Home world news marathi YouTube बंद! सेवा ठप्प झाल्यामुळे जगभरातील लाखो युजर्स टेन्शनमध्ये; काय आहे कारण?

YouTube बंद! सेवा ठप्प झाल्यामुळे जगभरातील लाखो युजर्स टेन्शनमध्ये; काय आहे कारण?

16
0

Source :- ZEE NEWS

YouTube Down: आज (18 फेब्रुवारी) भारतात अचानक लोकप्रिय व्हिडीओ प्लॅटफॉर्म YouTube ची सेवा ठप्प झाल्याने कोट्यवधी वापरकर्ते अडचणीत सापडले. देशासह इतर भागांतूनही प्लॅटफॉर्म डाउन झाल्याच्या तक्रारी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात समोर आल्या. अनेकांना व्हिडीओ प्ले होत नव्हते, अॅप प्रतिसाद देत नव्हते, तर वेबसाइट उघडताना अडचणी येत होत्या. आउटेजनंतर #YouTubeDown हा हॅशटॅगही वेगाने ट्रेंड झाला. काही वापरकर्त्यांना प्लॅटफॉर्मवर व्हिडीओऐवजी “Something went wrong” असा संदेश दिसत असल्याची माहिती आहे.

Add Zee News as a Preferred Source

या जागतिक तांत्रिक बिघाडामुळे विशेषतः ते लोक चिंतेत आले आहेत, ज्यांचे कामकाज पूर्णपणे या प्लॅटफॉर्मवर अवलंबून आहे.

अचानक काय बिघडले?

अद्याप कंपनीकडून अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मात्र तज्ज्ञांच्या मते, सर्व्हर कॉन्फिगरेशनमधील त्रुटी, अचानक वाढलेला ट्रॅफिक किंवा अलीकडील अपडेटमध्ये राहिलेला एखादा बग यामुळे ही समस्या निर्माण झाली असावी. काही वेळा एकाच वेळी मोठ्या प्रमाणात हिट्स आल्याने सर्व्हर क्रॅश होण्याची शक्यता असते. तसेच सायबर हल्ल्याचाही अंदाज वर्तवला जात आहे.

पण, लवकरच सेवा पूर्ववत होईल आणि या अडचणीमागील नेमके कारण कंपनीकडून स्पष्ट केले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

फक्त मनोरंजन नाही, तर कामकाजालाही फटका

YouTube अचानक बंद पडल्यामुळे केवळ प्रेक्षकच नव्हे, तर व्हिडीओ अपलोड करणारे निर्मातेही अडचणीत सापडले आहेत. मोबाईल अॅपसह डेस्कटॉप आवृत्तीवरही ही समस्या जाणवत आहे.

आजच्या डिजिटल युगात हा प्लॅटफॉर्म केवळ करमणुकीपुरता मर्यादित राहिलेला नाही; लाखो लोकांची उपजीविका त्यावर अवलंबून आहे. डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातील व्यावसायिक, शिक्षक, तसेच कंटेंट क्रिएटर्स यांना या आउटेजचा मोठा फटका बसला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या लाइव्ह क्लासेस मध्येच थांबल्याची तक्रार केली असून त्यामुळे अभ्यासाचे नुकसान झाल्याचे सांगितले आहे.

युट्युबचे ऑफिशल विधान

जर तुम्हाला सध्या YouTube अ‍ॅक्सेस करण्यात अडचण येत असेल, तर तुम्ही एकटे नाही आहात – आमची टीम यावर लक्ष ठेवून आहेत आणि अपडेट्ससह पाठपुरावा करण्यात येत आहे. 

सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

YouTube अचानक बंद पडल्यामुळे अनेक जण त्रस्त झाले असले, तरी दुसऱ्या बाजूला सोशल मीडियावर मीम्सचा अक्षरशः वर्षाव झाला.

Instagram आणि X वर वापरकर्त्यांनी भन्नाट आणि विनोदी पोस्ट शेअर करत या परिस्थितीकडे हलक्याफुलक्या अंदाजात पाहिले. काहींनी तर Google च्या इंजिनिअर्सवरही मिश्कील टोमणे मारत मजेदार प्रतिक्रिया दिल्या.

SOURCE : ZEE NEWS