Home व्यवसाय marathi मोबाईल चार्ज करताना तुम्हीपण या चुका करता का? आत्ताच सावध व्हा, अन्यथा…

मोबाईल चार्ज करताना तुम्हीपण या चुका करता का? आत्ताच सावध व्हा, अन्यथा…

1
0

Source :- ZEE NEWS

Smartphone Charging Tips: मोबाईल फोन हा आपल्या आयुष्यातील सर्वात अविभाज्य घटक बनला आहे. लोक आता छोट्या छोट्या गोष्टींसाठी मोबाईल फोनवर अवलंबून असतात. फोनवर बोलण्याव्यतिरिक्त सोशल मीडिया अॅप्स ते ऑफिसच्या कामांसाठीही फोनचा वापर केला जातो. त्याचबरोबर गाणी ऐकण्यासाठी, चित्रपट पाहण्यासाठीही आता फोनचा वापर करतात. त्यामुळं तुमच्या स्मार्टफोनची काळजी घेणे खूप महत्त्वाचं आहे. मोबाईल फोन चार्ज करणे खूप गरजेचे आहे. मात्र, अनेकदा तुम्ही ऐकलं असेल की फोन चार्ज करत असताना अचानक फोनला आग लागली किंवा फोनची बॅटरी फुटली. असे अशा अनेक घटना गेल्या काही दिवसांत समोर आल्या आहेत. मोबाईल फोन चार्ज करताना काही चुका होऊन जातात. त्यामुळं मोठं नुकसान सोसावं लागतं. जाणून घेऊया या बाबत सविस्तर. 

मोबाइल चार्ज करताना या चुका टाळा

स्मार्टफोन विकत घेताना त्यासोबत चार्जर पण दिला जातो. हे चार्जर ओरिजनल असते तसंच, त्या फोनसाठीच असते. त्यामुळं मोबाईलसोबत आलेल्या चार्जरचाच वापर करा. यामुळं फोनला कोणतेही नुकसान होणार नाही. जर तुमच्याकडचे चार्जर खराब झाले असेल तर एखाद्या विश्वसनीय ब्रँडचे चार्जर खरेदी करा. खराब कॉलिटी असलेल्या ब्रँडचे चार्जर वापरल्याने फोनच्या चार्जिंग सिस्टमला नुकसान पोहोचू शकते. 

फोनमध्ये इतकी चार्जिंग नेहमी ठेवा

मोबईल पूर्णपणे डिस्चार्ज होऊ देऊ नका. त्यामुळं फोनची बॅटरी लाइफ कमी होते. फोनमध्ये 20 ते 80 टक्क्यांपर्यंत बॅटरी चार्ज ठेवावी.

फोन गरम झाल्यास चार्ज करु नका

मोबाईल फोन गरम होत असल्यास चार्ज करु नका. यामुळं बॅटरी खराब होऊ शकते. जर तुमचा फोन गरम होत असेल तर तो नॉर्मल टेंपरेचरला येईपर्यंत चार्ज करु नका.

फोन चार्ज होत असताना वापरु नका

चार्जिंग करताना मोबाईल फोन वापरल्याने बॅटरीचे नुकसान होऊ शकते. यामुळे बॅटरी लवकर खराब होऊ शकते. त्यामुळे फोन चार्ज केल्यानंतर वापरा.

मोबाईल चार्ज करताना या गोष्टी लक्षात ठेवा

1. मोबाईल फोन नेहमी सुरक्षित ठिकाणी चार्ज करा.
2. मोबाईल फोन चार्ज करताना त्याचे कोणतेही नुकसान होऊ देऊ नका.
3. मोबाईल फोन चार्ज करताना काही अडचण आल्यास लगेच चार्जिंग थांबवा.

SOURCE : ZEE NEWS