Home LATEST NEWS ताजी बातमी ‘हे युद्धच होतं आणि पाकिस्तानचं सैन्य बॅकफूटवर गेलंय’, असं संरक्षणतज्ज्ञ उदय भास्कर...

‘हे युद्धच होतं आणि पाकिस्तानचं सैन्य बॅकफूटवर गेलंय’, असं संरक्षणतज्ज्ञ उदय भास्कर का म्हणतायेत?

3
0

Source :- BBC INDIA NEWS

2022 मध्ये राजस्थानात अँटी एअरक्राफ्ट क्षेपणास्त्रांचं प्रात्यक्षिक (फाईल फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

भारत-पाकिस्तान संघर्षात कोणाचं किती नुकसान झालं, कोणत्या सैन्याची काय स्थिती आहे, तसंच या संघर्षातून नेमके कोणते महत्त्वाचे मुद्दे समोर आले आहेत, यासंदर्भात संरक्षणतज्ज्ञ सी उदय भास्कर यांनी मांडलेली महत्त्वाची मतं या लेखातून जाणून घेऊया.

भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू झालेला संघर्ष थांबून आता शस्त्रसंधी झाली आहे. मात्र, या संघर्षात दोन्ही देशांनी एकमेकांचं नुकसान केल्यासंदर्भात वेगवेगळे दावे केले आहेत.

संरक्षणतज्ज्ञ सी. उदय भास्कर यांना वाटतं की, सद्यस्थितीत पाकिस्तानी सैन्य बॅकफूटवर आहे.

पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’ लाँच केलं. त्यातून भारत आणि पाकिस्तानातील संघर्ष सुरू झाला होता.

या संघर्षात अनेक प्रकारच्या शस्त्रास्त्रांचा वापर झाल्याचीही चर्चा झाली. असं म्हटलं जातं की, यामध्ये दोन्ही देशांनी परदेशातून विकत घेतलेल्या शस्त्रास्त्रांचा वापर यात केला. त्यामध्ये विशेषकरून क्षेपणास्त्रं आणि ड्रोनची खूप अधिक चर्चा होते आहे.

याच मुद्द्यावर आम्ही संरक्षणतज्ज्ञ सी. उदय भास्कर यांच्याशी बोललो आणि या संघर्षाकडे ते कशाप्रकारे पाहतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

सी उदय भास्कर यांना वाटतं की, या संघर्षात ज्याप्रकारच्या शस्त्रास्त्रांचा वापर झाला आहे, ते पाहता याला ‘युद्ध’च मानलं पाहिजे.

बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं, “दोन्ही बाजूच्या ज्या सैन्य क्षमतेचा वापर झाला आहे, विशेषकरून ज्याला आपण सीमेपलीकडे मारा करण्याची क्षमता म्हणतो आणि ज्यात क्षेपणास्त्र, ड्रोन आणि उपग्रहांचा समावेश आहे, ते पाहता माझं वैयक्तिक मत असंच आहे की, हे युद्ध होतं. या संघर्षात बीव्हीआर म्हणजे बियाँड व्हिज्युअल रेंज क्षेपणास्त्रांचा वापर झाला आहे.”

त्यांनी सांगितलं की बियाँड व्हिज्युअल रेंजचा अर्थ म्हणजे असं क्षेपणास्त्र जे दिसत नाही किंवा जी दृष्टीपलीकडच्या टप्प्यावरून मारा करतात.

सी उदय भास्कर

या प्रकारच्या क्षेपणास्त्राबद्दल ते सांगतात की, “समजा तुम्ही एक टार्गेट निश्चित केलं. उदाहरणार्थ, तुम्ही नियंत्रण रेषेपासून जवळपास 100 किलोमीटर अंतरावर आहात आणि तुम्हाला क्षेपणास्त्र वापरायचं असेल तर तुम्ही 200 किलोमीटर पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचा वापर करू शकता.”

“तुम्ही अशा क्षेपणास्त्राचा वापर केल्यास पाकिस्ताची हवाई संरक्षण यंत्रणा किंवा हेड डिफेन्स त्याला डिटेक्ट करू शकणार नाही. त्यामुळेच त्याला बियाँड व्हिज्युअल रेंज म्हणजे बीव्हीआर म्हणतात.”

