Home world news marathi ज्योतीचं बांगलादेश कनेक्शन; बांगलादेशला गोपनीय माहिती दिल्याचा संशय

ज्योतीचं बांगलादेश कनेक्शन; बांगलादेशला गोपनीय माहिती दिल्याचा संशय

6
0

Source :- ZEE NEWS

पाकिस्तानसाठी हेगगिरी करणारी गद्दार युटुबर ज्योती मल्होत्राचं आता बांगलादेश कनेक्शनसमोर आलंय. पाकिस्तान आणि चीननंतर ज्योती बांगलादेशमध्येही जाऊन आल्याचं समोर आलंय. आता ज्योतीच्या बांगलादेश कनेक्शनचीही चौकशी केले जाणाराय. त्यामुळे ज्योतीने ज्योतीसोबतच शत्रूराष्ट्रांना अजून काही गोपनीय माहिती दिलीय काय याचा तपास केला जातोय.

गद्दार ज्योतीचं बांगलादेश कनेक्शन

ज्योतीचा बांगलादेशमधील व्हिडीओ समोर

बांगलादेशलाही गोपनीय माहिती दिल्याचा संशय

गद्दार ज्योती मल्होत्राचे रोज नवनवे कारनामे समोर येताहेत. पाकिस्तानसाठी हेगगिरी केल्याच्या आरोपाखाली ज्योती मल्होत्राच्या मुसक्या आवळल्यात. पाकिस्तान आणि चीननंतर ज्योतीचं आता बांगलादेश कनेक्शनही समोर आलंय. आतापर्यंत ज्योतीने बांगलादेशच्या व्हिसासाठी अर्ज केला होता अशी माहिती समोर आली होती. मात्र गद्दार ज्योतील ही बांगलादेशमध्येही जाऊन आल्याची माहिती समोर आलीय. ज्योतीचा बांगलादेशातील व्हिडिओ आता समोर आलाय. हरियाणा पोलिस आणि केंद्रीय तपास संस्थांकडून ज्योतीची चौकशी सुरू आहे. आता ज्योतीच्या बांगलादेश दौऱ्याचीही चौकशी केली जाणाराय.

 ज्योतीचं बांगलादेश कनेक्शन 

  1. ज्योतीचा बांगलादेशमधील व्हिडीओ समोर 
  2. ज्योती फेब्रुवारी 2024 मध्ये बांगलादेशला गेली होती
  3. ऑगस्ट 2024 मध्ये शेख हसीना सरकार उलथून टाकण्यात आलं
  4. शेख हसीना सरकार उलथवून टाकण्यात ढाका विद्यापीठातील विद्यार्थांचा मोठा सहभाग होता 
  5. बांगलादेश दौऱ्यात ज्योतीने ढाका विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला
  6. ढाका विद्यापीठात ज्योतीने व्हिडिओही बनवले होते
  7. ज्योतीच्या बांगलादेश भेटीमागे पाक दुतावासातील अधिकारी दानिशचा कट होता का?

ज्योतीचं पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयची कनेक्शन स्पष्ट झालंय. ज्यातीने भारताशी गद्दारी करत पाकला गोपनीय माहिती दिल्यासंदर्भात चौकशी सुरू आहेत. या चौकशीत ज्योतीचं बांगलादेश कनेक्शनही समोर आलंय. त्यामुळे बांगलादेश दौऱ्याचा ज्योतीचा नेमका हेतू काय होता याचा तपास आता सुरू करण्यात आलाय.

SOURCE : ZEE NEWS