Home world news marathi अमेरिकेत भारतीय उद्योजकाचा पत्नीसह मुलाचा संशयास्पद मृत्यू; घराच्या खिडकीवर रक्ताचे डाग अन्...

अमेरिकेत भारतीय उद्योजकाचा पत्नीसह मुलाचा संशयास्पद मृत्यू; घराच्या खिडकीवर रक्ताचे डाग अन् काडतुसे….; गूढ उकलेना

5
0

Source :- ZEE NEWS

Mysuru Techie Kills Self: मैसूर येथील उद्योजकाचा आणि त्याच्या पत्नी व मुलाचा अमेरिकेत मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उद्योजकानेच पत्नी व मुलाची हत्या करुन नंतर आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अमेरिकेतील त्यांच्या घरातच ही घटना घडली आहे. 24 एप्रिल रोजी अमेरिकेतील न्यूकॅसल वॉशिंग्टन येथे ही घटना घडली आहे. 

हर्षवर्धन किक्करी असं उद्योजकाचे नाव असून पत्नी श्वेता पनयम आणि त्यांचा 14 वर्षांचा मुलगा यांचा मृत्यू झाला आहे. तर, या दाम्पत्याचा आणखी एक मुलगा असून घटनेच्या वेळी तो घराबाहेर होता. हर्षवर्धन किक्केरी मैसूर येथील रोबोटिक्स कंपनी HoloWorld चे सीईओ होते. तर, त्यांची पत्नी कंपनीची सह-संस्थापक होती. हर्षवर्धन यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट असून किंग काउंटी पोलीस शोध घेत आहेत. 

गुरुवारी रात्री पोलिसांना 911 वर फोन आला होता. त्यानंतर पोलिस किक्केरी यांच्या राहत्या घरी पोहोचले. पोलिसांच्या रिपोर्टनुसार, किक्केरी यांचा 7 वर्षांचा मुलगा घराबाहेर होता म्हणून तो बचावला. या घटनेची पोलिस सखोल चौकशी करत आहेत. पोलिसांना खिडकीवर रक्ताचे डाग आढळले असून तिथेच खाली काडतूसदेखील सापडले आहेत. किक्केरी यांच्या आत्महत्येचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. 

कोण आहे हर्षवर्धन किक्केरी?

कर्नाटकच्या किक्केरी गावाचे मुळ रहिवाशी असलेल्या हर्षवर्धन किक्केरी यांनी मैसूर आणि अमेरिकेत शिक्षण पूर्ण केले होते. त्यांनी सिरैक्यूज विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधून मास्टर्स केले होते. त्यानंतर मायक्रोसॉफ्टमध्ये काम करुन रोबोटिक्सवर विशेष लक्ष दिले. ते 44 अंतरराष्ट्रीय पेटेंट धारक होते. त्यांनी मायक्रोसॉफ्टमध्ये गोल्ड स्टार, इन्फोसिसचे एक्सीलेंस अवॉर्ड मिळाले होते. तसंच, भारत पेट्रोलियम स्कॉलरशिप आणि अनेक बुद्धिबळाच्या स्पर्धेत बक्षीसे मिळवले होते. किक्केरी आणि त्यांची पत्नींनी 2017मध्ये स्वतःची कंपनी उभारली होती. मात्र, कोविड साथीनंतर 2022 मध्ये ते पुन्हा अमेरिकेत परतले होते. 

SOURCE : ZEE NEWS