राफेल पाडल्याचा मुद्दा

पाकिस्तानकडून दावा करण्यात येतो आहे की, त्यांनी भारताचं लढाऊ विमानदेखील पाडलं आहे. यात राफेलचाही समावेश आहे. यात किती तथ्य आहे?

सी उदय भास्कर म्हणतात, “अजूनपर्यंत दोन्ही बाजूंकडून संपूर्ण माहिती देण्यात आलेली नाही. मात्र संरक्षणतज्ज्ञाच्या दृष्टीकोनातून आपण कदाचित या निष्कर्षावर नक्कीच येऊ शकतो की, भारत आणि पाकिस्तानमध्ये ज्या पातळीवरचा संघर्ष झाला आहे, त्यात कोणत्या तरी प्रकारचं नुकसान नक्कीच झालं असेल.”

राफेल पाडल्याचा मुद्दा

गेल्या काही दिवसांमध्ये भारत आणि पाकिस्तान संघर्ष जेव्हा शिगेला पोहोचला होता, तेव्हा चीनच्या संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत होती.

विशेषकरून अशा कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली ज्या कंपन्या पाकिस्तानला शस्त्रास्त्र आणि लढाऊ विमानांचा पुरवठा करतात. यातील एक कंपनी आहे एविक चेंगडू एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन. ही कंपनी ‘जे-10 सी’ लढाऊ विमानाचं उत्पादन करते.

चीनमधील शेनजेन स्टॉक एक्सचेंजमध्ये ही कंपनी नोंदणीकृत आहे. या कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत 7 मे ला गेल्या नऊ महिन्यांमधील सर्वाधिक तेजी दिसून आली.

ब्रह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी (प्रातिनिधिक फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

शेअर्सच्या किंमतीत तेजी येण्यामागचं एक कारण पाकिस्तानचा दावा आहे. पाकिस्ताननं दावा केला आहे की, त्यांनी ‘जे-10 सी’ लढाऊ विमानाचा वापर करून भारताचं राफेल लढाऊ विमान पाडलं होतं.

7 मे रोजी पाकिस्तानच्या संसदेत पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इसहाक डार यांनी केला होता. पाकिस्ताननं केलेल्या दाव्याबाबत भारतानं कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया दिलेली नाही आणि राफेल पडल्याची बाबदेखील स्वीकारलेली नाही.

सी उदय भास्कर म्हणतात, “आपण फ्रान्सकडून जी राफेल विमानं घेतली आहेत, त्यांच्याबद्दल सध्या काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. असं म्हटलं जातं आहे की, या संघर्षात भारताची काही राफेल विमानं पाडली गेली आहेत. भारतानं यावर अधिकृतपणे कोणतंही वक्तव्यं दिलेलं नाही. मी म्हणेन की वक्तव्यं देण्याची आवश्यकता देखील नाही.”

ते पुढे म्हणतात, “माझं वैयक्तिक मत आहे की, दोन्ही बाजूचं काही नुकसान झालं असेल. भारताचा दावा आहे की, त्यांनी अनेक हवाई तळांचं नुकसान केलं आहे. पाकिस्ताननं देखील त्यांच्या बाजूनं दावा केला आहे. मात्र अद्याप हे स्पष्ट झालेलं नाही की कुठे जास्त नुकसान झालं आहे.”

शेअर्सच्या किंमतीत तेजी येण्यामागचं एक कारण पाकिस्तानचा दावा आहे. पाकिस्ताननं दावा केला आहे की त्यांनी 'जे-10 सी' लढाऊ विमानाचा वापर करून भारताचं राफेल लढाऊ विमान पाडलं होतं.

या संघर्षाकडे क्षेपणास्त्र क्षमता किंवा दोन्ही देशांकडील एअर डिफेन्स सिस्टम समजण्यासाठी केलेली चाचणी म्हणून पाहिलं जाऊ शकतं का?

सी उदय भास्कर म्हणतात, “2019 मध्ये बालाकोटमध्ये जे झालं आणि आता जे ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये जे झालं, त्यात बराच फरक आहे. आता तंत्रज्ञान खूपच पुढे गेलं आहे. ड्रोन वॉरचंच उदाहरण घ्या. ते युक्रेन युद्धात दिसलं आहे, मध्य-पूर्वेत दिसलं आहे.”

