Source :- ZEE NEWS
Mushtaq Ahmed Zargar: पहलगामच्या हल्ल्यानंतर तपास यंत्रणा वेगानं कामाला लागल्या आहेत. निष्पाप लोकांचा बळी घेणा-या दहशतवाद्यांना सोडू नका, अशी आर्त हाक प्रत्येक भारतीय देतोय. आता या हल्ल्यामागील मास्टरमाईंडचं नाव समोर आलंय..मुश्ताक अहमद झरगर हा पहलगाम हल्ल्यामागील मास्टरमाईंड असल्याचं समोर आलंय.
पहलगामच्या हल्ल्यात 27 निष्पाप जिवांचा बळी घेण्या-या दहशतवाद्यांविरोधात भारतानं आक्रमक भूमिका घेतलीय. पहलगामच्या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचं तपासातून उघड झालंय. पहलगाममधल्या दहशतवाद्यांना लष्करी प्रशिक्षण देण्यात आलं होतं.. जवळपास 15 ते 20 ट्रेनिंग पूर्ण केलेले एसएसजी कमांडो अजूनही घाटीमध्ये असल्याची माहिती आहे. अल उमर मुजाहिदीनचा प्रमुख मुश्ताक अहमद झरगर या हल्ल्यामागील मास्टरमाईंड असल्याचं समोर आलंय.झरगरच्या समर्थकांनीच हल्लेखोरांच्या नेटवर्कला मदत केली होती.
मुश्ताक अहमद झरगर अल-उमर-मुजाहिद्दीनचा प्रमुख आहे. कंदहार विमान प्रकरणात मौलाना मसूद अझहरसह या मुश्ताक झरगरचीही सुटका करावी लागली होती. झरगरच्या दहशतवादी संघटनेवर भारत सरकारनं बंदी घातली आहे. 2023मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेनं झरगरचं घर जप्त केलं होतं. झरगर सध्या पाकिस्तानात आहे पण श्रीनगरचा असल्यानं समर्थकांमध्ये त्याची मजबूत पकड आहे
पहलगाम हल्ल्यानंतर NIAकडून वेगानं तपास सुरू आहे. अनेक संशयितांचीही चौकशी केली जात आहे. आता यातील मास्टरमाईंडबाबतही चौकशी सुरू झालीय.त्यामुळे या हल्ल्यामागील अनेक कांगोरे समोर येण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानींचे खाण्याचे हाल
पाक व्याप्त काश्मीरमध्ये एलओसी परिसरात सध्या रेशनच्या धान्याची कमतरता आहे. म्हणूनच अन्न धान्यासह पिठाचाही साठा पीओकेमधील नागरिक करु लागलेत. यासंदर्भात स्थानिक प्रशासनानंही आदेश दिलेत की पुढील 2 महिन्यांच्या अन्नधान्याचा साठा करुन ठेवावा. त्यामुळं सीमभागातील पाकिस्तानी आपल्या पोटापाण्याची सोय करण्याच्या गडबडीत आहेत. भारत कधी काय कारवाई करेल सांगता येत नाही. याचा धसका पाकिस्तानी सैन्यासह पाकिस्तानी नागरिकांनीही घेतल्याचं दिसतंय.
स्थानिकांवर उपासमारीची वेळ
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या हालचालींनी पाकिस्तानला घाम फुटलाय. युद्धाच्या भीतीनं एकीकडे पाकिस्तानी सैन्य बॉम्बगोळे जमा करु लागलंय. तर दुसरीकडे पाकिस्तानी नागरिक पोटापाण्यासाठी पिठाचा साठा करण्यासाठी धावपळ करु लागलेत. ही दृश्य आहेत पाकव्याप्त काश्मीरमधील. पाकिस्तानी नागरिक मिळेत तेवढा अन्नधान्य आणि पिठाचा साठा आतापासूनच करुन ठेवू लागलेत. कारण पाकव्याप्त काश्मीरमधील या लोकांना माहितीय जर उद्या युद्ध सुरु झालं तर सर्वात आधी पाकिस्तानीच पळ काढतील आणि तिथल्या स्थानिकांवर उपासमारीची वेळ येईल.
तुर्कीयेची साथ
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानची किती घाबरगुंडी उडालीय याचा खरा अंदाज आता यायला सुरूवात झाली. भारताच्या हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानने तुर्कीयेची मदत घेतलीय. तुर्कीयेची युद्धनौका पाकच्या कराची बंदरावर दाखल झालेत. तर तुर्कीयेने पाकिस्तानला शस्त्रास्त्रही पाठवल्याचा दावा करण्यात येतोय.
SOURCE : ZEE NEWS