Home LATEST NEWS ताजी बातमी आयपीएल 2026 : ‘पुन्हा सूर्यवंशी वादळ’; राजस्थान रॉयल्सने मारली बाजी, आरसीबीच्या हातातून...

आयपीएल 2026 : ‘पुन्हा सूर्यवंशी वादळ’; राजस्थान रॉयल्सने मारली बाजी, आरसीबीच्या हातातून ‘असा’ निसटला सामना

14
0

Source :- BBC INDIA NEWS

वैभव सूर्यवंशीने आरसीबीच्या गोलंदाजांना घाम फोडत 26 चेंडूंमध्ये 78 धावा केल्या (फाइल फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

29 मार्च 2026

अपडेटेड 57 मिनिटांपूर्वी

वाचन वेळ: 11 मिनिटे

राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात शुक्रवार (10 एप्रिल) आयपीएल 2026 मधील 16 वा साखळी सामना खेळला गेला. राजस्थान रॉयल्सने हा सामना 6 विकेट राखून जिंकला.

गुवाहाटी येथील बरसापारा स्टेडियमवर हा सामना खेळवला गेला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या वैभव सुर्यवंशीने तुफान फटकेबाजी करत आरसीबीच्या गोलंदाजांना घाम फोडला.

त्याने 300 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करून तब्बल 15 बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं. वैभवने 26 चेंडूत 78 धावा केल्या.

तर ध्रुव जुरेलने 43 चेंडूत 81 धावांची नाबाद खेळी केली. जडेजाने 25 चेंडूत 24 धावा केल्या.

दरम्यान, राजस्थान रॉयल्सने यंदाच्या आयपीएलमध्ये खेळलेले सर्व 4 सामने जिंकले असून ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर कायम आहेत.

पावसामुळे हा सामना उशिरा सुरू झाला. नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकांत 8 गडी गमावून 201 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सने केवळ 4 गडी गमावून 18 षटकांतच हे लक्ष्य पूर्ण केले.

साई सुदर्शनचे अर्धशतक निष्फळ, राजस्थान रॉयल्सचा गुजरात टायटन्सवर 6 धावांनी विजय

गुजरात जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील रोमांचक आयपीएल सामना राजस्थान रॉयल्सने 6 धावांनी जिंकला.

आयपीएल 2026 मधील हा 9 वा सामना शुक्रवारी (4 एप्रिल) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगला होता.

या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला व गुजरात टायट्नसपुढे 8 विकेट्स गमावत 210 धावांचं लक्ष्य ठेवलं.

लक्ष्याचा पाठलाग करत गुजरात टायटन्सने चांगली फलंदाजी केली मात्र, राजस्थान रॉयल्सने त्यांना रोखून धरले. गुजरात टायटन्सला 8 विकेट्स गमावत 204 धावा करता आल्या.

राजस्थानसाठी सलामीचे फलंदाज यशस्वी जैस्वालने 36 धावांमध्ये 55 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर ध्रुव जुरेलने 42 चेंडूत 75 धावा केल्या. तर, वैभव सूर्यवंशीने 18 चेंडूत 31 धावांची खेळी केली.

गुजरात टायटन्सकडून साई सुदर्शनने 44 चेंडूत 73 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर कुमार कुशाग्रा (18),जॉस बटलर 26, ग्लेन फिलिप्स (3), तसेच वॉशिंग्टन सुंदर अवघ्या 4 धावांवर बाद झाला.

साई सुदर्शनने 73 धावांची खेळी करूनही गुजरात टायटन्सला विजय मिळवता आला नाही (फाइल फोटो)

फोटो स्रोत, SAJJAD HUSSAIN/AFP via Getty Images

10 व्या षटकापर्यंत गुजरातने 100 धावांचा टप्पा ओलांडला होता. मात्र, त्यानंतर डाव कोसळायला सुरुवात झाली. रवी बिश्नोईने 41 धावा देत 4 गडी बाद करत गुजरातच्या मधल्या फळीला खिंडार पाडले.

