Home LATEST NEWS ताजी बातमी BBC च्या पत्रकार सर्वप्रिया सांगवान यांचा ‘दानिश सिद्दिकी पत्रकारिता’ पुरस्काराने गौरव

BBC च्या पत्रकार सर्वप्रिया सांगवान यांचा ‘दानिश सिद्दिकी पत्रकारिता’ पुरस्काराने गौरव

3
0

Source :- BBC INDIA NEWS

सर्वप्रिया सांगवान
25 फेब्रुवारी 2025

अपडेटेड 1 तासापूर्वी

‘दानिश सिद्दिकी जर्नालिझम अवॉर्ड 2025’ च्या विजेत्यांची आज (4 मे) नावं जाहीर करण्यात आली.

दिल्ली येथे पार पडलेल्या पुरस्कार वितरण समारंभात बीबीसीच्या पत्रकार सर्वप्रिया सांगवान यांना ‘दानिश सिद्दिकी जर्नालिझम अवॉर्ड 2025’ ने गौरवण्यात आलं आहे.

सर्वप्रिया सांगवान यांना हा पुरस्कार त्यांच्या ‘द लास्ट मॅन’ या हिंदी सीरीजला ब्रॉडकास्ट/डिजिटल विभागात देण्यात आला आहे.

पुरस्कार समितीच्या पत्रकानुसार, सर्वप्रिया सांगवान यांनी या मालिकेत सखोल आणि प्रत्यक्ष ग्राऊंडवर उतरून केलेल्या वार्तांकनाद्वारे भारतातील अत्यंत वंचित समुदायांचे जीवन आणि त्यांचे सामाजिक-राजकीय संघर्ष प्रभावीपणे मांडले आहे.

यापूर्वी ‘जर्नलिस्ट ऑफ द इयर’ पुरस्कार

काही दिवसांपूर्वीच, म्हणजे 23 फेब्रुवारी रोजी ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन अल्युमनी असोसिएशन’नं IMCA अवॉर्ड्स 2025 च्या विजेत्यांची घोषणा केली होती.

दिल्लीमध्ये आयोजित या पुरस्कार समारंभात बीबीसीच्या पत्रकार सर्वप्रिया सांगवान यांना ‘जर्नलिस्ट ऑफ द इयर’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.

पुरस्कार स्वीकारताना बीबीसीच्या पत्रकार सर्वप्रिया सांगवान

सन्मानचिन्ह, प्रमाणपत्रासह दीड लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. सर्वप्रिया यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.

याशिवाय इतर श्रेणीतील उर्वरित विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्रासह प्रत्येकी 50 हजार रुपयांचं रोख बक्षीस देण्यात आलं.

2024 साली सर्वप्रिया सांगवान यांनी पत्रकारिता क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांची ‘जर्नलिस्ट ऑफ द इयर’ अवॉर्डसाठी निवड करण्यात आली.

दरम्यान, त्यांची ‘द लास्ट मॅन’ या सिरीजची खूप चर्चेत राहिली. या सिरीजच्या माध्यमातून त्यांनी तळागाळातील वास्तव्य अत्यंत साध्या आणि प्रभावी पद्धतीनं प्रेक्षकांपर्यंत पोहचवलं.

‘द लॉस्ट मॅन’ या सिरीजसाठी त्यांनी मराठवाड्यातील पाणी संकटावर वार्तांकन केलं होतं. गेल्या अनेक दशकांपासून मराठवाड्यातील दुष्काळाचा प्रभाव येथील जनमानसावर कसा पडत आहे, त्यातून निर्माण झालेल्या कृषी समस्या, बेरोजगारी या प्रश्नांचा ऊहापोह त्यांनी त्यांच्या डॉक्युमेंटरीमध्ये केला होता.

जालन्यातील सामान्य जनतेशी बातचीत करुन त्यांनी या प्रश्नाचं स्वरूप समजून घेतलं होतं. याच प्रकारे त्यांनी देशातील विविध भागांना भेट देऊन स्थानिक प्रश्न समजून घेत त्याचे वार्तांकन केले होते.

या सिरीजचे आठ एपिसोड होते, ते पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

याशिवाय, 2024 मध्ये त्यांनी केलेल्या इतर रिपोर्ट्स आणि मुलाखतींचाही विचार करण्यात आला.

X पोस्टवरून पुढे जा

परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी ‘स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा’.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

मजकूर उपलब्ध नाही

Xवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

त्यांनी केलेले इतर वार्तांकन तसेच मुलाखतींचाही विचार करण्यात आला.

रामनाथ गोएंका पुरस्कारानेही झाल्या होत्या सन्मानित

2020 साली सर्वप्रिया सांगवान यांना प्रतिष्ठित ‘रामनाथ गोएंका’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.

भारतातील अणु प्रकल्पामुळे संकटात सापडलेल्या लोकांवर आधारित त्यांच्या स्टोरीसाठी देण्यात आला होता.

सर्वप्रिया सांगवान

फोटो स्रोत, INDIANEXPRESS

सर्वप्रिया सांगवान यांच्या या रिपोर्टमधून झारखंडमधील जादूगोडा येथील युरेनियममुळे प्रभावित झालेल्या लोकांची व्यथा मांडण्यात आली होती.

भारताच्या अणु प्रकल्पाच्या स्वप्नांची किंमत सामान्य माणसाला का मोजावी लागत आहे? असा महत्त्वाचा प्रश्न या रिपोर्टमधून उपस्थित करण्यात आला.

सर्वप्रिया सांगवान यांना पर्यावरण आणि विज्ञान श्रेणीत ब्रॉडकास्ट पत्रकारितेसाठी हा पुरस्कार देण्यात आला होता.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC