Home world news marathi उरलीयेत फक्त पाच वर्ष; 2030 पर्यंत 500000000 नागरिकांना ‘या’ गंभीर व्याधीचा विळखा,...

उरलीयेत फक्त पाच वर्ष; 2030 पर्यंत 500000000 नागरिकांना ‘या’ गंभीर व्याधीचा विळखा, लँसेट अहवालामुळं चिंता वाढली

4
0

Source :- ZEE NEWS

Shocking News : जगाची एकंदर प्रगती पाहता ज्या वेगानं गोष्टी बदलत आहेत, तो वेगच अनेकांना भारावून सोडणारा आहे. प्रत्येक क्षेत्र या बदलत्या युगात तितक्याच वेगानं पुढे जात आहे. मात्र जगभरातील नागरिकांच्या आरोग्याची वाटलाच मात्र अधोगतीच्या मार्गानं होत आहे हीच शोकांतिका. विविध विषाणूजन्य आजारांनी एकिकडे आरोग्य यंत्रणांची डोकेदुखी वाढवलेली असतानाच आणखी एक काही अंशी मानवनिर्मित संकटही येत्या काळात आणखी गडद होणार असल्याचं दाहक वास्तव लँसेटच्या एका अहवालामुळं समोर आलं आहे. 

जगभरात वाढता स्क्रीनटाईम आणि व्ययामाचं घटणारं प्रमाण पाहता एक मोठा वर्ग येत्या काळात स्थुलतेच्या समस्येशी झगडताना दिसेल. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार स्थुलताहा फक्त प्रगत देशांतील नागरिकांपुरताच सीमित राहिला नसून, आता ही समस्या निम्न आणि मध्यम उत्पन्न श्रेणीत येणाऱ्या देशांनासुद्धा विळखा घालताना दिसत आहे. लँसेटचा नुकताच समोर आलेला अहवाल या समस्येचं गांभीर्यच अधोरेखित केलं आहे. 

लँसेट अहवालानुसार पुढील 5 वर्षांमध्ये अर्थात 2030 पर्यंत जगभरातील जवळपास 50 कोटींहून अधिक तरुण स्थुलता अर्थात प्रमाणाहून वजन वाढण्याच्या समस्येचा सामना करताना दिसेल. लँसेट कमिशन ऑन एडलसेंट हेल्थ एंड वेलबिइंगकडून प्रकाशित करण्यात आलेल्या या अहवालानुसार, 2030 पर्यंत 464 मिलियन म्हणजेच 46.4 कोटी तरुणवर्ग स्थुलतेच्या समस्येचा सामना करताना दिसेल. लॅटिन अमेरिका, कॅरेबियन, उत्तर आफ्रिका आणि मध्यपूर्व देशांमध्ये ही समस्या अधिक गंभीर स्तर गाठेल असाही इशारा लँसेटनं जारी केला आहे. 

स्थुलतेकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज 

स्थुलताही समस्या गेल्या काही वर्षांमध्ये अनेक आजारपणांना निमंत्रण देणारी शारीरिक व्याधी ठरत असून, यामध्येसुद्धा विविध स्तर असून, गंभीर प्रकरणांमध्ये वैद्यकिय सल्ला घेण्याचीसुद्धा गरज भासू शकते. स्थुलतेचा थेट संबंध टाईप 2 मधुमेह, स्ट्रोक, काही प्रकारचा कर्करोग याच्याशी जोडला जात असून, जेव्हा बॉडी मास इंडेक्स 30 किंवा त्याहून जास्त असतं तेव्हा ती व्यक्ती स्तुलतेच्या गटात गणली जाते. याचा परिणाम फक्त शारीरिकच नव्हे तर, मानसिक आरोग्यावरही होतो. ज्यामुळं जीवनशैलीत सकारात्मक बदल करत स्थुलतेवर वेळी उपचार केलं जाणंही तितकंच महत्त्वाचं ठरत आहे. 

SOURCE : ZEE NEWS