Home world news marathi India Pakistan Tensions : सिंधू पाणी करारबद्दल मोठी अपडेट; भारत सरकारने घेतला...

India Pakistan Tensions : सिंधू पाणी करारबद्दल मोठी अपडेट; भारत सरकारने घेतला मोठा निर्णय

7
0

Source :- ZEE NEWS

India Pakistan Tensions : भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा इशारा दिलाय. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद थांबवत नाही तोपर्यंत सिंधू पाणी करार स्थगितच राहणार असल्याचं एस.जयशंकर यांनी म्हटलंय. तसंच पहिल्यांदाच अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत देखील एस.जयशंकर यांनी संवाद साधलाय. 

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला इशारा दिलाय. जोपर्यंत पाकिस्तानकडून सुरू असलेला दहशतवाद थांबत नाही, तोपर्यंत सिंधू पाणी करार स्थगित राहणार असल्याचं एस. जयशंकर यांनी म्हटलंय, पाकिस्तान नेहमीच दहशतवाद्यांना पाठिंबा देत राहिलाय. तसंच दहशतवाद्यांना लपण्यासाठी देखील पाकिस्तान मदत करतो. त्यामुळे याचा फटका पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावर बसताना दिसतोय. त्यामुळे वेळीच पाकिस्ताननं दहशतवाद्यांवर आळा न घातल्यास पाण्याच्या थेंबाथेंबासाठी त्यांना तरसावं लागणार.

भारताचा सल्ला न ऐकणं पाकला महागात 

आम्ही फक्त दहशतवाद्यांच्या तळावरच हल्ला केला हे पाकिस्तानला आम्ही सांगितलं होतं

पाकिस्तानी सैन्याला यात हस्तक्षेप न करण्याचा सल्ला देखील दिला होता

मात्र, पाकिस्तानी सैन्याला दिलेला पर्याय त्यांनी स्वीकारला नाही

भारतानं केलेल्या प्रतिहल्ल्यात पाकचं मोठं नुकसान झालं, त्याचे पुरावे देखील दिले

त्यामुळे युद्धबंदी कोणाला हवी होती? हे यावरून स्पष्ट होतं

भारत-पाकिस्तानमध्ये शस्त्रबंदी झाली असली तरी भारताचे परराष्ट्रमंत्री अनेक देशांच्या संपर्कात आहेत. एस. जयशंकर यांनी अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री यांच्यासोबत चर्चा केलीय.

अफगाणिस्तानकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पहिल्यांदाच तालिबानच्या परराष्ट्र मंत्र्‍यांशी अधिकृत संवाद साधला.

हा संवाद ऐतिहासिक ठरलाय. कारण भारताने तालिबान प्रशासनाशी केलेला हा पहिला मंत्रीस्तरीय संपर्क आहे.

अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे

पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारतानं सिंधू पाणी करार स्थगित करत पाकिस्तानला मोठा धक्का दिलाय. दरम्यान यानंतर पाकिस्तान भारताला नेहमीच पोकळ धमक्या दिल्यात. मात्र, भारत-पाकमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर सिंधू पाणी करारावरची स्थगिती उठवण्यात यावी अशी मागणी पाकिस्ताकडून करण्यात येतेय मात्र, जोपर्यंत दहशतवादाला खतपाणी घालणं पाकिस्तान बंद करत नाही तोपर्यंत सिंधू पाणी करार स्थगित राहणार असल्याचा इशारा भारताकडून देण्यात आला आहे. 

SOURCE : ZEE NEWS