Source :- ZEE NEWS
China reacts to Donald Trump’s Tariffs: अमेरिकेनं चीनसंदर्भात कोणतीही सहानुभूती न दाखवता या आशियाई राष्ट्राला इंगा दाखवणं सुरूच ठेवलं आहे. सातत्यानं केल्या जाणाऱ्या आयात शुल्काच्या माऱ्यादरम्यान आता पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्त्वातील अमेरिकी शासनाच्या वतीनं चीनवर एकूण 245 टक्क्यांचं आयात शुल्क आणि त्यासंदर्भातील निर्बंध लागू केले आहेत. व्हाईट हाऊसच्या वतीनं यासंदर्भातील माहिती जारी करण्यात आली. ज्यामुळं या नव्या निर्बंधांमुळं अमेरिका आणि चीन यांच्यातील तणावात आणखी भर पडल्याचं म्हटलं जात आहे.
ट्रम्प प्रशासनाच्या वतीनं सातत्यानं डिवचलं जात असतानाच आता या नव्या निर्णयासंदर्भातसुद्धा एक अतीव महत्त्वाची प्रतिक्रिया देत चीननं अमेरिकेचच नव्हे संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं आहे. रॉयटर्सच्या माहितीनुसार चीननं यावर प्रतिक्रिया देत अमेरिकेला थेट इशारा दिला. टॅरिफ संदर्भातील हा खेळ सुरूच ठेवला तर, चीन या गोष्टींकडे सपशेल दुर्लक्ष करेल अशीच ठाम भूमिका चीनच्या वतीनं मांडण्यात आली.
दरम्यान, अमेरिकेनं चीनला डिवचणं सुरू ठेवलेलं असतानाच 75 देश आपल्या या निर्णय आणि कराराशी सहमत असून, व्यापारासाठी तयार असल्याचं महासत्ता राष्ट्राकडून जाहीर करण्यात आलं. ज्या देशांनी सहकार्य करण्याची तयारी दाखवली, त्यांच्यावर सध्यातरी कोणतंही वाढीव आयातशुल्क लागू करण्यात आलं नसल्याचं अमेरिकेकडून सांगण्यात आलं. चीननं अमेरिकेच्या कारवाईला उत्तर देत उचललेल्या पावलामुळंच या देशा ला 245 टक्के आयात शुल्काचा भुर्दंड सोसावा लागत आहे, असंच अमेरिकेकडून वारंवार अधोरेखित करण्यात येत आहे.
व्हाईट हाऊसनं जारी केलेल्या फॅक्ट शीटमध्ये काही गंभीर आरोप लावण्यात आले असून, चीननं अमेरिकेच्या गॅलियम, जर्मेनियम, एंटीमनी आणि इतर हायटेक समाग्रीवरील निर्यातीवर बंदी आणणल्याचा इथं उल्लेख करण्यात आला आहे. या सामग्रीचा वापर लष्करी सेवांसाठीच्या कामासाठी केला जात असून, अडचणी वाढत असल्यामुळंच अमेरिकेनं चीनच्या या भूमिकेवर नाराजीचा सूर आळवला.
चीननं सहा मौल्यवान धातूंसह अनेक इतरही काही महत्त्वाच्या वस्तूंच्या निर्यातीवर बंदी आणल्यामुळं जगभरातील पुरवठा साखळीवर याचा परिणाम व्हावा हा यामागचा हेतू असल्याचा आरोप अमेरिकेनं चीनवर केला आहे. तेव्हा आता या Tariff War मध्ये पुढं नेमकं काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.
SOURCE : ZEE NEWS