Home world news marathi भारताच्या बॉर्डरवर असलेल्या ‘या’ देशाला का बनायचं आहे 100 टक्के हिंदू राष्ट्र?

भारताच्या बॉर्डरवर असलेल्या ‘या’ देशाला का बनायचं आहे 100 टक्के हिंदू राष्ट्र?

6
0

Source :- ZEE NEWS

Nepal monarchy restoration protests hindu nation demands : नेपाळमध्ये राजेशाहीची मागणी केली जात आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक नेपाळला पुन्हा हिंदू राष्ट्र बनवण्याची मागणी करत आहेत. 2006 मध्ये जेव्हा नेपाळने लोकशाही स्वीकारली तेव्हादेश धर्मनिरपेक्ष बनवला गेला. पण आता असे काय झाले आहे की पुन्हा हिंदू राष्ट्र निर्माण करण्याची मागणी होत आहे आणि लोक इतक्या मोठ्या संख्येने रस्त्यावर का आले आहेत? जाणून घेऊया.  

नेपाळची अर्थव्यवस्था आणि प्रशासनाची परिस्थिती गेल्या काही काळापासून खूपच वाईट स्थितीत आहे. अहवालानुसार नेपाळमध्ये भ्रष्टाचार शिगेला पोहोचला आहे. बेरोजगारीमुळे मोठ्या संख्येने तरुण नोकरीच्या शोधात देश सोडून जात आहेत. या अनागोंदी कारभाराचा स्थानिक लोक विविध ठिकाणी निषेध करत आहेत.

नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणाच  निदर्शन सुरू आहेत. येथील जनता अराजकता संपवण्याची मागणी करत आहे.  राजेशाही आणि हिंदू राष्ट्र परत आणण्याची मागणीसाठी येथील जनत अधिकच आक्रमक झाली आहे. आंदोलकांनी मोठ्या संख्येनेपंतप्रधान निवासस्थान आणि संसदेला घेराव घातला.  बिजुली बाजार-बनेश्वर येथे सुमारे 1500 निदर्शक जमले आणि ‘प्रजासत्ताक मुर्दावाद, आम्हाला राजेशाही हवी आहे, नेपाळला हिंदू राष्ट्र घोषित करा’ अशा घोषणा दिल्या. 

नेपाळमध्ये राजेशाहीची मागणी का केली जात आहे?

2006 मध्ये जेव्हा नेपाळचे राजकीय चित्र बदलले. तेव्हा तेथील संसदेने आपल्या अधिकारक्षेत्राबाहेर जाऊन नेपाळला धर्मनिरपेक्ष देश घोषित केले. येथील राजेशाही संपुष्टात आली. माजी राजा ज्ञानेंद्र शाह यांना कोणत्याही वादविवादाशिवाय सत्तेवरून पायउतार व्हावे लागल्याने त्यांच्याबद्दल सहानुभूती वाढली होती. आता नेपाळमध्ये भ्रष्टाचार वाढल्याने येथील जनता पुन्हा राजेशाही लागू करण्याची मागणी करत आहे. इतकचं नाही तर नेपाळला हिंदू राष्ट्र म्हणून घोषीत करण्याची मागणीही देखील आंदोलक करत आहेत.  नेपाळचे विद्यमान अध्यक्ष राम चंद्र पौडेल यांच्यावर पक्षाचे सदस्य म्हणून काम केल्याचा आरोप आहे. त्यामुळे स्थानिक लोकांमध्ये प्रचंड संताप आहे.

SOURCE : ZEE NEWS