Home world news marathi विमान 30 हजार फूट उंचीवर असतानाच प्रवाशांचा मोठा गोंधळ, विमानाचे छत…; काळजाचा...

विमान 30 हजार फूट उंचीवर असतानाच प्रवाशांचा मोठा गोंधळ, विमानाचे छत…; काळजाचा ठोका चुकवणारा Video

4
0

Source :- ZEE NEWS

Atlanta Airlines Latest News: तुम्ही विमानप्रवास करताय आणि 30 फुट उंचीवर तुमचे विमान उडत आहे आणि अचानक तांत्रिक गडबड झाली हे कळताच तुमचं काय होईल. तुमच्या काळजाचा ठोकाच चुकेल. असाच काहीसा प्रकार अलीकडेच डेल्टा एअर लाइन्सच्या प्रवाशांना आला आहे. विमानातील प्रवाशांनी काही काळ जीव मुठीत घेऊन प्रवास केला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

विमानाने टेक ऑफ घेतल्यानंतर काही वेळातच विमानाचे छत उखडले. त्यामुळं प्रवाशांवर काही काळ छत पकडून प्रवास करण्याची वेळ आली. या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या माहितीनुसार, हृदयाचा ठोका चुकवणारी ही घटना  14 एप्रिल रोजी घडली होती. या दिवशी डेल्टा एअर लाइन्सचे हे विमान फ्लाइट अटलांटाहून शिकागोला जात होती. जेव्हा विमान 30 हजार फूट उंचीवर होते तेव्हा अचानक विमानाचे छताला तडे गेले. त्यावेळी घाबरलेल्या प्रवाशांनी लगेचच छत पकडून उभे पाहिले. त्यानंतर विमानाच्या प्लेन क्रूने मोठ्या मुश्कीलेने डक्ट टेपने तुटलेले छत चिटकवले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेनंतर सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. 

या घटनेचा व्हिडिओ कंटेट क्रिएटर लुकास मायकल पायने सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओत पायने म्हटलं आहे की, माझा बिझनेस पार्टनर सोमवारी एटीएलहून शिकागोला जाणाऱ्या डेल्टा फ्लाइटमध्ये होता. त्याचवेळी विमानाच्या छताला तडा गेला होता. घटनेच्या वेळी फ्लाइट शिकागोहून एक तासांच्या अंतरावर होते. त्यानंतर त्यांना पुन्हा अटलांटाला पुन्हा जावे लागले. 

लुकास मायकेल पेनच्या दाव्यानुसार, अटलांटाला परतल्यानंतर प्रवाशांना अनेक तास वाट पहावी लागली. यानंतर त्यांना दुसरे विमान पकडून शिकागोला जावे लागले. या घटनेनंतर, डेल्टा एअरलाइन्सने प्रवाशांना प्रति व्यक्ती 100 डॉलर्सची ऑफर दिली आहे. कंपनीने प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल माफी मागणारे निवेदनही जारी केले आहे.

‘विमान कोसळत आहेत, जबाबदारी कोणाची’

पेनने या घटनेबद्दल निराशा व्यक्त करत म्हटले आहे की विमाने तुटत आहेत आणि कोणीही जबाबदारी घेत नाही! या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना, अनेक युजर्सनी विमान सुरक्षेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. लोक म्हणाले की परिस्थिती आणखी बिकट झाली असती तर काय झाले असते. यामुळे विमानात उपस्थित असलेल्या लोकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. सरकारने विमान कंपन्यांच्या सुरक्षिततेकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.

SOURCE : ZEE NEWS