“आता तुम्ही पाहू शकता की पहलगाम हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये तंत्रज्ञान पुढे गेल्याची अनेक चिन्हं आहेत. भारत आणि पाकिस्तान देखील परंपरागत युद्धाच्या एक-दोन पायऱ्या वर आले आहेत. आता असा प्रश्न आहे की तुम्ही स्वत: वरच्या स्तरावर जाऊ शकता की तुम्ही इतर एखाद्या देशाचा पाठिंबा हवा आहे.”

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश त्यांच्या संरक्षणावर मोठा खर्च करतात.

ग्लोबल फायर पॉवरनं दिलेल्या माहितीनुसार, 2025 च्या सैन्य स्ट्रेंथ रँकिंगमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये आठ स्थानांचा फरक आहे.

2025 मधील जागतिक सैन्य शक्तीची क्रमवारी लक्षात घेता, 145 देशांमध्ये भारत चौथ्या स्थानावर आहे तर पाकिस्तान 12 व्या स्थानावर आहे.

भारतीय सैन्याकडे जवळपास 22 लाख जवान आहेत. तसंच 4,201 रणगाडे, जवळपास दीड लाख चिलखती वाहनं, 100 सेल्फ प्रोपेल्ड ऑर्टिलरी आणि 3,975 ओढून नेता येणाऱ्या तोफा आहेत.

याशिवाय 264 मल्टीबॅरल रॉकेट आर्टिलरी आहेत. भारतीय वायुदलाकडे 3 लाख 10 हजार वायुसैनिक आहेत. एकूण 2,229 विमानं आहेत त्यातील 513 लढाऊ विमानं आहेत आणि 270 वाहतूक करणारी विमानं आहेत.

एकूण विमानांमध्ये 130 विमानं हल्ला करणारी आहेत, 351 ट्रेनर विमानं आहेत आणि 6 टँकर फ्लीटची विमानं आहेत.

ताज्या संघर्षात दोन्ही देशांना कोणत्या देशाकडून मदत मिळाली आहे?

सी उदय भास्कर म्हणतात, “भारत आणि पाकिस्तानमध्ये अनेकवेळा युद्धं झाली आहेत. यातील सर्वात मोठं युद्ध 1971 चं बांगलादेश युद्ध होतं. त्यावेळेस तत्कालीन सोविएत युनियन म्हणजे आजच्या रशियानं भारताला मदत केली होती. तर अमेरिकेनं पाकिस्तानला मदत केली होती. त्यावेळेस हे दोन्ही शक्तीशाली देश होते. त्याचा परिणाम काय झाला हे जगासमोर आहे.”

त्यांचं म्हणणं आहे, “ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस जो बदल झाला आहे तो म्हणजे मध्यम शक्ती असणाऱ्या देशांची उपकरणं, शस्त्रास्त्र यांचा देखील वापर करण्यात आला आहे. उदाहरणार्थ तुर्कीनं पाकिस्तानला बरेच ड्रोन्स पुरवले आहेत. मात्र असं म्हटलं जातं आहे की त्या ड्रोनचा वापर फारसा यशस्वी झालेला नाही.”

परदेशी तंत्रज्ञान आणि शस्त्रास्त्र

संरक्षण खर्चात भारत आणि पाकिस्तान कितव्या क्रमांकावर आहेत?

1. अमेरिका: 997 अब्ज डॉलर

2. चीन: 314 अब्ज डॉलर

3. रशिया: 149 अब्ज डॉलर

4. जर्मनी: 88.5 अब्ज डॉलर

5. भारत: 86.1 अब्ज डॉलर

29. पाकिस्तान: 10.2 अब्ज डॉलर

गेल्या महिन्यात जम्मू-काश्मीर मध्ये एका हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर भारतानं पाकिस्तान आणि पाकिस्तान-प्रशासित काश्मीरमध्ये हवाई हल्ले केले होते.

त्यानंतर काही दिवस दोन्ही बाजूनं हवाई चकमकी, तोफगोळ्यांचा मारा झाला. दोन्ही देशांकडून एकमेकांच्या हवाई तळांवर क्षेपणास्त्रांचा मारा केल्याचे आरोप करण्यात आले.

