Home जीवनशैली marathi मद्याचा शरीरावर होणारा परिणाम रोखण्यासाठी खा ‘हे’ 3 पदार्थ

मद्याचा शरीरावर होणारा परिणाम रोखण्यासाठी खा ‘हे’ 3 पदार्थ

2
0

Source :- ZEE NEWS

‘5 दिवस मेहनत आणि 2 दिवस पूर्ण आनंद’ हा ट्रेंड सध्या मेट्रो शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होत आहे. विशेषत: तरुणांना ते खूप आवडते. त्यांच्या वीकेंड पार्टीमध्ये खाण्यापिण्यापासून ते डान्स आणि मस्तीपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश असतो. पण यामध्ये सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे हार्ड ड्रिंक. पण यामुळे शरीराला अनेक प्रकारे नुकसान होते.

दैनंदिन जीवनात आनंद घेण्यासाठी अल्कोहोलचे सेवन केल्याने तुम्हाला आज आनंद तर मिळू शकतो, परंतु याचा तुमच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होऊ शकतो. दैनंदिन जीवनात अल्कोहोल तुमच्या आरोग्याला कसे हानी पोहोचवू शकते हे आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

फॅटी लिवरची समस्या 

अल्कोहोलचे सेवन तुमच्या यकृताला हानी पोहोचवू शकते. एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार,अल्कोहोल पिण्यामुळे यकृतामध्ये चरबी जमा होऊ शकते. ज्याला फॅटी लिव्हर म्हणतात. फॅटी लिव्हरची समस्या कायम राहिल्यास यकृताच्या आत सूज येते. सतत जळजळ झाल्यामुळे, ते फायब्रोसिस किंवा सिरोसिसचे रूप घेऊ शकते. महिन्याला सुमारे 100 रुग्ण दारू पिल्याने यकृत निकामी होऊन ओपीडीमध्ये येतात. यापैकी सुमारे 10 टक्के रुग्णांना यकृत निकामी झाल्याचे निदान होते आणि त्यांना यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता असते. बहुतेक रुग्ण हे 25-50 वयोगटातील आहेत.

पाच पेग प्यायल्यामुळे होते नुकसान 

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन अल्कोहोल अब्यूजनुसार, पाच किंवा त्याहून अधिक पेग प्यायल्याने रक्तातील अल्कोहोल ०.०९ टक्क्यांनी वाढते. त्याचबरोबर साखरेची पातळीही सुमारे २ टक्क्यांनी वाढते. जेव्हा अल्कोहोलचा प्रभाव कमी होतो तेव्हा साखरेची पातळी कमी होते आणि कधीकधी हायपोग्लायसेमियाची स्थिती उद्भवते. याला लो ब्लड शुगर असेही म्हणतात.

साईड इफेक्ट्सपासून असा करा बचाव 

लिंबू, संत्री, अननस इत्यादी व्हिटॅमिन सीचे चांगले स्रोत आहेत. व्हिटॅमिन सी अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते. अँटिऑक्सिडंट्स शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतात. त्यामुळे जेवणात सायट्रिक फळांचे प्रमाण वाढवावे. दारू प्यायल्याने यकृताचे सर्वाधिक नुकसान होते. त्यामुळे अनेक वेळा यकृताचा कर्करोग होण्याचीही तक्रार असते. अशा परिस्थितीत हळदीचे सेवन करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. हळदीमध्ये असलेल्या घटकांमुळे कर्करोगाचा प्रभाव कमी केला जाऊ शकतो. सफरचंदमध्ये पेक्टिन आणि इतर रसायने असतात जी शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतात. सफरचंद पचनासही मदत करते.

(Disclaimer –  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

SOURCE  ZEE NEWS