Home world news marathi थरकाप उडवणारे जगातील ‘घातक’ विमानतळ, भलेभले वैमानिकसुद्धा दचकतात… कुठंयत ‘ही’ ठिकाणं?

थरकाप उडवणारे जगातील ‘घातक’ विमानतळ, भलेभले वैमानिकसुद्धा दचकतात… कुठंयत ‘ही’ ठिकाणं?

10
0

Source :- ZEE NEWS

World Dangerous Airports: लांबच्या प्रवासाला जायचं असल्यास विमानत प्रवास हा अनेकदा एकमेव पर्याय असतो. विमान प्रवास हा खरंतर अनेकांसाठीच कुतूहलाचा विषय. मात्र मागील काही महिन्यांमध्ये सातत्यानं होणारे विमान अपघात पाहता हाच विमानप्रवास अनेकांची धडकी भरवण्यासही कारणीभूत ठरत आहेत. या भीतीत भर घालताहेत ती म्हणजे जगभरात असणारी काही धडकी भरवणाकी विमानतळं. अशी ठिकाणं जिथं विमान उतरवताना भल्याभल्या अनुभवी वैमानिकांनाही घाम फुटतो. नुकतंच The Luxury Travel Expert नं जगातील अशाच काही विमानतळांची यादी जारी केली आहे, जिथं एक लहानशी चूकसुद्धा अनेकांचाच जीव धोक्यात घालू शकते. 

Add Zee News as a Preferred Source

पारो विमानतळ, भूटान
भूटानचं पारो विमानतळ पर्वरांगांच्या मधोमध असून, ते समुद्रसपाटीपासून 2200 मीटरच्या उंचीवर आहे. ज्याच्या आजुबाजूला 5500 मीटर उंचीचे डोंगर आणि पर्वत आहेत. इथं विमानाची ऑटो सिस्टीम काम करत नसून, वैमानिकाला स्वत:च विमानावर नियंत्रण ठेवावं लागतं. इथं जगभरातील फक्त 50 वैमानिकांनाच लँडिंगची परवानगी आहे. 

कूर्शेवेल विमानतळ, फ्रान्स
फ्रान्सचं कूर्शेवेल विमानतळ एका स्की रिसॉर्टपाशी असून त्याची धावपट्टी फक्त 537 मीटरचीच आहे. ही धावपट्टी प्रचंड उतरणीची असून तिथं नाईट लँडिंगचीही सुविधा नाही. ज्यामुळं दृष्टीक्षमतेच्या बळावरच इथं लँडिंग करता येतं. हिवाळ्यात इथं लँडिंग अतिशय धोक्याचं ठरतं. 

मदिरा विमानतळ, पोर्तुगाल 
पोर्तुगालमधील मदिरा विमानतळ समुद्राच्या मधोमध तयार केलं असून, इथं सतत सोसाट्याचा वारा सुटतो आणि त्यामुळं लँडिंग अधिक कठीण होतं. इथं अनेक विमान दुर्घटना झाल्या असून, आता मात्र तिथं नवी धावपट्टी करण्यात आली असून लँडिंगसाठी वैमानिकांना प्रशिक्षण दिलं जात आहे. 

टोंकोटिन विमानतळ, होंडुरास 
होंडुरासचं टोंकोटिन विमानतळ हे पर्वतीय भागांमध्ये असून तिथं विमान लँड करण्याआधी एक तीव्र वळण घ्यावं लागतं. 2008 मध्ये इथंच झालेल्या एका भीषण अपघातात 152 जणांचा मृत्यू ओढावला होता. आजही हे विमानतळ अतिशय घातक असून इथं प्रवासीच नव्हे, वैमानिकही हादरतात. 

लुकला विमानतळ, नेपाळ
नेपाळचं लुकला विमानतळ हे सर्वाधिक घातल असून, त्यास टेंजिंग-हिलरी विमानतळ असंही म्हणता. समुद्रसपाटीपासून  2,860 मीटर इतक्या उंचीवर असणाऱ्या या विमानतळावर 527 मीटरचीच धावपट्टी आहे. इथं एका बाजूला उंच डोंगररांगा आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी आहे. इथं लँडिंगसाठी विमान थेट धावपट्टीवर आणावं लागतं, ज्यामुळं अनुभवी वैमानिकापुढंही अनेक आव्हानं असतात. 

SOURCE : ZEE NEWS