Home world news marathi जुलैमध्ये मोठी त्सुनामी येणार, शहर बुडण्याची भीती, बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार?

जुलैमध्ये मोठी त्सुनामी येणार, शहर बुडण्याची भीती, बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार?

7
0

Source :- ZEE NEWS

जपानमध्ये जुलै 2025 मध्ये मोठी त्सुनामी येण्याची भविष्यवाणी करण्यात आली आहे. यामुळे जपानला प्रवास करणाऱ्या पर्यटकांच्या चितेंत भर पडली असून, अनेकांनी तिकीट रद्द केल्या आहेत. प्रवास रद्द करणाऱ्यांचं प्रमाण 83 टक्क्यांवर पोहोचलं आहे. जपानी मंगा कलाकार र्यो तात्सुकीला ‘नवी बाबा वांगा’ म्हणूनही ओळखले जाते. तिने ही भविष्यवाणी केली आहे. गार्डियनने वृत्त दिलं आहे की, तिचा मंगा, ‘The Future I Saw’, 5 जुलै 2025 रोजी एका विनाशकारी आपत्तीचा अंदाज वर्तवतो. काहींनी याचा अर्थ जपान आणि फिलीपिन्समधील समुद्राखालील विभाजनामुळे निर्माण होणारी त्सुनामी किंवा भूकंप असा लावला आहे.

या भविष्यावाणीला काही वैज्ञानिक आधार नसला तरी याआधी तिने केलेल्या अचूक अंदाजांमुळे विश्वासार्हता मिळाली आहे. 2011 मध्ये जपानमध्ये झालेला तोहोकू भूकंप, त्सुनामी, 18 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू आणि फुकुशिमा दाईची अणुऊर्जा आपत्ती हे अंदाज तिने वर्तवले होते. 

प्रवासाच्या तिकीटात घसरण

तात्सुकीच्या भाकितामुळे जपानला जाणाऱ्या विमानांच्या बुकिंगमध्ये 83 टक्के घट झाली आहे. पूर्व आशियातील पर्यटक त्सुनामीच्या भितीने प्रवास रद्द करत आहेत. ब्लूमबर्ग इंटेलिजेंसनुसार, हाँगकाँगमधून होणाऱ्या विमानांच्या बुकिंगमध्ये वर्षानुवर्षे 50 टक्के घट झाली आहे. जूनच्या अखेरीस आणि जुलैच्या सुरुवातीच्या काळात होणाऱ्या बुकिंगमध्ये 83 टक्के इतकी घट झाली आहे.

हाँगकाँगमधील एका वाहतूक कंपनीने एप्रिल-मेच्या वसंत ऋतूच्या सुट्टीत जपानला जाणाऱ्या बुकिंगमध्ये 50 टक्के घट झाल्याचे वृत्त दिले आहे. अनेक प्रवाशांनी या भाकितामुळे उन्हाळी बुकिंग रद्द केलं असून प्रवास पुढे ढकलला आहे.

जपानचं पर्यटकांना आवाहन

जपानी अधिकाऱ्यांनी जनतेला तात्सुकीच्या भाकितांकडे दुर्लक्ष करण्याचं आवाहन केलं. हे पूर्णपणे निराधार असून, त्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. “सोशल मीडियावरील निराधार आणि अवैज्ञानिक अफवांचा प्रसार पर्यटनावर झाला तर ती एक मोठी समस्या ठरेल. करण्याचे कारण नाही कारण जपानी लोक परदेशात पळून जात नाहीत, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. मला आशा आहे की लोक अफवांकडे दुर्लक्ष करतील आणि प्रवास करतील,” असं मियागी प्रांताचे गव्हर्नर योशिहिरो मुराई म्हणाले.

जपानी अधिकाऱ्यांना तात्सुकीच्या भाकितांव्यतिरिक्त भूकंपाच्या धोक्यांबद्दल चिंता आहे. एप्रिलमध्ये एका सरकारी टास्क फोर्सने इशारा दिला होता की जपानच्या पॅसिफिक किनाऱ्याजवळ एका मोठ्या भूकंपामुळे 2 लाख 98 हजार लोकांचा मृत्यू होऊ शकतो, ज्यामुळे देश भूकंपाच्या हालचालींसाठी असुरक्षित आहे.
तात्सुकीनेही तिची भाकितं फार गांभीर्याने घेऊ नये असं सांगितलं आहे. लोकांना तज्ज्ञांच्या मतांचा विचार करण्याचा आणि भाकितेमुळे अनावश्यकपणे प्रभावित होऊ नये असा सल्ला दिला आहे.

तात्सुकीने याआधी वर्तवलेली भाकितं

1995 चा कोबे भूकंप: तात्सुकीने या विनाशकारी भूकंपाचं भाकित केलं होतं.

2011चा तोहोकू भूकंप आणि त्सुनामी: तिने या आपत्तीची भविष्यवाणी केली होती, ज्यामधे 22 हजारांहून अधिक लोक मृत्युमुखी पडले. 

कोविड-19: तात्सुकीचे पुस्तक, The Future I Saw मध्ये 2020 मध्ये विषाणूच्या प्रादुर्भावाचे संकेत दिले होते, जे कोविड-19 साथीच्या आजाराशी जोडलेले आहे.

फ्रेडी मर्क्युरीचा मृत्यू: तिने राणीच्या मृत्यूची देखील भविष्यवाणी केली होती.

SOURCE : ZEE NEWS