Home world news marathi भारताच्या आक्रमक पवित्र्याने पाकिस्तान घाबरला, काय घेतले निर्णय? एकदा वाचाच!

भारताच्या आक्रमक पवित्र्याने पाकिस्तान घाबरला, काय घेतले निर्णय? एकदा वाचाच!

6
0

Source :- ZEE NEWS

Pakistan  scared: पहलगाम दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानं हालचाली सुरू केल्यात. सध्या राजकीय मुत्सद्देगिरी दाखवत भारतानं पाकड्यांना व्हिसा रद्द करणं, अटारी बॉर्डर बंद करणं, सिँधू जल करार स्थगित करणं, दिल्लीतील पाकिस्तानी दुतावास बंद करणं अशी महत्त्वाची पावलं उचललीयत. मात्र पाकिस्ताननं धसका घेतलाय तो भारताच्या लष्करी कारवाईचा.. म्हणून पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला त्यादिवसापासून घाबरलेल्या पाकिस्तानची धावाधाव सुरु झालीय. 

आतातर पाकिस्तानी सैन्याने भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवर तैनाती वाढवली. अनेक चौक्यावर लष्कराची संख्या दुप्पट – तिपटीनं वाढवली. अर्धसैनिक बल असलेल्या चिनाब रेंजर्सची LOCवर नियुक्ती करण्यात आलीय.जम्मू सीमापरिसरात पाककडून 13 चिनाब रेंजर्स,सांबा भागात 14 , कठुआत 26 चिनाब रेंजर्स तैनात करण्यात आलेत. पाकिस्तानी लष्कराकडून सर्व अधिकारी, कर्मचा-यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या. पाकच्या इतर भागांतून LOCवर सैन्य पाठवायचे आदेश देण्यात आलेयत.

दुसरीकडे पाकिस्तानी हवाई दलाचे विमान C-130J मध्यरात्री रावळपिंडीहून भारत-पाकिस्तान सीमेजवळील पाकिस्तान हवाई दलाच्या तळाकडे उड्डाण करत होते. पाक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी हवाई दलाचे वाहतूक विमान मध्यरात्री लाहोरमधून लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांना बाहेर काढत होतं. काल रात्रीही अशीच हालचाल दिसून आली. त्यामुळं पाकिस्तान अजूनही दहशतवाद्यांचा बचाव करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं दिसतंय.

तिकडे पाकिस्तानची भारताच्या आक्रमक पवित्र्याने पाचावर धारण बसलीय. तर इकडे भारतीय लष्करही आता अलर्ट मोडवर आलंय. एकीकडे कालच नौदलाला सज्ज राहण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. तर आज लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी पहलगाममध्ये पोहोचले. त्यांनी तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनीही लष्करप्रमुख आणि आर्मी कमांडर, नॉर्दन कमांड यांच्यासोबत सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. भारतानं इशारा दिल्यापासून पाकिस्तानचे तीन तेरा वाजलेत. म्हणूनच बचावासाठी आता पाकिस्तानी लष्करानं धावाधाव करायला सुरुवात केलीय. मात्र आर्थिक बाजूनं मेटाकुटीला आलेल्या पाकिस्तानला लष्करी पातळीवर जेरीस आणायला भारताला फार वेळ लागणार नाही.

SOURCE : ZEE NEWS