Home world news marathi 1250 लिटर Sulfuric Acid बंगल्यावर मागवलं, अख्खा टँकर आला अन्…; एपस्टीनसंदर्भात हादरवणारा...

1250 लिटर Sulfuric Acid बंगल्यावर मागवलं, अख्खा टँकर आला अन्…; एपस्टीनसंदर्भात हादरवणारा खुलासा

20
0

Source :- ZEE NEWS

Jeffrey Epstein Files : मागील काही दिवसांपासून चर्चेच असणाऱ्या एपस्टीन फाईल्स प्रकरणाला जसजसे नवे पुरावे जारी करण्यात येत आहेत, तसतसं नवं वळण मिळत आहे. अशाच परिस्थितीमध्ये आणखी एक बाब समोर आली आहे, ज्यामध्ये एक खळबळजनक पुरावा उघडकीस आला असून, लैगिंक अत्याचार आणि मानवी तस्करी करत लहान मुलींवर अत्याचार करणाऱ्या एपस्टीनच्या खासगी बेटावर सल्फ्युरिक अॅसिडचा पुरवठा करण्यात आल्याचं म्हटलं गेलं. 

Add Zee News as a Preferred Source

1250 लिटर Sulfuric Acid बंगल्यावर मागवलं आणि मग? 

अमेरिकी न्याय व्यवस्थेनं जारी केलेल्या नव्या पुराव्यांनुसार 2018 मध्ये एपस्टीनच्या अमेरिकेतील व्हर्जिन आयलंड या बेटावर असणाऱ्या आलिशान बंगल्यावर एकदोन नव्हे तर तब्बल 1250 लीटर sulfuric acid मागवण्यात आलं होतं. कागदोपत्री पुराव्यांनुसार एपस्टीननं साधारण 330 गॅलन म्हणजेच 1250 लीटर सल्फ्युरिक अॅसिडची खरेदी 6 डिसेंबर 2018 मध्ये केली होती.  

सदर खरेदी त्याचवेळी करण्यात आली होती जेव्हा अमेरिकी तपास यंत्रणेकडून मानवी तस्करी, लैंगिक अत्याचार आणि त्याच्या तत्सम दुष्कृत्यांची चौकशी सुरू होती, यामध्ये पुढील कारवाईत एपस्टीनला पुढच्याच वर्षात अटकही करण्यात आली. एपस्टीन प्रकरणातील हे पुरावे समोर येताक्षणीच त्याबाबत अनेक पद्धतींनी तर्कवितर्क आणि अंदाज लावण्यात आले. ज्यामध्ये हे रसायन सर्व ‘पुरावे’ नष्ट करण्यासाठी एपस्टीननं मागवलं असल्याचाही अंदाज वर्तवण्यात आला. मात्र कागदपत्रांमध्ये या रसायनाचा वापर नेमका कशासाठी करण्यात आला याची स्पष्टोक्ती अथवा संकेत आढळलेले नाहीत. 

sulfuric acid चा वापर कशासाठी केला जातो? 

sulfuric acid हे एक प्रचंड ताकदीचं रसायन असून सहसा त्याचा वापक मोठ्या कारखान्यांमध्ये, बांधकामाच्या वेळी, पाईपलाईनच्या कामांमध्ये, धातूंवर प्रक्रिया करण्यासाठी किंवा मोठ्या प्रमाणावरील तांत्रिक देखभाल कामांसाठी केला जातो. अनेक मोठ्या मालमत्तांमध्ये पाईपलाईन दुरूस्ती, ड्रेन पाईप दुरूस्तीपासून स्वच्छता आणि तत्सम कामांसाठीही याचा वापर होतो. मात्र एस्टीनच्या एकाकी बंगल्यावर हे रसायन इतक्या मोठ्या प्रमाणात का मागवण्यात आलं होतं, याचा कुठंही जाहीर खुलासा नाही. 

किंबहुना तपास यंत्रणांनीसुद्धा या रसायनाची खरेदी गुन्ह्यासाठी करण्यात येण्यासंदर्भात कोणतंही भाष्य केलेलं नसून तिथं कोणतेही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचीही माहिती मिळू न शकल्यानं असे दावे टाळले आहेत. तरीही हे रसायन खरेदी करण्याची वेळ आणि तारीख पाहता त्यामुळं अनेक मार्गांतून संशय व्यक्त केला जात आहे.

एपस्टीनच्या दुष्कृत्यांची यादीच संपेना… 

जेफ्री एपस्टीन या अनपेक्षितपणे प्रसिद्धीझोतात आलेल्या इसमानं फार कमी वेळात फक्त अमेरिकाच नव्हे तर जगभरातील धनाढ्य मंडळींशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरिच्या संपर्क वाढवला होता. जुलै 2019 मध्ये त्याला sex trafficking च्या आरोपांअंतर्गत अटक करण्यात आली. कारावासाच्याच शिक्षेदरम्यान त्यानं आत्महत्या केल्याचा दावा करत त्याच्या मृत्यूची संशयास्पद बातमी समोर आली. ज्याबाबतही पुढं अनेक सिद्धांत मांडण्यात आले. दरम्यान, नव्यानं समोर आलेल्या जेफ्री एपस्टीन प्रकरणातील पुराव्यांमध्ये त्यानं मृत्यूपूर्वी वर्षभरात केलेले व्यवहार, साधलेले संवाद आणि मालमत्ता करार यांची माहिती उघड झाली असून सल्फ्युरिक अॅसिडची खरेदीच सध्या यामध्ये लक्ष वेधत असून अनेक प्रश्नांचं वर्तुळ याभोवती पाहायला मिळत आहे. 

SOURCE : ZEE NEWS