Source :- ZEE NEWS
Pakistan Air Strike: रमजानच्या महिन्यातच दोन इस्लामिक राष्ट्र भिडलेत, अलीकडे पाकिस्तानमध्ये झालेल्या आत्मघाती हल्ल्यांनंतर पाकिस्तानने अफगाणिस्तान सीमेलगत असलेल्या काही ठिकाणांवर हवाई कारवाई केली. या घटनेमुळे दोन्ही देशांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून परिस्थिती संवेदनशील बनली आहे. पाकिस्तानकडून या कारवाईचा उद्देश दहशतवादी हालचाली रोखणे असा सांगितला जात आहे, तर अफगाणिस्तानमध्ये नागरी लोकांचे नुकसान झाल्याचा दावा केला जात आहे. या घटनेनंतर सीमेवरील सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली असून आंतरराष्ट्रीय पातळीवरही या घडामोडीकडे लक्ष लागले आहे.
नेमकी कारवाई कुठे झाली?
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील पक्तिका प्रांतातील बरमल जिल्हा आणि खोग्यानी परिसरात हवाई हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय अरगुन तसेच नंगरहार प्रांतातील बहसोद आणि गनी खेल जिल्ह्यांमध्येही स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे स्थानिक माध्यमांनी सांगितले. टोलो न्यूजच्या वृत्तानुसार काही घरांचे नुकसान झाले असून एका मदरशालाही फटका बसल्याचा दावा आहे. या कारवाईत 17 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली जात आहे.
पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्लाह तरार यांनी सांगितले की ही ठिकाणे तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) आणि इस्लामिक स्टेट खोरासान (ISKP)शी संबंधित गटांच्या हालचालींसाठी वापरली जात होती. पाकिस्तान सरकार TTP ला ‘फितना अल खवारिज’ असे संबोधते.
आत्मघाती हल्ल्यांनंतर निर्णय
रमजान काळात इस्लामाबाद, बाजौर आणि बन्नू येथे झालेले आत्मघाती हल्ले या कारवाईमागचे प्रमुख कारण असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बाजौर येथे स्फोटकांनी भरलेली गाडी सुरक्षा चौकीवर आदळली होती. या घटनेत 11 सैनिक आणि एका मुलाचा मृत्यू झाला. नंतर अधिकाऱ्यांनी हल्लेखोर अफगाण नागरिक असल्याचा संशय व्यक्त केला.
बन्नू जिल्ह्यातही सुरक्षा ताफ्यावर हल्ला झाला होता, ज्यामध्ये एका लेफ्टिनेंट कर्नलसह 2 सैनिक मारले गेले. या घटनांची जबाबदारी TTP आणि दाएशशी संबंधित घटकांनी स्वीकारल्याचा दावा पाकिस्तानच्या मंत्रालयाने केला.
हल्ला करण्याचे मुख्य कारण समोर
पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते ताहिर अंद्राबी यांनी स्पष्ट केले की अफगाणिस्तानातील भूमीचा वापर पाकिस्तानविरोधी कारवायांसाठी होऊ नये. नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील, असेही त्यांनी सांगितले. ‘डॉन’ वृत्तपत्रानुसार सीमापार तणाव वाढल्यास पाकिस्तान कारवाई करण्याचा अधिकार राखून ठेवतो असेही त्यांनी नमूद केले.
रमजान में पाकिस्तान ने अफगानिस्तान में आतंकी शिविरों को निशाना बनाया है.
ये शिविर अफगानिस्तान की सीमा से सटे हुए थे.
इसमें टीटीपी सहित सात संगठन थे. इन हमलों में मदरसों को भी नुकसान पहुंचा है.
मीडिया रिपोर्ट के मुताबिक इन हमलों में 17 लोगों की जान चली गई है.#Ramadan… pic.twitter.com/A7wYanE5Dk
— Abhinaw Tripathi (@AbhinawKTri) February 22, 2026
दरम्यान, या हल्ल्यांमुळे दोन्ही देशांतील संबंध आणखी बिघडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सीमाभागातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण असून परिस्थिती पुढे कशी वळण घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
SOURCE : ZEE NEWS