त्यानंतर 12 ते 15 व्या षटकादरम्यान सामन्याचे पारडे राजस्थानच्या दिशेने झुकू लागले आणि 8 गडी गमावत गुजरातचा डाव 204 धावांवर संपुष्टात आला.

या विजयासह राजस्थान रॉयल्सचा आयपीएलच्या या हंगामातील हा दुसरा विजय आहे. याआधी चेन्नई सुपर किंग्सविरोधातील तिसरा सामना राजस्थान रॉयल्सने जिंकला होता. तर, गुजरात टायटन्स दोन्ही सामने हरले आहेत.

दिल्लीच्या समीर रिझवीच्या तुफानापुढं मुंबईची दाणादाण, 6 विकेट राखून केला पराभव

ANI

फोटो स्रोत, ANI

आयपीएलच्या आठव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं मुंबई इंडियन्सचा सहा विकेट राखून पराभव केला.

दिल्लीच्या गोलंदाजांनी सुरुवातीला मुंबईच्या फलंदाजांना आवर घातला. नंतर समीर रिझवीच्या तडाखेबाज फलंदाजीनं मुंबईचा पराभव निश्चित झाला.

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात 300 धावांचा टप्पा कोणता संघ ओलांडणार अशा चर्चा सुरुवातीपासूनच आहेत. एकापेक्षा एक तडाखेबाज फलंदाजांमुळं चाहतेही अशी आशा लावून आहेत.

आयपीएलच्या सर्व सामन्यांचे थोडक्यात निकाल आणि महत्त्वाचे अपडेट याठिकाणी तुम्ही वाचू शकता.

वैभवचा पहिल्याच सामन्यात तडाखा

युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीने 27 मार्चला 15 वा जन्मदिवस साजरा केला. यानंतर 3 दिवसांनी इंडियन प्रीमियर लीगच्या आपल्या पहिल्या सामन्यात फलंदाजीसाठी मैदानात उतरल्यावर वैभवनं केवळ 15 चेंडूत अर्धशतक झळकावलं.

युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी

फोटो स्रोत, Getty Images

वैभवनं अशा खेळपट्टीवर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला जेथे काही क्षणांपूर्वीच चेन्नई सुपर किंग्सचे (सीएसके) फलंदाज धावा करण्यासाठी झगडत होते आणि सीएसकेचा संपूर्ण संघ 127 धावांवर सर्वबाद झाला होता.

मागील आयपीएल हंगामातही जयपूरमध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध वैभवने 17 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले होते.

सोमवारी (30 मार्च) गुवाहाटीमध्ये त्याने स्वतःचाच आधीचा विक्रम मोडला. आणि आपल्या संघाच्या (राजस्थान रॉयल्स) विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. राजस्थान रॉयल्सने 47 चेंडू शिल्लक असताना 8 विकेटनं सामना जिंकला.

आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात कोहलीची तुफान खेळी; RCB विजयी

शनिवारी संध्याकाळी, जेव्हा आयपीएलच्या चालू सिझनमध्ये बंगळूरुमध्ये हैदराबाद आणि आरसीबीचे संघ मैदानावर उतरले, तेव्हा हा सामना देखील स्पर्धेतील नेहमीच्या सामन्यांसारखाच होईल, असं वाटलं होतं.

पण जेव्हा हा सामना संपला, तेव्हा एक वेगळंच चित्र समोर आलं. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला क्रिकेटप्रेमींनी पुन्हा एकदा डोक्यावर घेतलं.

विराट कोहलीने 69 धावा नाबाद केल्या.

फोटो स्रोत, ANI

विराट कोहली त्याच्या क्रिकेट कारकिर्दीच्या सर्वोत्तम काळात होता, तेव्हा त्याचं ज्या प्रकारचं कौतुक व्हायचं तसंच कौतुक या सामन्यानंतर होताना दिसलं.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या आयपीएल 2026 च्या पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सहज विजय मिळवला.

