Home world news marathi Viral Video: पाकिस्तानचे पंतप्रधान अमेरिकेच्या हातचं बाहुलं? बैठकीत एका इशाऱ्यावर काय घडलं...

Viral Video: पाकिस्तानचे पंतप्रधान अमेरिकेच्या हातचं बाहुलं? बैठकीत एका इशाऱ्यावर काय घडलं बघाच

9
0

Source :- ZEE NEWS

World News: वॉशिंग्टनमधील ‘बोर्ड ऑफ पीस’ (Board Of Peace) कार्यक्रमात शाहबाज शरीफ आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओची जगभर चर्चा सुरू झाली. जाणून घ्या नेमकं काय घडलं. अमेरिकेतील “बोर्ड ऑफ पीस” कार्यक्रमात पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील भेट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.या कार्यक्रमाच्या व्हिडिओंमध्ये शाहबाज शरीफ अमेरिकन राष्ट्राध्यक्षांबद्दल असाधारण आदर आणि उबदारपणा दाखवताना दिसत आहेत , ज्यामुळे सोशल मीडियावर एक नवीन वाद निर्माण झाला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

नेमकं काय घडलं?

स्टेजवर एक क्षण असा आला जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या भाषणाच्या मध्यभागी शाहबाज शरीफकडे बोट दाखवत म्हटले, “कृपया उभे राहा.” शाहबाज शरीफ लगेच त्यांच्या जागेवर उभा राहिले

व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये शाहबाज शरीफ ट्रम्प यांचे स्वागत करताना दिसत आहेत. एका क्लिपमध्ये ते वाकून मिठी मारताना दिसत आहेत.

ट्रम्प यांनी ‘हे’ बोलताच शाहबाज उभे राहिले

याव्यतिरिक्त, स्टेजवरून खाली उतरताना, शरीफ यांनी हाताने एक छोटासा इशारा केला ज्याचा अर्थ सोशल मीडिया वापरकर्ते “सॅल्यूट” असा घेत आहेत. जरी ते औपचारिक असलं तरी यात पराधीनता दिसत होती अशी नेटकऱ्यांनी कमेेट केली आहे.

हा पाहा व्हिडीओ…

ट्रम्प यांचं कौतुक केलं अन्…

त्याच कार्यक्रमाच्या उद्घाटन बैठकीत, शाहबाज शरीफ यांनी ट्रम्प यांचे कौतुक केले. ते म्हणाले की ट्रम्पच्या हस्तक्षेपामुळे भारत आणि पाकिस्तानमधील संभाव्य मोठा संघर्ष टळला आहे. त्यांनी ट्रम्प यांना “शांतताप्रिय व्यक्ती” अशी प्रशंसा केली आहे. 

SOURCE : ZEE NEWS