Source :- ZEE NEWS
Thailand Mass Shooting: थायलंडमध्ये गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. हल्लेखोराने शाळेत घुसून गोळीबार केला आहे. यावेळी त्यांनी काही विद्यार्थी आणि शिक्षकांना ओलीस ठेवलं होतं ज्यांची सुटका करण्यात आल्याचं समजत आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अनेक लोकांना ओलीस ठेवण्यात आलं होतं. दक्षिण थायलंडच्या सोंगखला येथील एका शाळेत एका हल्लेखोराने अज्ञात विद्यार्थी आणि शिक्षकांना ओलीस ठेवलं होतं, अशी माहिती स्थानिक प्रशासनाने सोशल मीडियावरुन दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच, शेकडो तरुण बाहेरील रस्त्यांवर पळून जाताना दिसले होते. तसंच सशस्त्र पोलीस घटनास्थळी पोहोचले. इमारतीत अजूनही अनेक शिक्षक आणि विद्यार्थी अडकले आहेत.
Hat Yai जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे की, बंदूकधारी हल्लेखोराशी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करत आहेत. स्थानिक माध्यमांनी वृत्त दिलं आहे की, जखमींची संख्या आता कळली आहे. गोळीबारातून वाचलेल्या एका सुरक्षारक्षकाने सांगितले की, हल्लेखोराने शाळेच्या मुख्याध्यापकावर गोळी झाडली.
“माझ्या पोटाला गोळी घासून गेली, पण मी पळून गेलो. शाळेच्या संचालकांना गोळी लागली. शाळेच्या आत अजूनही काही मुले होती ज्यांना ओलीस ठेवण्यात आले आहे,” असं त्याने सांगितलं आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गोळीबार करणारा 18 वर्षांचा तरुण आहे.
थायलंडमध्ये बंदुकीचा हिंसाचार असामान्य नाही. 2022 मध्ये देशाच्या पूर्वेकडील एका नर्सरीमध्ये एका माजी पोलिस अधिकाऱ्याने बंदुक आणि चाकूने केलेल्या हल्ल्यात 22 मुलांसह 26 जणांना ठार केलं होतं.
SOURCE : ZEE NEWS
