Home world news marathi पृथ्वीवरील एकमेव गाव जे आहे मंगळ ग्रहापेक्षाही थंड; डोळ्याच्या पापण्याही गोठून...

पृथ्वीवरील एकमेव गाव जे आहे मंगळ ग्रहापेक्षाही थंड; डोळ्याच्या पापण्याही गोठून जातात

2
0

Source :- ZEE NEWS

Coldest Village In The World : कल्पनाही करु शकणार नाही, एवढी प्रचंड थंडी असणारे एक गाव आहे.  जगातलं हे सगळ्यात थंड गाव आहे. या गावात तब्बल उणे 62 इतकं तापमान असतं. या गावात सगळं काही गोठून जातं.. जमीन, पाणी, शाई, अन्न… इतकंच काय डोळ्यांच्या पापण्याही गोठून जातात.

उणे 67.7 डिग्री सेल्सियस एवढ्या उच्चांकी तापमानाची नोंद 

जगातल्या या सगळ्यात थंड गावाचं नाव ओयमायकॉन. रशियातल्या सायबेरियामधलं हे गाव. एवढी बोचणारी थंडी असूनही या गावात लोक राहतात. एवढ्या थंडीत घराबाहेर पडलं की डोळ्यांच्या पापण्याही गोठून जातात. या गावची लोकसंख्या जवळपास 500 इतकी आहे.  1920 च्या सुमाराला रेनडिअरना चरायला नेण्याची ही जागा होती. पण, हळूहळू इथली लोकवस्ती वाढायला लागली. 1933 मध्ये इथे उणे 67.7 डिग्री सेल्सियस एवढ्या उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली होती. 

पेनातली शाईही गोठून जाते

एवढ्या थंडीत राहायचं म्हणजे इथल्या लोकांना क्षणाक्षणाला संघर्ष करावा लागतो. इथे पेनातली शाईही गोठून जाते. लोकांच्या चष्म्यावर दव पडलं की क्षणार्धात त्याचा बर्फ जमा होतो. इथल्या लोकांना त्यांच्या वाहनांचं इंजिन नेहमी सुरूच ठेवावं लागतं, ते बंद केलं की इंजिन गोठून जातं आणि बंद पडतं. इथली जमीनही गोठून जाते. 

थंडीच्या मौसमात कुणाचा मृत्यू झालाच, तर मोठंच संकट

थंडीच्या मौसमात कुणाचा मृत्यू झालाच, तर मोठंच संकट उभं राहतं. संपूर्ण जमीन गोठल्यामुळे मृतदेह पुरणं अशक्य होऊन जातं.. त्यासाठी आधी बर्फात आग लावावी लागते. आग लावून बर्फ वितळला की मग काही वेळानं जमीन खोदणं शक्य होतं. थंडीच्या मौसमात  दिवसातले तब्बल 21 तास ओयमायकॉनमध्ये अंधार अशतो.  विशेष म्हणजे एवढ्या थंडीतही इथल्या शाळा सुरू असतात. एवढ्या थंडीत इथं काही पिकणं निव्वळ अशक्य. थंडीत इथले लोक फक्त मांसाहार करतात. त्यातही फक्त घोडा आणि रेनडिअर यांचंच मास खाल्लं जातं. काही घरांत मासे साठवून ठेवतात.

ओयमायकॉनपासून जवळचं शहर याकुट्स्क आहे. दुपारी अडीच वाजता इथलं तापमान आहे उणे पंचवीस अंश सेल्सियस इतकं असतं. संध्याकाळचे पाच वाजताच तापमान तब्बल उणे 46 डिग्रीपर्यंत खाली येतं. बर्फाची वादळं इथं नेहमीचीच. त्यातून मार्ग काढत गाडी चालवावी लागते. थंडीचा कहर म्हणजे काय ते या गावात समजतं.
थंडीच्या मौसमात कपडे वाळणं हे मोठंच आव्हान. चुकून एखादा कपडा बाहेर वाळत घातला तर त्या कपड्याचा बर्फ होतो. आणि तो कपडा चक्क फाटून जातो.

SOURCE : ZEE NEWS