विराट कोहलीने आरसीबीकडून डावाची सुरुवात केली. कोहलीने अवघ्या 38 चेंडूंमध्ये नाबाद 69 धावांची खेळी केली.

त्याच्या या खेळीमुळे हैदराबादने दिलेले 200 हून अधिक धावांचं आव्हान अगदीच सहजसाध्य झालं.

आयपीएलच्या 2026 च्या हंगामातील सगळ्या सामन्यांचे निकाल खाली देत आहोत.

सामना क्रमांक 01 – RCB vs SRH

स्पर्धेच्या शुभारंभाचा हा सामना गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात एम चिन्नस्वामी मैदानावर झाला.

प्रथम फलंदाजी करत एसआरएचनं आरसीबीसमोर 202 धावांचं आव्हान ठेवलं. ईशान किशननं 38 चेंडूत तडाखेबाज 80 धावा केल्या. आरसीबीसाठी डफी आणि शेफर्ड यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.

पण चेसमास्टर विराट कोहलीनं नेहमीप्रमाणं हे आव्हान अगदी सोपं करून दाखवलं. 69 धावांची नाबाद खेळी करत त्यानं 26 चेंडू शिल्लक ठेवत संघाला हा विजय मिळवून दिला.

पडिक्कलनं 26 चेंडूत 61 धावा करत विजय आणखी सोपा केला.

आयपीएल ट्रॉफी

फोटो स्रोत, Getty Images

सामना क्रमांक 02 – KKR vs MI

आयपीएलच्या या हंगामातील दुसरा सामना केकेआर आणि मुंबई इंडियन्समध्ये झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने 6 विकेटनं विजय मिळवला.

प्रथम फलंदाजी करत केकेआरनं मुंबईसमोर 221 धावांचं आव्हान ठेवलं. अजिंक्य रहाणेने 40 चेंडूत 67 धावा केल्या.

मुंबई इंडियने 6 विकेटने हा सामना जिंकला. रेयान रेकल्टनने 43 चेंडूत 81 धावा केल्या, तर रोहित शर्माने 38 चेंडूत 78 धावांची दमदार खेळी. तसेच मुंबईला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. मुंबईसाठी शार्दुल ठाकूरने 3 विकेट घेतल्या.

सामना क्रमांक 03 – CSK vs RR

युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीने 27 मार्चला 15 वा जन्मदिवस साजरा केला. यानंतर 3 दिवसांनी इंडियन प्रीमियर लीगच्या आपल्या पहिल्या सामन्यात फलंदाजीसाठी मैदानात उतरल्यावर वैभवनं केवळ 15 चेंडूत अर्धशतक झळकावलं.

वैभवनं अशा खेळपट्टीवर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला जेथे काही क्षणांपूर्वीच चेन्नई सुपर किंग्सचे (सीएसके) फलंदाज धावा करण्यासाठी झगडत होते आणि सीएसकेचा संपूर्ण संघ 127 धावांवर सर्वबाद झाला होता.

मागील आयपीएल हंगामातही जयपूरमध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध वैभवने 17 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले होते.

सोमवारी (30 मार्च) गुवाहाटीमध्ये त्याने स्वतःचाच आधीचा विक्रम मोडला. आणि आपल्या संघाच्या (राजस्थान रॉयल्स) विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. राजस्थान रॉयल्सने 47 चेंडू शिल्लक असताना 8 विकेटनं सामना जिंकला.

सामना क्रमांक 04 – GT vs KXIP

गुजरात टायटन्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात पंजाबच्या संघानं 3 विकेट राखून विजय मिळवला.

प्रथम फलंदाजी करत गुजरातच्या संघानं पंजाबसमोर 163 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्यात शुभमन गिलच्या 39, जोस बटलरच्या 38 आणि ग्लेन फिलिप्सच्या 25 धावांचा समावेश होता.

