Home world news marathi आकाशातून विमान थेट रस्त्यावर, गाड्यांचा चक्काचूर; कॅमेऱ्यात कैद झाली हादरवणारी दुर्घटना, पाहा...

आकाशातून विमान थेट रस्त्यावर, गाड्यांचा चक्काचूर; कॅमेऱ्यात कैद झाली हादरवणारी दुर्घटना, पाहा VIDEO

16
0

Source :- ZEE NEWS

A Plane Lands crashed on cars: अमेरिकेत रहदारीच्या रस्त्यावर विमान थेट रस्त्यांवरुन विमानाला धडकल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेत ही घटना घडली आहे. सोमवारी विमानाचं इमर्जन्सी लँडिग करण्यात आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानाकडे विमानतळावर पोहोचण्याइतकी पुरेशी पॉवर नसल्याने पायलटला जॉर्जियाच्या गेनेसविले येथील एका वर्दळीच्या रस्त्यावर सिंगल-इंजिन प्रशिक्षण विमान उतरवावं लागलं.

Add Zee News as a Preferred Source

या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये विमान वर्दळीच्या रस्त्यावर उतरताना आणि नंतर अनेक वाहनांना धडकताना दिसत आहे. पोलिसांनी सांगितले की या दुर्घटनेत अनेक जण किरकोळ जखमी झाले आहेत.

पोलिसांनी सांगितलं की, विमान उतरल्यानंतर विमानाचा उजवा पंख एका वाहनाला धडकला आणि विमानाची इंधन टाकी सैल झाली. विमानाचा पंखा एसयूव्हीच्या मागील बाजूने वाहनात गेला होता. विमान दुर्घटनेनंतर रस्ता बंद करण्यात आला होता. यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. 

राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाने सांगितले की, विमान गेनेसविलेच्या ली गिल्मर मेमोरियल विमानतळावरून कॅन्टनमधील चेरोकी काउंटी प्रादेशिक विमानतळाकडे जात असताना ही घटना घडली. “उड्डाण केल्यानंतर काही वेळातच, वैमानिकाला इंजिनमध्ये समस्या आल्या आणि त्याने गेनेसविलेकडे परत जाऊन तेथे उतरण्याचा निर्णय घेतला,” असं एनटीएसबीने म्हटलं आहे.

“विमानतळावर पोहोचण्यासाठी विमानात पुरेशी शक्ती नव्हती, म्हणून वैमानिकाने रस्त्यावर उतरवले, जिथे विमान तीन वाहनांना धडकलं,” असंही त्यांनी सांगितलं आहे. 

फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) नुसार, हॉकर बीचक्राफ्ट BE-36 च्या पायलटने इंजिनमधील बिघाडामुळे आपत्कालीन लँडिंग केले, जे दुपारी 12.10 (स्थानिक वेळेनुसार) च्या सुमारास नोंदवले गेले. FAA अधिकाऱ्यांनी सांगितले की एजन्सी या घटनेची चौकशी करेल.

SOURCE : ZEE NEWS