Source :- ZEE NEWS
Saifullah Khalid: ऑपरेशन सिंदूरनंतर भारत पाकमधला तणाव वाढतोच आहे. त्यातच आता पाकिस्तानमध्ये दहशतवादी सैफुल्लाह खालिदची हत्या झाली आहे. सैफुल्लाह हा लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर होता. सोबतच भारतातल्या अनेक हल्ल्यात त्याचा सहभागही होता.
अज्ञाताकडून गोळ्या झाडून हत्या
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदुरच्या मोहिमेतून भारताने अनेत दहशतवादी तळ उद्धवस्त केले..यात अनेक मोठ्या दहशतवाद्यांनाचा भारतीय लष्कराने खात्मा केला.दरम्यान भारतातील अनेक हल्ल्यात हात असलेल्या सैफुल्लाह खालिदची आता हत्या झालीये. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात दहशतवादी सैफुल्लाहची हत्या करण्यात आलीये. सैफुल्लाहची अज्ञाताने गोळ्या झाडून हत्या केल्याचं सांगितलं जातंय.
कोण आहे सैफुल्लाह?
सैफुल्लाह लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर होता. सैफुल्ला खालिद हा सैफुल्ला कसुरी या नावानेही ओळखला जायचा. हाफिज सईदचा खूप जवळचा मानला जायचा. जम्मू आणि काश्मीरमधील लष्कर
आणि टीआरएफच्या दहशतवादी कारवायांचा मुख्य चालक होता. सैफुल्लाह पूर्वी नेपाळमध्ये राहत होता, तो अलिकडेच पाकिस्तानला गेला होता. तो काठमांडूमधील पाकिस्तानी दूतावासाच्या संरक्षणाखाली राहत होता. लष्कर ए तोयबाच्या दहशतवादी कारवायांसाठी केडर उभे करणं तसेच आर्थिक मदत पुरवण्याचं काम तो करायचा.
भारतामधल्या तीन दहशतवादी हल्ल्यात सैफुल्लाहचा हात
भारतातील हल्ल्यात सैफुल्लाचा सहभाग होता. रामपूर येथे 2001 साली झालेला सीआरपीएफ कँपवरील हल्ल्यात सैफुल्लाहचा हात होता. 2005 साली झालेल्या बंगळुरू येथील इंडियन सायन्स काँग्रेसवर झालेल्या हल्ल्यामध्येही त्याचा सहभाग होता. 2006 साली झालेल्या नागपुरातील संघाच्या मुख्यालयावरील हल्ल्यातही सैफुल्लाचा सहभाग होता.
सैफुल्लाची हत्या कोणी केली?
लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर सैफुल्लाच्या खालिदची हत्या झालीये. भारताचा महत्वाचा शत्रू असलेल्या सैफुल्लाची हत्या आपल्यासाठी चांगलीच आहे. मात्र सैफुल्लाची हत्या कोणी केली, नेमके काय घडलं हे समोर येणंही महत्वाच आहे.
भारताच्या डिप्लोमॅटिक स्ट्राईकमुळे पाकिस्तानला धडकी
भारताच्या डिप्लोमॅटिक स्ट्राईकमुळे पाकिस्तानला धडकी भरलीय. भारत खासदारांचं शिष्टमंडळ विविध देशात पाठवणार आहे. आता बावचळलेला पाकिस्तान भारताची कॉपी करतोय. पाकिस्तानही आता भारतासारखं शिष्टमंडळ पाठवणार आहे. त्यामुळे आता प्रत्येक गोष्टीत पाकिस्तान भारताची कॉपी करत असल्याचं पाहायला मिळतंय. दहशतवादाविरोधात आपली भूमिका आणि पाकिस्तानच्या नापाक कारवाया जगासमोर ठेवण्यासाठी भारताने आपलं शिष्टमंडळ जगभरात पाठवण्याचा निर्णय घेतला. आता हे ऐकल्यावर गप्प बसेल तो पाकिस्तान कसला?मग आता पाकिस्तानने भारताची कॉपी करत पाकिस्तानी शिष्टमंडळही जगभरात पाठवण्याचा निर्णय घेतलाय. ऑपरेशन सिंदूर नंतर जगभरात झालेल्या बदनामीनंतर पाकिस्तानने आपली प्रतिमा वाचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय मंचावर संदेश देण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु केलाय. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी हे या शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहेत.
SOURCE : ZEE NEWS