पंजाबच्या विजयकुमारनं 3 विकेट घेतल्या.

प्रत्युत्तरात पंजाबच्या संघानं 3 विकेटनं सामना जिंकला. पण शेवटच्या ओव्हरपर्यंत त्यांना विजयासाठी प्रयत्न करावे लागले. कूपर कोनोलीच्या 44 चेंडूत 72 धावांच्या जोरावर पंजाबनं सहज विजय मिळवला.

कूपर कोनोरी 72 धावांच्या कामगिरीसाठी प्लेयर ऑफ द मॅच ठरला.

सामना क्रमांक 05 – LSG vs DC

आयपीएलच्या पाचव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं लखनऊ सुपर जायंट्सला 6 विकेट आणि 17 चेंडू राखून पराभूत केलं.

प्रथम फलंदाजी करताना लखनऊ सुपर जायंट्सचा संपूर्ण संघ 10 चेंडू शिल्लक असतानाच 141 धावांवर सर्वबाद झाला होता. अब्दुल समदनं 36 तर मिशेल मार्शनं 35 धावा केल्या.

दिल्लीच्या एनगिडी आणि नटराजन यांनी प्रत्येकी 3 तर कुलदीपनं दोन विकेट घेतल्या.

प्रत्युत्तरात दिल्लीच्या संघानं 17 ओव्हरमध्येच आव्हान पूर्ण केलं. समीर रिझवीनं नाबाद 70 धावा केल्या. तर ट्रिस्टन स्टब्जनं नाबाद 39 धावा केल्या.

समीर रिझवी प्लेयर ऑफ द मॅच ठरला.

सामना क्रमांक 06 – SRH vs KKR

कोलकात्याच्या इडन गार्डनच्या मैदानावर झालेल्या सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सच्या सामन्यात हैदराबादनं कोलकात्याला घरच्या मैदानावर धूळ चारली.

प्रथम फलंदाजी करताना हैदराबादनं त्यांची जमेची बाजू असलेल्या फलंदाजांच्या तडाखेबाज खेळींच्या जोरावर कोलकातासमोर 227 धावांचं आव्हान ठेवलं.

हेडनं 21 चेंडूत 46 तर अभिषेकनं 21 चेंडूत 48 धावा केल्या. क्लासेननं 35 चेंडूत अर्धशतकी 52 धावांची खेळी केली.

प्रत्युत्तरात कोलकाताचा संपूर्ण संघ 16 ओव्हरमध्ये 161 धावांवर बाद झाला. उनाडकटनं तीन तर इशान मलिंगा आणि रेड्डीनं प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

तडाखेबाज फलंदाजीमुळं SRH नं मिळवला 65 धावांनी विजय

फोटो स्रोत, ANI

सामना क्रमांक 07 – CSK vs PBKS

चेन्नईला स्पर्धेतल्या सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. किंग्ज इलेव्हन पंजाबनं पाठलाग करताना विक्रमी विजय मिळवला.

प्रथम फलंदाजी करताना चेन्नईकडून आयुष म्हात्रे शिवम दुबे यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर चेन्नईनं पंजाबला 210 धावांचं आव्हान दिलं होतं. म्हात्रेनं 73 तर दुबेनं त्यात 45 धावांचं योगदान दिलं. तर सरफराजनंही फटकेबाजी करत 35 धावा केल्या.

प्रत्युत्तरात पंजाबकडून प्रियांश आर्या, प्रभसिमरन, कूपर कोनोली आणि श्रेयस अय्यर यांनी पंंजाबला विक्रमी विजय मिळवून दिला.

प्रभसिमरननं 43 तर श्रेयस अय्यरनं 29 चेंडूत तडाखेबाज 50 धावा करत पंजाबला विजयापर्यंत पोहोचवलं. 11 चेंडूत 39 धावा करणारा प्रियांश आर्या प्लेयर ऑफ द मॅच ठरला.

