Home LATEST NEWS ताजी बातमी सोलर फ्लेअर म्हणजे काय? सूर्यावरच्या स्फोटाने भारतात आकाश लाल का झालं?

सोलर फ्लेअर म्हणजे काय? सूर्यावरच्या स्फोटाने भारतात आकाश लाल का झालं?

10
0

Source :- BBC INDIA NEWS

सौर वादळ

फोटो स्रोत, NASA/SDO

काही दिवसांपूर्वी सूर्यावर एक प्रचंड मोठा स्फोट झाला आणि त्याचे परिणाम इथे पृथ्वीवर पहायला मिळाले. काही भागांत सुंदर अरोरा पहायला मिळाला, तर भारतात लडाखमध्ये रात्रीच्या वेळी आकाश लालभडक झालेलं दिसलं.

अशा प्रकारची सौर वादळं निर्माण होणं हा सूर्याच्या ‘सोलर सायकल’चा नियमित भाग आहे. नियमित अंतराने ते घडतच असतात. या सौर वादळांच्या दरम्यान सूर्यावर मोठे स्फोट होतात.

सूर्याचा पृष्ठभाग कधी शांत तर कधी वादळी अशा अवस्थांमधून ठराविक काळाने जात असतो. दर 11 वर्षांनी, सौरचक्राच्या शिखरावर, सूर्याच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवांवरील चुंबकीय क्षेत्र स्थान बदलते.

पण हे सोलर स्टॉर्म (Solar Storm) म्हणजेच सौर वादळ आणि सोलर फ्लेअर (Solar Flare) म्हणजे सौर स्फोट नेमके काय असतात? आणि त्याचा आपल्या आयुष्यातल्या रोजच्या गोष्टींशी काय संबंध आहे? जाणून घेऊयात.

सूर्य एक विद्युतभारित, तापलेल्या वायूचा गोळा असून सूर्य सौरमालेच्या केंद्रस्थानी आहे. या सौरमालेतील सर्व ग्रहांसाठी तो ऊर्जेचा स्रोत आहे. सूर्याच्या अस्तित्वामुळे पृथ्वीवरील जीवनासाठी अनुकूल वातावरण तयार होते.

सूर्य आकाशगंगेच्या केंद्राभोवती फिरतो आणि प्रखर चुंबकीय क्षेत्र तयार करतो. या चुंबकीय क्षेत्राची म्हणजेच मॅग्नेटीक फिल्डचं (Magnetic Field) एक चक्र (Cycle) असतं. याला सोलार सायकल (Solar Cycle) म्हटलं जातं. परिणामी सूर्याच्या पृष्ठभागावर काही काळ शांतता असते, तर काही काळ वादळी घडामोडी घडत असतात.

साधारण दर 11 वर्षांनी हे सौर चक्र सर्वात वरच्या पातळीवर पोहोचतं आणि त्यावेळी सूर्याच्या उत्तर आणि दक्षिण चुंबकीय ध्रुवांची अदलाबदल होते.

'अरोरा' (aurora) म्हणजेच 'ध्रुवीय प्रकाश' त्यांना 'नॉर्दर्न लाईट्स' किंवा 'सदर्न लाईट्स' असंही म्हणतात. (फाइल फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

तज्ज्ञांच्या मते आता सुरू असलेलं सौर चक्र 25 ची सुरुवात डिसेंबर 2019 मध्ये झालीय. या चक्राच्या सुरुवातीच्या टप्प्यात म्हणजेच सोलर मिनिमममध्ये सूर्यावर कमीत कमी डाग (Sunspots) दिसतात. हे ते काळे डाग असतात ज्यांच्या मदतीने संशोधक सूर्यावरच्या घडामोडी टिपत असतात.

सूर्यावरचा हा भाग आजूबाजूच्या भागाच्या तुलनेने कमी गरम असतो म्हणून हे सन स्पॉट्स गडद दिसतात. आणि या प्रत्येक डागाचा आकार पृथ्वीइतका किंवा त्याहीपेक्षा मोठा असतो.

YouTube पोस्टवरून पुढे जा

परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी ‘स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा’.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

सोलर मॅक्सिमम म्हणजे या चक्राचा मध्य, या काळात सूर्यावर सर्वाधिक सन स्पॉट्स असतात आणि याचवेळी चुंबकीय ध्रुवांची अदलाबदल होते. या काळात सोलर स्टॉर्म्सचं प्रमाण सर्वाधिक असतं.

नासा आणि US National Oceanic and Atmospheric Administration (NOAA) च्या मते सध्याच्या चक्रातला हा टप्पा 2024 मध्ये गाठला गेला असला तरी 2026 च्या संपूर्ण वर्षामध्येच सोलर अ‍ॅक्टिव्हिटीचं प्रमाण अधिक राहील.

सौर वादळ म्हणजे काय?

सौर वादळ म्हणजे सूर्याकडून सौरमालेमध्ये स्फोटामुळे येणारे सूक्ष्मकण, ऊर्जा, चुंबकीय क्षेत्र आणि इतर गोष्टी.

हे सौरवादळ का तयार होतं? तर सूर्यामुळे चुंबकीय क्षेत्राचा एक प्रचंड मोठा गुंता तयार होतो.

सूर्य फिरत असताना त्याचा वेग हा दोन टोकांच्या ध्रुवांपेक्षा मधल्या विषुववृत्ताच्या भागात जास्त असतो. त्यामुळे ही चुंबकीय क्षेत्रं एकमेकांत आणखीन गुरफटतात, त्यांना पीळ बसतो. इतका की ती ताणली जातात आणि तुटतात. आणि पुन्हा जुळतात. याला मॅग्नेटिक रिकनेक्शन (magnetic reconnection) असं म्हणतात.

पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात ऊर्जा फेकली जाते आणि सौर वादळ होतं. याच प्रचंड मोठ्या विस्फोटातून आणखीही काही गोष्टी तयार होऊ शकतात.

सौर फ्लेअर

फोटो स्रोत, Getty Images

याच प्रचंड मोठ्या विस्फोटातून आणखीही काही गोष्टी तयार होऊ शकतात.

  • अत्यंत प्रखर प्रकाश (Flash) – ज्याला म्हणतात सोलर फ्लेअर
  • किरणोत्सर्गाचं वादळ (Radiation Storm)
  • Solar Material असणारा एक महाकाय ढग ज्याला म्हटलं जातं Coronal Mass Ejection.
  • तर सूर्याकडून सातत्याने आपल्याकडे काही भारित कण (Charged Particles) येत असतात. त्याला सौर वारे (Solar Wind) म्हटलं जातं.

यातल्या ज्या सोलर फ्लेअर्स असतात, त्यांमध्ये सूर्यावर प्रकाश वा रेडिएशनचा प्रखर स्फोट होतो. त्यातून निर्माण होणाऱ्या फ्लॅशेसमध्ये X-Rays, गामा किरण, रेडिओ लहरी आणि अतिनील प्रकाश असतात.

सौर स्फोट हे सूर्यमालेमध्ये होणारे सर्वात शक्तीशाली स्फोट असतात. आणि अगदी शक्तीशाली सौर स्फोटांची तीव्रता ही काही अब्ज हायड्रोजन बॉम्ब्सइतकी असू शकते.

नासाच्या Solar Dynamics Observatory ने 4 फेब्रुवारीला अशीच एक प्रखर सोलर फ्लेअर टिपली. त्यापूर्वी 18 जानेवारीला, 30 जानेवारीलाही सूर्यावरचं सोलर फ्लेअर इरप्शन नासाने टिपलं.

सूर्य

फोटो स्रोत, NASA

हे स्फोट किती तीव्र आहेत त्यावर त्यांची विभागणी A, B, C, M आणि X अशी केली जाते. A म्हणजे अगदी सौम्य, पटकन दिसून न येणारे स्फोट. तर X म्हणजे सर्वात शक्तीशाली स्फोट.

सध्या नोंदवण्यात आलेल्या सोलर फ्लेअर या X प्रकारच्या – अतितीव्र आहेत.

या सोलर फ्लेअर सूर्यापासून प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतं आणि पृथ्वीवर फक्त 8 मिनिटांत पोहोचतं.

पण मग असं होणं नेहमीपेक्षा वेगळं आहे का? तर अशा सोलर फ्लेअर्स नेहमी निर्माण होत नसल्या, तरी अगदी दुर्मिळही नाहीत.

सूर्याच्या पृष्ठभागावरील हालचाल

फोटो स्रोत, Getty Images

गेल्या काही वर्षांमध्ये सूर्यावरच्या घडामोडींचं प्रमाण वाढलेलं आहे आणि सूर्याच्या नैसर्गिक चक्राचा हा भाग आहे. 2024 मध्ये या सोलर अॅक्टिव्हिटीने कळस गाठला होता, पण असं असलं तरी या वर्षामध्ये काही मोठ्या सौर घटना होण्याचा अंदाज मांडला जातोय.

आणि सूर्यावर घडणाऱ्या या सगळ्या गोष्टींचा आपल्या रोजच्या आयुष्यावर परिणाम होत असतो.

म्हणजे पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या सौरवादळामुळे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात अडथळा निर्माण होतो. याला Geomagnetic Storm म्हणतात. यामुळे रेडिओ संपर्क यंत्रणांमध्ये अडथळा येणं वीज पुरवठा खंडित होणं, GPS Navigation signals मध्ये अडथळा येणं अशा गोष्टी घडतात. अंतराळातले कृत्रिम उपग्रह आणि अंतराळवीरांना याचा धोका असतो.

सोलर रेडिएशनचा परिणाम एअरबस A320 च्या फ्लाईट कंट्रोलवर झाल्यामुळे फेब्रुवारी महिन्यातच एअरबसला तातडीने सॉफ्टवेअर अपडेट करावं लागलं होतं.

सोलर स्टॉर्म

फोटो स्रोत, Getty Images

2017 मध्ये दोन प्रचंड मोठ्या सोलर फ्लेअर्समुळे GPS यंत्रणा ठप्प झाली होती, तर 1989 मध्ये या सोलर फ्लेअरमुळे कॅनडाच्या क्युबेक भागात तब्बल ९ तास वीजपुरवठा खंडित झाला होता.

पण याच सौरवादळांमुळे पृथ्वीवर सुंदर Aurora दिसतात. ज्याला नॉदर्न लाईट्स किंवा सर्दन लाईट्स म्हटलं जातं.

या सौरवादळामुळे पृथ्वीवर थेट कुणालाही धोका नसतो. कारण आपल्या पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र आणि वातावरण आपलं सूर्याच्या या प्रकोपापासून संरक्षण करतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC