुसार, शिवराज मोटेगावकर यांनी केमिस्ट्री विषयात MSc करताना सुवर्णपदक मिळवलं. मात्र त्याठिकाणी त्यांनी कोणत्याही विद्यापीठाचा उल्लेख केलेला नाही.

त्यांनी SET/NET-JRF, GATE, BARC, DRDO आणि TIFR यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा पात्र केल्याचा दावा संस्थेकडून करण्यात आला आहे.

मोटेगावकर यांनी घरातून शिकवणी सुरू केली आणि त्यानंतर 2003 मध्ये रेणुकाई केमिस्ट्री क्लासेसची स्थापना झाली. पुढे ही संस्था RCC Pattern या नावाने विस्तारली.

RCC या संस्थेने मराठवाड्यासह पुणे, नाशिक, नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि इतर शहरांमध्ये शाखा सुरू केल्या.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

RCCच्या वेबसाईटनुसार, हजारो विद्यार्थ्यांना वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांसाठी मार्गदर्शन केल्याचा दावा संस्था करते.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिल्याचाही उल्लेख RCC ने केला आहे.

सोशल मीडियावरही मोटेगावकर यांचा मोठा वावर आहे. इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांशी संवाद साधतात.

परीक्षा, अभ्यास पद्धती आणि करिअर मार्गदर्शनाशी संबंधित व्हीडिओ आणि पोस्ट नियमितपणे प्रसिद्ध केल्या जातात.

RCC क्लासेसकडून 11वी आणि 12वी NEET आणि JEE परीक्षेच्या कोर्सची प्रसिद्धी करताना अशी जाहिरात केली आहे.

फोटो स्रोत, Shivraj Motegaonkar

लातूरमध्ये 11वी आणि 12वी NEET आणि JEE ची तयारी करण्यासाठी या क्लासेसला मोठी पसंती दिली जाते. महाराष्ट्रभरातील या संस्थांमध्ये मिळून सुमारे 10 हजारपेक्षा जास्त विद्यार्थी प्रवेश घेतात.

11वीच्या विद्यार्थ्यांकडून अंदाजे 40 हजार रुपये, तर 12वीच्या विद्यार्थ्यांकडून 50 हजार रुपये इतकी वार्षिक फी घेतली जाते. परीक्षेपूर्वी दिले जाणारे गेस पेपर आणि प्रॅक्टिस टेस्टमुळे RCC क्लासेसची ओळख लातूर पॅटर्नमध्ये अधिक वाढली.

3 मे रोजी NEET परीक्षेनंतर मोटेगावकर यांनी स्वतः त्यांच्या फेसबुकवर एक व्हीडिओ पोस्ट केला होता. त्या व्हीडिओमध्ये एका विद्यार्थ्याने सांगितलं की, 42 प्रश्न हे सरांनी दिलेल्या गेस पेपरमधूनच आले.

NEET UG 2026 रद्द झाल्यावर मोटेगावकर काय म्हणाले?

पेपरफुटीनंतर NEET UG 2026 परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर शिवराज मोटेगावकर यांनी त्यांच्या क्लासेसच्या युट्यूब चॅनेलवर एक व्हीडिओ प्रसिद्ध केला होता.

त्यामध्ये त्यांनी मुलांना परीक्षा रद्द झाली म्हणून घाबरून जाऊ नका, असं आवाहन केलं होतं. तसंच, RCC पुन्हा या परीक्षेच्या तयारीसाठी मोफत ऑनलाइन क्लासेस सुरू करणार असल्याचं म्हटलं.

फेरपरीक्षेमुळे मेरिट आणखी वाढेल, असं ते म्हणाले. “आम्ही ज्या सराव चाचण्या घेऊ, त्याच्या बाहेरील प्रश्न पडणारच नाही,” असा दावाही त्यांनी या व्हीडिओतून केला.

शिवराज मोटेगावकर

फोटो स्रोत, Shivraj Motegaonkar

याआधी त्यांनी प्रसिद्ध केलेल्या सोशल मीडियावरील व्हीडिओंमधूनही 3 मे रोजी घेण्यात आलेल्या NEET UG 2026 परीक्षेत RCC कोचिंग क्लासेसने जे शिकवलं, तेच परीक्षेत आल्याचा दावा त्यांनी आणि त्यांच्या क्लासमधल्या विद्यार्थ्यांनी केल्याचं दिसतं.

मोटेगावकरांच्या अटकेविषयी सीबीआयनं काय म्हटलं?

मोटेगावकर यांना अटक केल्यानंतर तयार करण्यात आलेल्या मेमोमध्ये अटकेची कारणं नमूद करण्यात आली आहेत.

त्यात म्हटलं आहे, “तपासामध्ये असे निष्पन्न झाले आहे की, शिवराज रघुनाथ मोटेगावकर हे NEET UG परीक्षा-2026 ची प्रश्नपत्रिका लीक करणे आणि तिचं वितरण करणे या गुन्ह्यात सहभागी असलेल्या संघटित टोळीचे सक्रिय सदस्य आहेत.”

तसेच, इतर आरोपींशी संगनमत करून त्यांनी NEET UG 2026 परीक्षेची प्रश्नपत्रिका आणि तिची उत्तरं परीक्षा होण्यापूर्वीच, म्हणजेच 23 एप्रिल 2026 रोजी मिळवली होती.

फाईल फोटो

फोटो स्रोत, Getty Images

14 मे 2026 रोजी शिवाजीनगर, लातूर येथील आरोपी शिवराज रघुनाथ मोटेगावकर यांच्या निवासस्थानी घेण्यात आलेल्या झडतीदरम्यान त्यांच्या मोबाईलमध्ये NEET UG 2026 चे लीक झालेले प्रश्न आढळून आले.

तसंच, शिवराज मोटेगावकर यांनी इतर आरोपींसोबत लीक झालेल्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांच्या प्रती विवेक पाटील यांच्यासह अनेकांना पुरवल्या, असंही तपासात पुढे आल्याचं यात म्हटलं आहे.

मोटेगावकर यांनी लीक झालेल्या NEET UG 2026 परीक्षा प्रश्नपत्रिकांच्या हाताने लिहिलेल्या प्रती ज्या व्यक्तींना पुरवल्या, त्या सर्वांची नावं त्यांनी उघड केलेली नाहीत.

तपासादरम्यान आरोपीने परीक्षेनंतर लीक झालेल्या प्रश्नपत्रिका नष्ट करून पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केल्याचं या मेमोमध्ये म्हटलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

शॉर्ट व्हीडिओ

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

  • कलाकारांवर पोत्याने पैशांचा वर्षाव, लोक डायरोची परंपरा काय आहे?

  • Keyframe #1

  • BBC

  • Trump, XI

  • शुगर, ऊस, साखर

  • DFadnavis on Bike

  • NEET

  • Gold woman

  • डोनाल्ड ट्रम्प, शी जिनपिंग

  • Made in Pakistan Fan

  • जेव्हा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष उठून प्रेक्षकांना म्हणाले, ‘शांत बसा’

  • BBC

  • BBC

  • लँडिंग दरम्यान विमान अचानक वाहनाला धडकलं....

  • Keyframe #1

SOURCE : BBC