सामना क्रमांक 08 – MI vs DC

मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सच्या या सामन्यात दिल्लीनं 6 विकेट राखून विजय मिळवला. टॉस जिंकत दिल्लीनं आधी गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.

सुरुवातीपासून धक्के देत त्यांनी मुंबईच्या फलंदाजांना आवर घातलेला पाहायला मिळालं. मुंबईला 20 ओव्हरमध्ये 162 धावाच करता आल्या.

हार्दिकच्या अनुपस्थितीत कर्णधार असलेल्या सूर्यकुमार यादवनं 36 चेंडूत 51 तर रोहितनं 26 चेंडूत 35 धावा केल्या. मुकेश कुमारनं दोन विकेट घेतल्या.

पण प्रत्युत्तरात दिल्लीच्या निसंका आणि रिझवी यांच्यासमोर मुंबईच्या गोलंदाजांना फार चांगली कामगिरी करता आली नाही. निसंकानं 30 चेंडूत 44 तर रिझवीनं 51 चेंडूत 90 धावा करत सामना दिल्लीला सहज विजय मिळवून दिला.

समीर रिझवी प्लेयर ऑफ द मॅच ठरला.

सामना क्रमांक 09 – GT vs RR

गुजरात जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील रोमांचक आयपीएल सामना राजस्थान रॉयल्सने 6 धावांनी जिंकला.

आयपीएल 2026 मधील हा 9 वा सामना शुक्रवारी (4 एप्रिल) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगला होता.

या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला व गुजरात टायट्नसपुढे 8 विकेट्स गमावत 210 धावांचं लक्ष्य ठेवलं.

लक्ष्याचा पाठलाग करत गुजरात टायटन्सने चांगली फलंदाजी केली मात्र, राजस्थान रॉयल्सने त्यांना रोखून धरले. गुजरात टायटन्सला 8 विकेट्स गमावत 204 धावा करता आल्या.

राजस्थानसाठी सलामीचे फलंदाज यशस्वी जैस्वालने 36 धावांमध्ये 55 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर ध्रुव जुरेलने 42 चेंडूत 75 धावा केल्या. तर, वैभव सूर्यवंशीने 18 चेंडूत 31 धावांची खेळी केली.

गुजरात टायटन्सकडून साई सुदर्शनने 44 चेंडूत 73 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर कुमार कुशाग्रा (18),जॉस बटलर 26, ग्लेन फिलिप्स (3), तसेच वॉशिंग्टन सुंदर अवघ्या 4 धावांवर बाद झाला.

10 व्या षटकापर्यंत गुजरातने 100 धावांचा टप्पा ओलांडला होता. मात्र, त्यानंतर डाव कोसळायला सुरुवात झाली. रवी बिश्नोईने 41 धावा देत 4 गडी बाद करत गुजरातच्या मधल्या फळीला खिंडार पाडले.

त्यानंतर 12 ते 15 व्या षटकादरम्यान सामन्याचे पारडे राजस्थानच्या दिशेने झुकू लागले आणि 8 गडी गमावत गुजरातचा डाव 204 धावांवर संपुष्टात आला.

या विजयासह राजस्थान रॉयल्सचा आयपीएलच्या या हंगामातील हा दुसरा विजय आहे. याआधी चेन्नई सुपर किंग्सविरोधातील तिसरा सामना राजस्थान रॉयल्सने जिंकला होता. तर, गुजरात टायटन्स दोन्ही सामने हरले आहेत.

सामना क्रमांक 10 – SRH vs LSG

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्सच्या सामन्यात लखनऊने 5 विकेट राखून विजय मिळवला.

हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सनरायझर्सने लखनऊ समोर 157 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पहिल्या डावात फलंदाजीला उतरलेल्या हैदराबादची सुरुवात अडखळत झाली होती.

