Home मनोरंजन marathi ‘तुला काहीच हक्क नाही की…’, सावत्र मुलाच्या पोस्टवर करीना कपूरची कमेंट चर्चेत

‘तुला काहीच हक्क नाही की…’, सावत्र मुलाच्या पोस्टवर करीना कपूरची कमेंट चर्चेत

2
0

Source :- ZEE NEWS

सैफ अली खानचा (Saif Ali Khan) मुलगा इब्राहिम अली खानने (Ibrahim Ali Khan) नुकताच इंस्टाग्रामवर (Instagram) डेब्यू केला आहे. यानंतर तो सोशल मीडियावर सतत चर्चेत आहे. यादरम्यान त्याने आपला नवा लूक शेअर केला असून, यावर त्याची सावत्र आई करीना कपूरने (Kareena Kapoor) कमेंट केली आहे. करीना कपूरची ही कमेंट बरीच चर्चेत आली आहे. 

झालं असं की, इब्राहिम खान सध्या फ्लोरिडामध्ये मियामी ग्रँड पिक्समध्ये सहभागी झाला होता. यावेळी त्याने एफ 1 रेसर चार्ल्स लेक्लरची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्याने फोटो काढून इंस्टाग्रामला शेअर केला होता. यानंतर नेटकऱ्यांनी फोटोवर कमेंट केल्या होत्या. कमेंट करणाऱ्यांमध्ये इब्राहिम खानची सावत्र आई करीना कपूरदेखील आहे. करीना कपूरचया कमेंटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 

फोटोत इब्राहिम खानने लाल रंगाची फेरार जर्सी आणि चार्ल्सने निळ्या रंगाची जर्सी घातल्याचं दिसत आहे. हा फोटो शेअर करताना इब्राहिमने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, मला माहिती आहे, चार्ल्सनेही मला फेरारीचा ड्रायव्हर समजलं. दरम्यान या फोटोत दोघेही फारच हँडसम दिसत आहेत. 

फोटोवर कमेंट करणाऱ्यांमध्ये करीना कपूरदेखील आहे. करीनाने आपल्या सावत्र मुलाच्या फोटोवर कमेंट करत म्हटलं आहे की, “तुला इतकं हँडसम दिसण्याचा काही हक्कच नाही”. सोशल मीडियावर करीना कपूरची ही कमेंट चांगलीच व्हायरल झाली आहे. 

इब्राहिम हा सैफ अली खान आणि पहिली पत्नी अमृता सिंग यांचा मुलगा आहे. अमृतापासून विभक्त झाल्यानंतर सैफ अली खानने करीनाशी दुसरं लग्न केलं. 

कामाबद्दल बोलायचे झाले तर इब्राहिम लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून चित्रपटांमध्ये प्रवेश केला आहे. इब्राहिम करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसला होता. आता तो धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनत असलेल्या ‘सरजमीन’ चित्रपटात काम करताना दिसणार आहे. बोमन इराणी यांचा मुलगा कयोज इराणीही या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार आहे.

SOURCE : ZEE NEWS