Home world news marathi वर्षभरापूर्वी याच महिन्यात पाकिस्तानी तरुणीच्या शरीरात बसवलं भारतीय हृदय, आता व्हिडीओ होतोय...

वर्षभरापूर्वी याच महिन्यात पाकिस्तानी तरुणीच्या शरीरात बसवलं भारतीय हृदय, आता व्हिडीओ होतोय व्हायरल!

7
0

Source :- ZEE NEWS

Pakistani Girl Ayesha Rashid:  जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी गोळ्या घालून निष्पाप जीवांना ठार केले. यानंतर संपूर्ण भारतातून दु:ख आणि संताप व्यक्त केला जातोय. हे दहशतवादी पाकिस्तानी पुरस्कृत असल्याचा आरोप करत भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध कठोर निर्णय घ्यायला सुरुवात केलीय. सार्क व्हिसा सूट धोरणांतर्गत पाकिस्तानी नागरिकांना दिली जाणारी सुविधा बंद करण्यात आली आहे. असे असताना एका वर्षापुर्वीचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये पाकिस्तानी तरुणी आणि भारत सरकारचे आभार मानतेय. कारण तिच्या शरीरात भारतीय हृदय धडकतंय. पेहलगाम हल्ल्याची घटना ताजी असताना आयेशाच्या हृदय प्रत्यारोपणाला 1 वर्षे पूर्ण झाले आहे. 

पाकिस्तानच्या कराचीमध्ये राहणाऱ्या आयशा रशीदवर चेन्नईमध्ये हृदय प्रत्यार्पण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. 2019 मध्ये ती 19 वर्षांची असताना तिला या आजाराबद्दल कळाले. यानंतर ती उपचारासाठी चेन्नईला पोहोचली. अनेक दिवस आराम नि मिळाल्याने आयशाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आयशाची आर्थिक परिस्थिती पाहून, चेन्नईच्या एमजीएम हेल्थकेअरचे प्रसिद्ध हृदय प्रत्यारोपण डॉक्टर केआर बालकृष्णन यांनी मदत केली. 31 जानेवारी 2024 रोजी एक हृदय दिल्लीहून चेन्नईला आणण्यात आले.

आयशा 10 महिने पाहत होती हृदयाची वाट 

आयशा 2019 मध्ये पहिल्यांदाच माझ्याकडे आली. आम्हाला सीपीआर करावे लागले आणि कृत्रिम हृदय पंप बसवावा लागला. यानंतर ती पाकिस्तानला गेली पण काही काळानंतर तिला पुन्हा त्रास होऊ लागला. तिला वारंवार रुग्णालयात दाखल करावे लागले. आवश्यक उपकरणे नसल्याने पाकिस्तानमध्ये हे शक्य नव्हते, अशी माहिती डॉ. बालकृष्णन यांनी दिली. आयशासोबत तिची आई होती. आयशा १० महिन्यांपासून हृदयाची वाट पाहत होती आणि तिची आर्थिक परिस्थितीही चांगली नव्हती. म्हणून ऐश्वर्या ट्रस्टच्या सहकार्याने तिला मदत करण्यात आली. आमच्याकडे हृदय प्रत्यारोपण करणारे सर्वात मोठे केंद्र आहोत. आम्ही दरवर्षी सुमारे 100 प्रत्यारोपण करतो, असेही डॉक्टर यावेळी म्हणाले. 

डॉक्टर आणि भारत सरकारचे मानले होते आभार 

आयशाला फॅशन डिझायनर बनायचं. यशस्वी हृदय प्रत्यार्पणानंतर आयशाने डॉक्टर आणि भारत सरकारचे आभार मानले. तिने पुन्हा भारतात परतण्याची इच्छा व्यक्त केली होती. माझे प्रत्यारोपण झाले याचा मला खूप आनंद आहे. मी भारत सरकारचे आभार मानते. मी पुन्हा एकदा भारतात येईन. मी माझ्या मनापासून डॉक्टरांचे आभार मानते, असेही ती म्हणाली. आयशाची आई सनोबरने तिच्या मुलीच्या प्रत्यारोपणाबद्दल आनंद व्यक्त केला. माझी मुलगी 12 वर्षांची होती जेव्हा तिला हदय विकाराचा झटका बसला. तिच्यावर कार्डिओ इम्पॅथी सर्जरी झाली. प्रत्यारोपणानंतरच आयशा जगू शकते, असे डॉक्टरांनी सांगितले होते. एका पाकिस्तानी मुलीच्या आत भारतीय हृदय धडधडतंय, याचा मला आनंद असल्याचे आयशाची आई म्हणाली. हे कधीच शक्य होणार नाही पण ते घडले, असेही त्या पुढे म्हणाल्या.

SOURCE : ZEE NEWS