Home मनोरंजन marathi ‘अल्याड पल्याड’ चित्रपटात मकरंद देशपांडे वेगळ्या भूमिकेत

‘अल्याड पल्याड’ चित्रपटात मकरंद देशपांडे वेगळ्या भूमिकेत

2
0

Source :- ZEE NEWS

Makarand Deshpande New Look from Alyad Palyad : मोजक्याच तरीही लक्षवेधी भूमिका करत रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावर अभिनेता मकरंद देशपांडे यांनी आपल्या अभिनयाचा जबरदस्त ठसा उमटवला आहे. या अवलिया कलाकारानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. त्यामुळे त्यांच्या नव्या भूमिकेविषयी रसिकांना कायमच उत्सुकता लागून राहिलेली असते. ‘अल्याड पल्याड’ या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्तानं ते तंत्र-मंत्र यात पारंगत असलेल्या एका सिद्धयोगी साधूची भूमिका साकारताना दिसणार आहेत. 

आपला महाराष्ट्र हा विविधतेने नटलेला आहे. त्यात अनेक जुन्या संस्कृती, तसेच प्रथा, परंपरा आहेत. अशाच एका वेगळ्या परंपरेची आराधना करण्याची प्रथा असणाऱ्या दुर्गम भागातल्या एका गावाची, तिथल्या माणसांची रहस्यमय कथा असलेला ‘अल्याड पल्याड’ हा थरारपट आहे. आव्हानात्मक भूमिका करायला मला नेहमीच आवडतात. ‘अल्याड पल्याड’ मधली भूमिका एका मांत्रिकाची आहे, त्याला पूर्ण सिद्धी प्राप्त नाही,त्यातून तो त्या गावाला कसा वाचवणार? याची अतिशय थरार गोष्ट यात मांडलीय. प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच खिळवून ठेवेल यात शंका नाही असं मकरंद देशपांडे सांगतात.  

पोस्टर आणि टिझर अनावरण प्रसंगी बोलताना दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील म्हणाले की,वेगळ्या  विषयावरचा  ‘अल्याड पल्याड’ चित्रपट करताना खूप मजा आली. प्रेक्षकही हा चित्रपट तितकाच एन्जॉय करतील. उत्तम कलाकारांच्या टीमसोबत एका वेगळ्या विषयावर चित्रपट करण्याची संधी आम्हाला महत्त्वाची वाटल्यामुळे चित्रपट निर्मितीसाठी पुढाकार घेतल्याचे निर्माते शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांनी यावेळी सांगितले. ‘एका चांगल्या चित्रपटाचा भाग होता आल्याचा आनंद अभिनेता गौरव मोरे ने व्यक्त केला. ‘शूटिंग करताना आम्ही धमाल केली ती धमाल पदड्यावर प्रेक्षकांना नक्की आनंद देईल, असा विश्वास अभिनेता सक्षम कुलकर्णीने व्यक्त केला. उत्तम कलाकारांसोबत काम करताना मला खूप काही शिकायला मिळाल्याच सांगताना, हा चित्रपट करणं माझ्यासाठी सुवर्णसंधी असल्याचं भाग्यम जैननं सांगितलं. दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील यांच्यासोबत काम करणं मी माझ्यासाठी नेहमीच आनंददायी  असल्याचं अभिनेते सुरेश विश्वकर्मा यांनी सांगितलं. 

हेही वाचा : …तर ‘हीरामंडी’ मध्ये मल्लिका जानच्या भूमिकेत दिसल्या असत्या रेखा, पण असं का होऊ शकलं नाही?

गौरव मोरे, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, भाग्यम जैन, अनुष्का पिंपुटकर आदि कलाकारांच्या भूमिका ‘अल्याड पल्याड’ चित्रपटात आहेत. कथा प्रीतम एस के पाटील यांची असून पटकथा संवाद संजय नवगिरे यांचे आहेत. छायांकन योगेश कोळी यांचे तर संकलन सौमित्र धरसुलकर यांचे आहे.  वेशभूषा अपेक्षा गांधी तर ध्वनी स्वरूप जोशी  यांचे आहे. लाईन प्रोड्यूसर दिपक कुदळे पाटील आहेत. एस.एम.पी प्रोडक्शन् अंतर्गत ‘अल्याड पल्याड’ चित्रपट 14 जूनला प्रेक्षक भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांनी केली असून दिग्दर्शन प्रीतम एस के पाटील यांचे आहे.    

SOURCE : ZEE NEWS