Home LATEST NEWS ताजी बातमी आर्टेमिस 2 मोहीम : अंतराळवीर पृथ्वीवर परतले ‘तो’ क्षण

आर्टेमिस 2 मोहीम : अंतराळवीर पृथ्वीवर परतले ‘तो’ क्षण

12
0

Source :- BBC INDIA NEWS

आर्टेमिस 2 मोहीम : अंतराळवीर पृथ्वीवर परतले ‘तो’ क्षण

2 तासांपूर्वी

नासाच्या आर्टेमिस-2 मोहिमेतील अंतराळवीर 9 दिवसांपेक्षा जास्त कालावधीची चांद्रयान मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करून पृथ्वीवर सुखरूप परतले आहेत.

अंतराळवीरांना घेऊन जाणारं ओरायन हे कॅप्सूल भारतीय वेळेनुसार पहाटे 5.30 च्या सुमारास पॅसिफिक महासागरात उतरलं.

या मोहिमेवर असलेले अंतराळवीर कमांडर रीड वाईसमन यांनी याला दुजोरा दिला. यासह मोहिमेतील सर्व सदस्य प्रवासी उत्तम स्थितीत असल्याचं त्यांनी सांगितलं.

आर्टेमिस 2 च्या अंतराळवीरांनी या मोहिमेत इतिहास घडवला आहे. त्यांनी पृथ्वीपासून तब्बल 6 लाख 94 हजार 481 माईल्स म्हणजेच 11 लाख 17 हजार 659 किमीचा प्रवास पूर्ण केलाय. ते इतक्या दूरवर पोहोचले, जिथे मानव यापूर्वी कधीही पोहोचला नव्हता.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC