Home LATEST NEWS ताजी बातमी चीनने ‘या’ क्षेत्रात अमेरिकेला मात देत आगेकूच सुरू केली आहे का? त्यांनी...

चीनने ‘या’ क्षेत्रात अमेरिकेला मात देत आगेकूच सुरू केली आहे का? त्यांनी कशी मारली मजल?

7
0

Source :- BBC INDIA NEWS

चीन अमेरिका

फोटो स्रोत, Getty Images

दर महिन्याला कोट्यवधी लोक पिंटरेस्ट (Pinterest) वर नवनवीन स्टाईल शोधण्यासाठी येतात. तिथे एक पेज आहे, जे क्रिएटिव्ह मंडळींसाठी नवनवीन कल्पनांचा खजिना आहे.

उदाहरणार्थ क्रॉक्सपासून बनवलेले फुलदाणी, चीज बर्गरसारखे दिसणारे आयशॅडो किंवा भाज्यांपासून बनवलेले जिंजरब्रेड हाऊस.

परंतु, यामागे काम करणारं तंत्रज्ञान अमेरिकन आहे की नाही, याचा अंदाज बऱ्याच लोकांना नाही.

पिंटरेस्ट त्यांच्या ‘रिकमंडेशन इंजिन’ला अधिक सक्षम बनवण्यासाठी चिनी एआय मॉडेल्सवर प्रयोग करत आहे.

कंपनीचे सीईओ बिल रेडी यांनी सांगितलं की, “आम्ही पिंटरेस्टला खऱ्या अर्थाने एआयवर काम करणारं शॉपिंग असिस्टंट बनवलं आहे.”

सॅन फ्रान्सिस्कोमधील या कंपनीला हवं असतं तर काम करण्यासाठी कोणत्याही अमेरिकन एआय लॅबची निवड करता आली असती.

परंतु, जानेवारी 2025 मध्ये चीनच्या डीपसीक आर 1- DeepSeek R 1मॉडेलच्या लाँचिंगनंतर, पिंटरेस्टमध्ये चिनी एआय तंत्रज्ञानाचा वापर सातत्याने वाढतोय. या क्रांतीला आता ‘डीपसीक मोमेंट’ म्हणून ओळखले जातेय.

‘डीपसीक मोमेंट’

रेडी हे डीपसीक मोमेंटचं मोठं यश असल्याचं अधोरेखित करतात.

त्यांच्या मते, “त्यांनी हे ओपन सोर्स केलं आणि त्यातूनच ओपन सोर्स मॉडेल्सच्या एका लाटेची सुरुवात झाली.”

चीनमधील प्रतिस्पर्धी कंपन्यांमध्ये अलीबाबाचे क्वेन (Qwen) आणि मूनशॉटचे ‘किमी’- Kimi यांचा समावेश आहे. तसेच टिकटॉकची मालकी असणारी कंपनी बाइटडांस (ByteDance) देखील अशाच तंत्रज्ञानावर काम करते.

पिंटरेस्टचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी मॅट मॅड्रिगल म्हणतात की, “या मॉडेल्सची सर्वात मोठी ताकद म्हणजे कंपन्या कोणत्याही निर्बंधाशिवाय हे मॉडेल्स डाऊनलोड करून आपल्या गरजेनुसार कस्टमाइझ करू शकतात.

मात्र अमेरिकेतील अनेक कंपन्यांच्या बाबतीत, जसे की चॅटजीपीटी – ChatGPT बनवणारी ओपनएआय – OpenAI त्यांच्या मॉडेल्ससोबत असे करणे शक्य नसते.”

पिंटरेस्ट मोठ्या प्रमाणावर डीपसीक DeepSeek चा वापर करत आहे.

फोटो स्रोत, Getty Images

मॅड्रिगल म्हणतात की, “आम्ही ज्या ओपन सोर्स तंत्रज्ञानाद्वारे आमचे इन-हाउस मॉडेल ट्रेन करतो, ते बाजारात उपलब्ध असलेल्या टॉप रेडीमेड मॉडेल्सच्या तुलनेत 30% अधिक अचूकतेने काम करतात.”

अशा प्रकारचे उत्तम रेकमेंडेशन्स कंपनीला खूप कमी किमतीत मिळतात. कधीकधी तर हे अमेरिकन एआय डेव्हलपर्सच्या मालकी हक्क असलेल्या मॉडेल्सच्या तुलनेत 90% पर्यंत स्वस्त मिळतात.

‘वेगवान आणि स्वस्तही’

चीनच्या AI तंत्रज्ञानावर अवलंबून असलेली पिंटरेस्ट ही एकमेव अमेरिकन कंपनी नाही. हे मॉडेल्स आता अनेक फॉर्च्यून 500 कंपन्यांमध्ये वेगाने लोकप्रिय होत आहे.

एअरबीएनबी (Airbnb) चे सीईओ ब्रायन चेस्की यांनी ऑक्टोबरमध्ये ब्लूमबर्गला सांगितलं होतं की, त्यांची कंपनी एआय कस्टमर सर्विस एजंटच्या कामासाठी अलीबाबाच्या क्वेन (Qwen) मॉडेलवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे.

त्यांनी याची तीन प्रमुख कारणे सांगितली. ती म्हणजे हे खूप चांगले, वेगवान आणि स्वस्त आहे. या गोष्टीला हगिंग फेस (Hugging Face) वरही दुजोरा मिळतो.

हगिंग फेस मधून लोक तयार एआय मॉडेल्स डाऊनलोड करतात. त्यात मेटा आणि अलीबाबासारख्या मोठ्या डेव्हलपर्सच्या मॉडेल्सचाही समावेश आहे.

चीनी एआय कंपन्या अमेरिकन कंपन्यांच्या तुलनेत खूपच स्वस्त पडतात.

फोटो स्रोत, Getty Images

या प्लॅटफॉर्मचे प्रोडक्ट हेड जेफ बुडियर म्हणतात की, “कमी किमतीमुळे नवीन स्टार्टअप कंपन्या अमेरिकन मॉडेल्सपेक्षा चिनी मॉडेल्सकडे अधिक वळतात.”

त्यांनी म्हटलं की, “जर तुम्ही हगिंग फेसवर सर्वात जास्त डाऊनलोड केलेले आणि कम्युनिटीने सर्वात जास्त पसंती दिलेले सर्वात ट्रेंडिंग मॉडेल्स पाहिले, तर साधारणपणे टॉप 10 पैकी अनेक मॉडेल्स चीनच्या लॅब्सनी बनवलेले आढळतात. काही आठवडे तर असेही असतात की, टॉप 5 मॉडेल्सपैकी चार चिनी लॅब्सचे असतात.”

सप्टेंबरमध्ये क्वेनने मेटाच्या ‘लामा’ (Llama) ला मागे टाकले. क्वेन हे हगिंग फेस प्लॅटफॉर्मवर सर्वात जास्त डाऊनलोड केलं जाणारं लार्ज लँग्वेज मॉडेल बनलं.

चीन-अमेरिका तंत्रज्ञानाची शर्यत

फोटो स्रोत, Getty Images

मेटाने त्यांचं ओपन सोर्स लामा मॉडेल 2023 मध्ये रिलीज केलं होतं. डीपसीक आणि अलीबाबाचे नवीन मॉडेल्स येईपर्यंत, स्वतःच्या सोयीनुसार कस्टम ॲप्लिकेशन्स बनवू इच्छिणाऱ्या डेव्हलपर्सची ही पहिली पसंती मानली जात होती.

परंतु, गेल्या वर्षी जारी केलेले लामा 4 डेव्हलपर्सना फारसे प्रभावित करू शकले नाही.

मेटा आता अलीबाबा, गुगल आणि ओपनएआयच्या ओपन सोर्स मॉडेल्सचा वापर करून एका नवीन मॉडेल सेटला ट्रेन करत असून ते लवकरच रिलीज केलं जाईल, अशा बातम्या आहेत.

एअरबीएनबी अनेक मॉडेल्सचा वापर करते. त्यात अमेरिकन मॉडेल्सचाही समावेश आहे. कंपनी हे मॉडेल्स स्वतःच्याच इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुरक्षितपणे होस्ट करते. कंपनीचे म्हणणे आहे की, कोणताही डेटा एआय मॉडेल डेव्हलपरसोबत शेअर केला जात नाही.

चीनचे यश

2025 च्या सुरुवातीला सर्वसाधारण मत असं होतं की, अमेरिकन टेक कंपन्या अब्जावधी डॉलर्स खर्च करत असल्या तरी, चीनी कंपन्या त्यांना ओव्हरटेक करण्याच्या मार्गावर होत्या.

पण बुडियर यांच्या मते, “आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. आता सर्वात चांगलं मॉडेल हे एक ओपन सोर्स मॉडेल आहे.”

स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या गेल्या महिन्यात आलेल्या एका अहवालात असं दिसून आलं आहे की, चीनी एआय मॉडेल्स एकतर जगातील इतर मॉडेल्सच्या बरोबरीने पोहोचले आहेत किंवा त्यांच्या पुढे गेले आहेत. मग ती क्षमता असो किंवा किती लोक त्यांचा वापर करत आहेत हा आधार असो.

अलीकडेच बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत, ब्रिटनचे माजी उपपंतप्रधान सर निक क्लेग यांनी म्हटलं की, त्यांना असं वाटतं की, एके दिवशी मानवी बुद्धिमत्तेलाही मागे टाकू शकेल, अशा एआयच्या मागे अमेरिकन कंपन्या गरजेपेक्षा जास्त धावत आहेत.

ओपनएआय - OpenAI सारख्या कंपन्यांवर लवकरात लवकर महसूल वाढवण्याचा आणि नफ्यात येण्याचा मोठा दबाव आहे.

फोटो स्रोत, Getty Images

गेल्या वर्षी, सर निक यांनी मेटा (जी लामा बनवते) मधील ‘ग्लोबल अफेअर्स हेड’ हे पद सोडलं होतं. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी ‘सुपरइंटेलिजन्स’ साध्य करण्यासाठी अब्जावधी डॉलर्स गुंतवण्याचं आश्वासन दिलं आहे.

परंतु, अनेक तज्ज्ञ आता असं म्हणत आहेत की, अशी मोठी आणि महत्त्वाकांक्षी उद्दिष्टं स्पष्टपणे परिभाषित केलेली नाहीत. नेमक्या याच कारणामुळं चीनला ओपन सोर्स एआयमध्ये मोठी संधी आणि आघाडी मिळत आहे.

सर निक यांच्या मते, “एक विरोधाभास म्हणजे, ‘जगातील सर्वात मोठी हुकूमशाही’ आणि ‘जगातील सर्वात मोठी लोकशाही’, म्हणजेच चीन आणि अमेरिका यांच्यातील या स्पर्धेत चीन अशा तंत्रज्ञानाला अधिक लोकशाहीनुरुप बनवत आहे, ज्यासाठी दोन्ही देशांमध्ये एकमेकांशी स्पर्धा सुरू आहे.”

स्टॅनफोर्डचा अहवाल असंही सांगतो की, चीनच्या ओपन सोर्स मॉडेल्सच्या यशामागं सरकारी पाठबळ हे एक मोठं कारण असू शकतं.

ओपनएआय - OpenAI सारख्या कंपन्यांवर लवकरात लवकर महसूल वाढवण्याचा आणि नफ्यात येण्याचा मोठा दबाव आहे.

फोटो स्रोत, Getty Images

दुसरीकडे, ओपनएआय सारख्या अमेरिकन कंपन्यांवर लवकरात लवकर महसूल वाढवण्याचा आणि नफ्यात येण्याचाही मोठा दबाव आहे. याच कारणामुळं कंपनीनं आता जाहिरातींचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे.

ओपनएआयने अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच, गेल्या वर्षी उन्हाळ्यात दोन ओपन सोर्स मॉडेल जारी केले.

परंतु पैसे कमावण्यासाठी कंपनीने आपले बहुतांश स्त्रोत त्यांच्या महागड्या आणि मालकी हक्क असलेल्या मॉडेल्सवर लावले आहेत.

ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी ऑक्टोबरमध्ये सांगितले होते की, कंपनी अधिक संगणकीय क्षमता

आणि आपल्या भागीदारांसह इन्फ्रास्ट्रक्चरवर सतत आणि मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहे.

ते म्हणाले, “उत्पन्न खूप वेगाने वाढेल, परंतु तुम्ही अशी अपेक्षा ठेवली पाहिजे की आम्ही पुढील मॉडेल आणि त्याच्याही पुढच्या मॉडेल्सच्या ट्रेनिंगमध्ये मोठी गुंतवणूक करत राहू.”

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC