Home world news marathi युक्रेनचा रशियावर 9/11 सारखा भीषण हल्ला, अमेरिकन ड्रोनचा केला वापर

युक्रेनचा रशियावर 9/11 सारखा भीषण हल्ला, अमेरिकन ड्रोनचा केला वापर

1
0

Source :- ZEE NEWS

Ukraine attacks Russia: गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेले रशिया-युक्रेन युद्ध काही शांत होताना दिसत नाहीत. दिवसेंदिवस याला वेगळे वळण लागतंय. नुकतेच युक्रेन सैन्याने पुन्हा एकदा रशियाच्या कुस्के क्षेत्राला निशाणा बनवत येथे हल्ला चढवला. अमेरिकन निर्मित HIMATS ड्रोनने हा हल्ला चढवल्याची माहिती रशियाने दिली आहे. युक्रेनने रशियावर 9/11 सारखा भीषण हल्ला केलाय. कजान शहरातील बहुमजली इमारतीवर हा ड्रोन हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात इमारतीला भीषण आग लागली आहे. कजान शहरातील बहुमजली इमारतीवर ड्रोन हल्ला  झाल्यानंतर रशियन नागरिक हादरले आहेत. या हल्ल्ल्याला जशास तसे उत्तर दिले जाईल, असे रशियाकडून सांगण्यात आले आहे.

युक्रेन लष्कराने पुन्हा एकदा रशियाच्या कुर्स्क भागाला लक्ष्य केले आहे. युक्रेनियन सैन्याने शुक्रवारी कुर्स्क प्रदेशातील रिल्स्कवर क्षेपणास्त्र हल्ला केला, ज्यात एका मुलासह सहा जण ठार झाले आणि दहा जण जखमी झाले आहेत. असे प्रदेशाचे कार्यवाह गव्हर्नर अलेक्झांडर खिन्श्तेन यांनी याबाबत माहिती दिली. हा हल्ला अमेरिकन बनावटीच्या HIMARS क्षेपणास्त्रांनी करण्यात आल्याचे रशियन अधिकाऱ्याने सांगितले. या हल्ल्यामुळे शहरातील अनेक इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, ज्यात एक कल्चर हाऊस, एक प्राथमिक शाळा आणि रिल्स्क एव्हिएशन कॉलेज आणि रिसर्च क्वार्टर यांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली.

हा हल्ला इतका भीषण होता की अनेक अपार्टमेंटच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि अनेक खासगी घरे तसेच 15 हून अधिक वाहनांचे नुकसान झाले. खिन्श्तेन यांनी टेलिग्राम पोस्टमधून यावर प्रतिक्रिया दिली आहे. जे काही घडले ते आपल्या सर्वांसाठी वाईट आहे. युक्रेनच्या लष्कराकडून वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे आपत्कालीन सेवांचे काम अवघड होत असल्याचे गव्हर्नर म्हणाले. हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांचा बदला घेतला जाईल आणि नष्ट झालेल्या सर्व पायाभूत सुविधांची दुरुस्ती केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी देशवासीयांना दिले. यानंतर रशियाकडून युक्रेनला कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

नागरिंकाना लक्ष्य करतयं युक्रेन- गव्हर्नर 

कार्यवाह गव्हर्नर खिन्श्तेन यांनी त्यांच्या टेलिग्राम चॅनेलवर एक लहान व्हिडीओ शेअर केलाय. ज्यामध्ये त्यांनी युक्रेनवर आरोप केले आहेत. 
युक्रेनकडून “जाणूनबुजून नागरी सुविधा आणि सामाजिक सुविधांना लक्ष्य” केल्याचा आरोप त्यांनी केला. रशियन टेलिग्राम चॅनेल आणि मीडिया आउटलेटवर यासंदर्भातील फोटो प्रसिद्ध झाले आहेत. ज्यातू हल्ल्याची भीषणता कळतेय.  बऱ्याच जळत्या कार आणि बेचिराख झालेल्या इमारती या फोटोत दिसत आहेत.

कुर्स्कजवळ देखील युक्रेनियन हल्ले

रिल्स्क हे युक्रेनियन सीमेपासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर आहे. या शहराची लोकसंख्या साधारण 15 हजार इतकी आहे. 6 ऑगस्ट रोजी कुर्स्क प्रदेशावर हल्ला केल्यानंतर युक्रेनियन सैन्याने ते ताब्यात घेतले. या हल्ल्यात सुमारे 35,000 सैनिक सामील होते. अलिकडच्या काही महिन्यांत त्यांच्या नियंत्रणाखालील क्षेत्र कमी झाले आहे पण ते अजूनही प्रदेशाच्या काही भागांमध्ये अस्तित्व टिकवून आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

SOURCE : ZEE NEWS