Source :- ZEE NEWS
Greenland Shark Longest Living Marine Animal : पृथ्वीवर कुणीच अमर नाही. प्रत्येक सजीवाचा अंत हा निश्चित आहे. मात्र, प्रत्येकाचा आयुष्य जगण्याचा कालावधी हा वेगवेगळा आहे. काही जीवांचे आयुष्य काही क्षणाचे, काही तासांचे, काही महिन्याचे तर काही वर्षाचे असते. मात्र, 6500 खोल समुद्रात असलेला पृथ्वीवरील सर्वाज डेंजर मासा 500 वर्ष जिवंत राहतो. हा मासा सर्वांना माहित आहे. मात्र, तरी देखील 99 टक्के लोकांना या माशाचे नाव सांगता येणार नाही.
या माशाचे नाव आहे शार्क मासा. जगभरात शार्क मशाचा हजारो प्रजाती आढतो. शार्क मासा हा पृथ्वीवरील सर्वात भयानक शिकारी मासा म्हणून ओळखला जातो. ग्रीनलँड शार्क ही सागरी जगातील सर्वात अद्वितीय प्रजातींपैकी एक आहे. या स्लीपर शार्क किंवा ग्रे शार्क असेही म्हणतात. त्याचे वैज्ञानिक नाव सोम्निओसस मायक्रोसेफलस आहे. हा शार्क 300 ते 500 वर्षे जगू शकतो, ज्यामुळे तो जगातील सर्वात जास्त काळ जगणारा पृष्ठवंशी प्राणी आहे.
ग्रीनलँड शार्क हे 1 ते 8 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानात सहज जगू शकते. ग्रीनलँड शार्क मासे हे ग्रीनलँड, आइसलँड, नॉर्वे आणि कॅनडाच्या आर्क्टिक प्रदेशात आढळतात. या खास वैशिष्ट्यामुळे ते इतर शार्क प्रजातींपेक्षा वेगळे आहे. ग्रीनलँड शार्क मासे अत्यंत खोल समुद्रात राहतात. 6500 फूट खोल समुद्रात हे मासे राहतात. आर्क्टिक आणि अटलांटिक महासागरांत जिथे मानव पोहचू शकत नाहीत तिथे हे ग्रीनलँड शार्क मासे राहतात. यामुळे यांच्यावर अधिक संशोधन करणे अशक्य आहे.
ग्रीनलँड शार्क माशांचा वेग खूपच कमी आहे. यांचा वेग फक्त 0.3 मीटर प्रति सेकंद इतका आहे. पोहण्याचा स्पीड कमी असला तरी ते अत्यंत धोकादायक शिकारी मानले जातात. सील, मासे आणि स्क्विड सारख्या सागरी प्राण्यांची ते सहज शिकार करतात. ग्रीनलँड शार्क मासे 300 ते 500 वर्षे जगू शकतात. शास्त्रज्ञांनी यांच्या दीर्घायुष्याचे आश्चर्यकारक रहस्य शोधले आहे. स्नायूंच्या चयापचय क्रियेमुळे हे शार्क मासे आकारेने मोठे झाले तरी तितकेच सक्रिय राहतात.
मँचेस्टर विद्यापीठातील पीएचडी विद्यार्थी इव्हान कॅम्पलिसन यांनी एका संशोधनात म्हटले आहे की, ग्रीनलँड शार्कचे चयापचय वयानुसार बदलत नाही. बहुतेक जीवांमध्ये, वाढत्या वयानुसार चयापचय दर कमी होतो. पण या शार्कमध्ये असे घडत नाही, जे त्याच्या दीर्घ आयुष्याचे रहस्या आहे.
ग्रीनलँड शार्कचे आयुष्यमान 500 वर्षांपर्यत असले तरी पर्यावरणीय बदलामुळे ते धोक्यात आले आहे. 150 वर्षांच्या वयात लैंगिकदृष्ट्या हे मासे प्रौढ होतात. ज्यामुळे त्याची लोकसंख्या हळूहळू वाढते. हवामान बदल आणि सागरी प्रदूषण यामुळे या शार्क माशांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
SOURCE : ZEE NEWS