Home world news marathi किंग चार्ल्स III यांना कॅन्सरचं निदान; ब्रिटनच्या राजघराण्याचा वारसा कोणाकडे?

किंग चार्ल्स III यांना कॅन्सरचं निदान; ब्रिटनच्या राजघराण्याचा वारसा कोणाकडे?

1
0

Source :- ZEE NEWS

King Charles III Cancer Updates: दोन वर्षांपूर्वी क्विन एलिझाबेथ यांचं निधन झालं. त्यांच्या या निधनानंतर चार्ल्स III ब्रिटेनच्या गादीवर बसले. मात्र नुकतंच चार्ल्स III ( King Charle ) यांना कॅन्सर झाल्याची माहिती मिळाली आहे. बकिंघम पॅलेसने याबाबतची पुष्टी केली आहे. बकिंघम पॅलेसने दिलेल्या माहितीनुसार, चार्ल्स III ( King Charle ) यांना कॅन्सरची लागण झाली असून त्यांच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरु आहेत. 

सध्या डॉक्टरांनी त्यांना इतर लोकांना भेटणं टाळण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान आता राजाला कॅन्सर झाल्याची माहिती समोर आल्यानंतर ब्रिटनच्या गादीचा नवा दावेदार कोण असणार असा प्रश्न उपस्थित होतोय. 

किंग्जच्या कुटुंबाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, किंग चार्ल्स ( King Charle ) पूर्णपणे सकारात्मक आहेत. याशिवाय ते लवकरच त्यांचं राजकीय काम पुन्हा एकदा सुरु करणार आहेत. यामधून बरं होण्यासाठी अजून किती वेळ लागेल याबाबत कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. 

ब्रिटनचा पुढचा मालक कोण?

चार्ल्स III ( King Charle ) यांना कॅन्सरचं निदान झाल्यानंतर आता ब्रिटनच्या राजगादीवर कोण बसणार याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. तर चार्ल्स III ( King Charle ) यांच्यानंतर त्यांचे जेष्ठ पुत्र प्रिंस विलियम्सन शाही सिंहासनासाठी मुख्य दावेदार मानले जातायत. प्रिंस विलियम्सनला प्रिंस ऑफ वेल्स या नावाने देखील ओळखलं जातं. प्रिंस विलियम्सन यांना 3 मुलं आहेत. प्रिंस जॉर्ज, चार्लोट आणि लुईस.  

बकिंघम पॅलेसने दिलेल्या निवेदनात असंही म्हटलं की, ब्रिटिश राजाच्या ( King Charle ) उपचाराशी संबंधित माहिती शेअर करण्यात आली. याचं कारण म्हणजे त्यांच्याबद्दल अफवा पसरू नये. जगभरातील लोकांना कॅन्सरग्रस्तांना समजून घेण्यास मदत होणार आहे. किंग चार्ल्स उपचारानंतर शक्य तितक्या लवकर आपल्या जबाबदाऱ्या पुन्हा सुरू करतील, असंही निवेदनात म्हटलं गेलंय.

गेल्या महिन्यात सर्जरी झाली होती

75 वर्षीय राजा चार्ल्स ( King Charle ) यांच्या वाढलेल्या प्रोस्टेटची शस्त्रक्रिया गेल्या महिन्यात लंडन क्लिनिकमध्ये करण्यात आली होती. 17 जानेवारी रोजी ॲबर्डीनशायरच्या बिरखॉल इथल्या त्यांच्या निवासस्थानी त्यांना प्रोस्टेटसंदर्भात समस्या असल्याचं निदान करण्यात आलं होतं. 

SOURCE : ZEE NEWS