Home मनोरंजन marathi ‘मराठी भाषा किंवा लोकांना कमी लेखणाऱ्यांना…’; रेणुका शहाणे यांची संतप्त प्रतिक्रिया, ‘मतदान...

‘मराठी भाषा किंवा लोकांना कमी लेखणाऱ्यांना…’; रेणुका शहाणे यांची संतप्त प्रतिक्रिया, ‘मतदान करताना…’

1
0

Source :- ZEE NEWS

Renuka Shahane on Marathi People Not Welcome Ad : काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका कंपनीच्या जाहिरातीवरून मोठा वाद सुरु झाला. या कंपनीच्या मुंबईतील एचआरनं लिंक्डइन प्रोफाईलवरून ही जाहिरात शेअर केली होती. तर या जाहिरातीत म्हटलं होतं की मराठी लोकांनी येथे अर्ज करु नये. मुंबईत नोकरी असूनही तिथे मराठी माणसाला संधी नाही हे पाहिल्यानंतर सगळ्यांनी संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. या सगळ्या प्रकरणावर राजकीय नेत्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. काल रोहित पवार यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली होती. तर आता याकडे सेलिब्रिटींचं देखील लक्ष गेलं आहे. लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री रेणुका शहाणेनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या सगळ्या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. 

रेणुका शहाणे यांनी त्यांच्या आधीच्या ट्विटर म्हणजेच आताच्या X अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्या म्हणाल्या की “मराठी ‘not welcome’ म्हणणार्‍या लोकांना कृपया मत देऊ नका, मराठी लोकांना घरं न देणाऱ्या लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना कृपया आपलं बहुमूल्य मत देऊ नका, ज्यांच्या कामाच्या ठिकाणी मराठी भाषा किंवा लोकांना कमी लेखलं जातं, अशा लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना किंवा पक्षाला कृपया मत देऊ नका, कुठल्याही जाती, धर्म किंवा भाषेच्या विरुद्ध मी नाही, पण जे आपल्याच महाराष्ट्रात, आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा मान ठेवत नाहीत, अशा लोकांना, शांतपणे, मत न देऊन, त्यांची चूक दाखवून दिलीच पाहिजे.”

रेणुका शहाणेची ही पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी रेणुका शहाणेनं योग्य भूमिका घेतल्याचे म्हटले आहे. तर काही नेटकऱ्यांनी रेणुका शहाणेला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तर कोणी त्यांचा नवरा म्हणजेच अभिनेता आशुतोष राणा अमराठी असल्याचं म्हणत खडे बोल सुनावले आहे. 

काय आहे संपूर्ण प्रकरण?

गुजरातमधील एका फ्रीलान्स एचआर रिक्रूटरनं ग्राफिक डिझायनरच्या भूमिकेसाठी मुंबईत नोकरीची जाहीरात केली होती. ही जाहिरात त्या HR नं तिच्या लिंक्डइन प्रोफाईलवरुन शेअर केली होती. पण, जाहीरातीमध्ये एचआरनं ‘येथे मराठी लोकांचे स्वागत नाही किंवा इथे मराठी लोक अर्ज करु शकत नाही’ असे लिहिले होते. त्यानंतर चूक कळताच त्या HR नं या संदर्भात माफी देखील मागितली होती. 

SOURCE : ZEE NEWS