सामनावीर ठरलेल्या मोहम्मद शमीने 4 ओव्हर्समध्ये फक्त 9 धावा देत 2 विकेट पटकावल्या. शमीने ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्माला स्वस्तात तंबूत पाठवलं आणि हैदराबादच्या डावाला सुरुवातीलाच खिंडार पाडलं.

SRH vs LSG

फोटो स्रोत, MONEY SHARMA/AFP via Getty Images

अखेर हेनरिक क्लासेन आणि नितीश कुमार रेड्डीने केलेल्या फलंदाजीच्या बळावर हैदराबादने 156 धावा केल्या.

हैदराबादने ठेवलेल्या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या लखनऊच्या संघाने सावध सुरुवात केली. एडन मार्करम आणि कर्णधार ऋषभ पंतने आक्रमक फलंदाजी करत लखनऊला लक्ष्याच्या जवळ पोहोचवलं. मार्करमने 27 बॉल्समध्ये 45 धावा केल्या आणि पंतने 50 बॉल्समध्ये 68 धावा केल्या.

यंदाच्या आयपीएलमधला लखनऊचा हा पहिला विजय आहे.

सामना क्रमांक 11 – CSK vs RCB

चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सामन्यात आरसीबीने तब्बल 43 धावांनी विजय मिळवला.

चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यानंतर चेन्नईने या सामन्यात एकही गोष्ट जिंकली नाही असंच म्हणावं लागेल. बंगळुरूच्या फलंदाजांनी आक्रमक सुरुवात केली.

CSK vs RCB

फोटो स्रोत, ANI

सलामीला उतरलेल्या विराट कोहली आणि फिल सॉल्टने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. आक्रमक फलंदाजी करणारा विराट कोहली बाद झाल्यानंतर उतरलेल्या देवदत्त पडिकलने 29 बॉल्समध्ये 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने अर्धशतक झळकावलं.

सामनावीर ठरलेल्या टीम डेव्हिडने तर चेन्नईच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली. त्याने फक्त 25 बॉल्समध्ये 3 चौकार आणि तब्बल 8 षटकार खेचत 70 धावांची खेळी केली.

बंगळुरूने ठेवलेल्या 251 धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करायला उतरलेल्या चेन्नईच्या फलंदाजांना अखेरपर्यंत सूरच गवसला नाही. सुरुवातीला 3 विकेट गमावल्यानंतर सर्फराज खानने 24 बॉल्समध्ये अर्धशतक केलं पण कधीही चेन्नईचा संघ या सामन्यात पुढे गेला नाही.

अखेर चेन्नईचा संघ 19.4 ओव्हर्समध्ये 207 धावाच करू शकला.

‘साऊथ इंडियन डर्बी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेन्नई विरुद्ध बंगळुरूच्या सामन्याचं चित्र आता एकतर्फी होऊ लागलं आहे. 2022 नंतर झालेल्या 6 सामन्यांमध्ये बंगळुरूने 5 सामने जिंकले आहेत तर चेन्नईला केवळ एकाच सामन्यात विजयी होता आलं आहे.

सामना क्रमांक 12 – KKR vs PBKS

कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर झालेला आयपीएलचा 12 वा सामना पावसामुळे अनिर्णित ठरला. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्सचा हा सामना सुरु झाला होता पण अखेर पावसामुळे 3.4 ओव्हर्सचाच खेळ होऊ शकला.

सामना क्रमांक 13 – RR vs MI

राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या आयपीएलच्या 13व्या सामन्यात राजस्थानने 27 धावांनी विजय मिळवला.

गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर झालेला हा सामना पावसामुळे 11 ओव्हर्सचा करण्यात आला होता. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून राजस्थानला फलंदाजीला पाचारण केलं.