दोन्ही देशांकडून दिल्या जाणाऱ्या वक्तव्यांमध्ये मोठी वाढ झाली आणि दोन्ही देशांनी एकमेकांचे हल्ले अयशस्वी करत मोठं नुकसान केल्याचा दावा केला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकवेळा सांगितलं आहे की ते युद्धाच्या बाजूचे नाहीतअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकवेळा सांगितलं आहे की ते युद्धाच्या बाजूचे नाहीत

फोटो स्रोत, Getty Images

सी उदय भास्कर म्हणतात, “असं म्हटलं जातं आहे की चीननं पाकिस्तानला मोठा पाठिंबा दिला होता. चीनकडून मिळालेल्या शस्त्रास्त्रं, लढाऊ विमानांचा वापर पाकिस्ताननं केला आहे. अजूनही आपल्याला नक्की सांगता येणार नाही की चीनकडून पाकिस्तानला मिळालेली ही मदत किती प्रभावी ठरली.”

ते पुढे म्हणतात, “माझं वैयक्तिक मत आहे की भारताचं लष्करी बळ खूपच मजबूत होतं. त्याचबरोबर आपण परदेशातून विकत घेतलेल्या उपकरणांचा देखील वापर केला. उदाहरणार्थ रशियाकडून भारतानं घेतलेली एस-400 सिस्टिम. आतापर्यंतच्या माहितीच्या आधारे मी म्हणेन की एस-400 खूपच यशस्वी ठरलं.”

डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दलचं मत

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकवेळा म्हटलं आहे की, भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष थांबवण्यासाठी त्यांनी बरीच मदत केली आहे. युद्ध होऊन नये असं ट्रम्प यांचं स्पष्ट मत आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये दोन्ही देशांमधील शस्त्रसंधीबद्दल माहिती दिली होती. ते म्हणाले होते, “अमेरिकेच्या मध्यस्थीनं झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर, भारत आणि पाकिस्तान पूर्ण आणि तात्काळ शस्त्रसंधीला तयार झाल्याची घोषणा करताना मला आनंद होतो आहे.”

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

याआधी डोनाल्ड ट्रम्प सातत्यानं प्रयत्न करत होते की रशिया आणि युक्रेनमधील युद्ध लवकरात लवकर थांबावं.

सी उदय भास्कर म्हणतात, “आज अमेरिका जगातील सर्वात शक्तीशाली देश आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल तुम्ही काहीही म्हटलं तरी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात आणि आता दुसऱ्या कार्यकाळात देखील त्यांनी वारंवार हेच म्हटलं आहे की त्यांना शांतता हवी आहे.”

त्यांचं म्हणणं आहे, “त्यांची पद्धत कदाचित विचित्र असेल. मात्र चांगली गोष्ट ही आहे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष युद्धाच्या बाजूचे नाहीत तर युद्ध थांबवण्याचे प्रयत्न करत आहेत.”

सद्यपरिस्थितीत पाकिस्तानचं सैन्य आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल मुनीर यांच्यासमोर कोणती आव्हानं आहेत?

सी उदय भास्कर म्हणतात, “पाकिस्तानचं सैन्य बॅकफूटवर आहे. इमरान खान यांनी स्पष्ट म्हटलं आहे की पाकिस्तानच्या सैन्याचं धोरण पाकस्तान आणि पाकिस्तानच्या लोकांच्या हिताचं नाही. पाकिस्तानात झालेला हा एक खूप मोठा बदल आहे.”

भारताच्या सैन्याबद्दल म्हटलं जातं की ते नेहमीच एक शिस्तबद्ध सैन्य आहे. कारण भारतात संसदीय लोकशाही आहे. भारताच्या राजकीय संस्था खूपच मजबूत आहेत. मात्र अनेकदा असं म्हटलं जातं की सैन्यावर राजकीय प्रभाव दिसू लागला आहे.

सी उदय भास्कर म्हणतात, “भारताचं सैन्य नेहमीच खूपच कर्तव्यनिष्ठ आणि बिगर राजकीय स्वरुपाचं राहिलं आहे, यात कोणतीही शंका नाही.”

ते पुढे म्हणतात, “मात्र, हे देखील खरं आहे आणि मी ते प्रामाणिकपणे सांगितलं पाहिजे की, अशी काही चिन्हं दिसतात की ज्यामुळे वाटतं की सद्यपरिस्थितीत देशातील एकूणच राजकीय संस्कृतीचा प्रभाव सैन्यावर पडतो आहे.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC