Home world news marathi पृथ्वीवरील एकमेव ठिकाण जिथं कुणीही जाऊन सोनं काढू शकतं; फावडा, कुदळ घेऊन...

पृथ्वीवरील एकमेव ठिकाण जिथं कुणीही जाऊन सोनं काढू शकतं; फावडा, कुदळ घेऊन जा आणि खोदायला सुरुवात करा

2
0

Source :- ZEE NEWS

Ghana Gold Mines :  जगभरात अनेक ठिकाणी सोन्याच्या खाणी आहेत.  या ठिकाणी उत्खननादरम्यान अनेकदा सोने किंवा खजिना सापडतो. मात्र, या खाणींमध्ये कुणालाही उत्खनन करता येत नाही. पृथ्वीवर एक असे ठिकाण आहे जिथे सोन्याच्या खूप खाणी आहे. इंथ मोठ्या प्रमाणात सोनं सापडते. इथं  कुणीही जाऊन सोनं काढू शकतं. 

जगातील सर्वाधिक सोनं चीन, ऑस्ट्रेलिया आणि रशियामध्ये काढले जाते. पण आफ्रिकेतही एक अशी जागा आहे जिथे लोक जमीन खोदून सोने काढतात. आफ्रिकन देश घानामध्ये भरपूर सोन्याचे साठे आढळतात. येथे लोक पाण्याच्या मदतीने माती गाळून सोने काढतात. हे ठिकाण पूर्वी गोल्ड कोस्ट म्हणूनही ओळखले जात जायचे. 

या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोने काढले जाते. येथील मातीत सोने सहज सापडते.  विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणात सोनं आढळते. ग्लोबलडालाच्या मते, 2023 मध्ये घाना सोन्याच्या उत्पादनात सहाव्या क्रमांकावर होता. वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या आकडेवारीनुसार, घाना हा जगातील टॉप 10 सोने उत्पादकांच्या यादीत समाविष्ट असलेला एकमेव आफ्रिकन देश आहे. 5 दशलक्ष औंस सोन्याच्या उत्पादनासह हा देश सहाव्या स्थानावर आहे.

दक्षिण घाना हा देश अनेक वर्षांपासून सोन्याच्या शोधासाठी जगातील सर्वात जास्त उत्पादनक्षम क्षेत्रांपैकी एक म्हणून ओळखला जातो. ज्यामध्ये सोने उत्पादक आणि शोधक दोघांनाही यश मिळाले आहे. 2020 मध्ये घानामध्ये सोन्याचे उत्पन्न अंदाजे 7.2 अब्ज अमेरिकन डॉलर्स होते. 2009  नंतर खनिजापासून मिळणारे हे सर्वाधिक उत्पन्न होते आणि 2019 मध्ये सुमारे 6.2 अब्ज डॉलर्सची नोंद झाली होती. हा आकडा वाढत आहे. 

SOURCE : ZEE NEWS