वैभव सूर्यवंशी

फोटो स्रोत, ANI

राजस्थानकडून सलामीला उतरलेल्या वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालने मैदानात धुमाकूळ घातला. वैभवने जसप्रीत बुमराहच्या पहिल्याच बॉलवर खणखणीत षटकार खेचून त्याचा इरादा स्पष्ट केला आणि दुसऱ्या बाजूला जयस्वालने देखील 32 बॉल्समध्ये 10 चौकार आणि 4 षटकार खेचून 77 धावांची खेळी केली.

15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने तर 14 बॉल्समध्ये तब्बल 5 षटकार खेचून 39 धावांची तडाखेबंद खेळी केली. या दोघांनी केलेल्या आक्रमक फलंदाजीमुळे राजस्थानने पहिल्या डावात 11 ओव्हर्समध्ये 150 धावांचा डोंगर उभा केला.

राजस्थानच्या आव्हानाचा पाठलाग करायला उतरलेल्या रायन रिकल्टन आणि रोहित शर्माने सावध सुरुवात केली पण अखेर धावगतीच्या दबावापुढे हे दोघेही स्वस्तात तंबूत परतले. मुंबईचे पहिले तीन फलंदाज एकेरी धावा करून बाद झाले आणि त्यानंतर एकही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.

अखेर मुंबईने 9 विकेट गमावून 123 धावा केल्या आणि मुंबईच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

सामना क्रमांक 14 – GT vs DC

दिल्लीच्या मैदानावर अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सनं दिल्ली कॅपिटल्सवर अवघ्या 1 रननं विजय मिळवला. दिल्लीच्या संघानं नाणेफेक जिंक प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.

गुजरातच्या सलामीवीर कर्णधार शुभमन गिलनं 45 चेंडूमध्ये 5 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीनं 70 धावा केल्या. तर जोस बटलरनं 27 चेंडूत 52 आणि सुंदरनं 32 चेंडूत 55 धावा करत गुजरातला 210 धावांपर्यंत पोहोचवलं.

प्रत्युत्तरात दिल्लीच्या संघानं चांगली सुरुवात केली. निसंका आणि केएल राहुलनं पहिल्या विकेटसाठी 76 धावांची भागिदारी केली. निसंकानं 24 चेंडूत 41 तर राहुलनं 52 चेंडूत 92 धावांची खेळी केली.

पण त्यानंतर कोणत्याही फलंदाजाला फारशी चांगली फलंदाजी करता आली नाही. मिलरच्या नाबाद 41 धावांच्या प्रयत्नांनंतरही अवघ्या एका धावेनं दिल्लीला पराभवाचा सामना करावा लागला. गुजरातच्या राशीदनं 3 विकेट घेतल्या. तोच सामनावीरही ठरला.

सामना क्रमांक 15 – KKR vs LSK

कोलकात्याच्या ईडन गार्डनच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात स्पर्धेतला 15 वा सामना रंगला. या सामन्यात लखनऊनं कोलकात्याचा 3 विकेट राखून पलाभव केला.

लखनऊनं टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कोलकात्याच्या संघानं अजिंक्य राहणेच्या 41, रघुवंशीच्या 45 आणि पॉवेलच्या 39 धावांच्या जोरावर लखनऊसमोर 182 धावांचं आव्हान ठेवलं.

मुकूल चौधरी

फोटो स्रोत, ANI

प्रत्युत्तरात लखनऊची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. पहिल्या तीन विकेट गेल्यानंतर आयुष बदोनीनं डाव सावरला. त्यानं 34 चेंडूत 54 धावा केल्या. त्यानंतरही पूरन आणि समद लवकर बाद झाले.

पण मुकूल चौधरीच्या रुपानं कोलकात्यासमोर जणू पुस्तकाबाहेरचा प्रश्न आला. त्यानं 27 चेंडूमध्ये नाबाद 54 धावा ठोकत लखनऊला विजयापर्यंत पोहोचवलं. त्यात 7 षटकारांचा समावेश होता. त्यालाच प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कारही मिळाला.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC