Home world news marathi पाक तेरे तुकडे होंगे, जनता सरकारच्या पाठिशी, पाकचे 3 तुकडे करण्याची रेवंत...

पाक तेरे तुकडे होंगे, जनता सरकारच्या पाठिशी, पाकचे 3 तुकडे करण्याची रेवंत रेड्डी यांची मागणी

6
0

Source :- ZEE NEWS

Pahalgam Terror Incident : दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये केलेल्या हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे पाकिस्तानची देखील घाबरगुंडी उडाली आहे. मात्र, पाकिस्तानचे तीन तुकडे केल्याशिवाय त्यांची मस्ती उतरणार नसल्याची भावना देशभरातून व्यक्त करण्यात येत आहे. पाकिस्तानची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. तसंच पाकिस्तान त्यांच्याच देशातील अनेक भागांवर अन्याय करत असल्याचा देखील आरोप होत आहे. त्यामुळे पाकिस्तानमधील अनेक प्रांत आहेत जे पाकिस्तानपासून वेगळं होण्याची मागणी करत आहेत.

पाक तेरे तुकडे होंगे

बलूचिस्तान, खैबर पख्तूनख्वा, सिंध प्रांत, गिलिगिट भागातील विद्रोही वेगळ्या देशाची मागणी पाकिस्तानकडे करत आहेत. मात्र, आता पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारतात देखील पाकिस्तानचे तुकडे करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अनेक लष्करी तज्ज्ञांसह राजकीय नेते देखील पाकिस्तानचे तुकडे करण्याची मागणी करत आहेत. 1971 मध्ये इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन दुकडे करत बांगलादेश हा एक नवीन देशाची निर्मीती केली. त्याप्रमाणे पाकिस्तानचे अजून तुकडे पाडण्याची गरज असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

पाकचे 2 तुकडे, बांगलादेशची निर्मिती

1971 मध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध झालं. 3 डिसेंबर 1971 ते 16 डिसेंबर 1971 पर्यंत चाललेले हे युद्ध अवघ्या 13 दिवसांत संपलं.  या युद्धानंतर पाकिस्तामधून बांगलादेश या नवीन राष्ट्राची निर्मिती झाली. 1971 चे भारत-पाकिस्तान युद्ध, ज्याला बांगलादेश मुक्ती युद्ध असेही म्हणतात. पाकिस्तानमधून बांगलादेश वेगळा झाल्यानं पाकिस्तानचे दोन तुकडे झालेत. दरम्यान आत पाकिस्तानचे तीन तुकडे करण्याची मागणी होतेय. ही मागणी केवळ भारतातूनच नव्हे तर मागील अनेक वर्षापासून बलुचिस्तान आणि सिंध प्रांतमधील जनता देखील करतेय. बलुच आर्मी यासाठी मागील अनेक महिन्यांपासून पाकिस्तानला चांगलाच इंगा दाखवत आहे. 

बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला 

26 एप्रिलला क्वेटा जवळील मार्गट भागात बलोच आर्मीचा पाक सैन्यावर हल्ला

IED स्फोटात 10 पाकिस्तानी रेंजर्स जागीच ठार

स्फोटात पाकिस्तानी सैन्याचं एक वाहन उद्ध्वस्त

बलुचिस्तान आणि BLA चा इतिहास

भारत, पाकिस्तान फाळणीपासूनच स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी

बलुचिस्तानच्या संमतीशिवाय त्यांचा पाकिस्तानात समावेश

बलुचिस्तानमधील साधनसंपत्तीचा सर्वाधिक वापर पाकिस्तानात, बलुचकडे दुर्लक्ष 

बलुचिस्तानमध्ये लष्कर आणि जनतेतील संघर्ष जुना

बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यांसाठी अनेक संघटनांचा जन्म

70 च्या दशकात बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) ही सर्वात शक्तीशाली संघटना स्थापन 

पाक सरकारकडून BLA चा 2007 साली दहशतवादी संघटनांच्या यादीत समावेश

आजवर बलुच आर्मीचे पाकिस्तानवर असंख्य दहशतवादी हल्ले

मागच्याच महिन्यात 11 मार्चला बलोच आर्मीकडून पाकची पूर्ण रेल्वे हायजॅक

140 सैनिकांसह 450 प्रवासी ओलीस ठेवण्यात आले होते

या हल्ल्यात 18 पाक सैनिक, 33 हल्लेखोरांसह 64 लोकांचा मृत्यू झाला होता

भारत स्वतंत्र झाल्यानंतर पाकिस्तान वेगळा झाला. दरम्यान यानंतर पाकिस्तान नेहमीच भारताविरोधात काड्या करतो आहे. दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारतावर हल्ला करतोय. मात्र, पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे अजून तुकडे करण्याची मागणी होतेय. कारण बांगलादेशसारखं अजूनही पाकिस्तानमधील अनेक प्रांत वेगळी होण्याची मागणी करत आक्रमक झाले आहेत.

SOURCE : ZEE NEWS