Home LATEST NEWS ताजी बातमी परेश रावल यांचा दावा, ‘लघवी प्यायल्यानं झाले बरे’, खरोखरंच यामुळे आजार बरा...

परेश रावल यांचा दावा, ‘लघवी प्यायल्यानं झाले बरे’, खरोखरंच यामुळे आजार बरा होतो का?

4
0

Source :- BBC INDIA NEWS

परेश रावल

फोटो स्रोत, Getty Images

अभिनेते आणि भारतीय जनता पार्टीचे नेते परेश रावल यांचं एक वक्तव्यं सोशल मीडियावर गेल्या दोन दिवसांपासून व्हायरल होतं आहे.

हा व्हायरल व्हिडिओ परेल रावल यांनी ‘इंडिया टुडे’ समूहाला दिलेल्या मुलाखतीचा आहे. यात परेल रावल दावा करत आहेत की त्यांच्या गुडघ्याला दुखापत झाली होती.

ती दुखापत बरी होण्यासाठी ते स्वत:चीच लघवी प्यायले होते. असं केल्यामुळे त्यांना फायदा झाला आणि बरं वाटू लागलं.

स्वत:चीच लघवी पिण्याबद्दल बोलणारे परेश रावल हे काही पहिलेच व्यक्ती नाहीत. याआधी माजी पंतप्रधान मोरारजी देसाई हेदेखील स्वत:ची लघवी पिण्याबद्दल बोलले आहेत. या गोष्टीचा उल्लेखदेखील परेश रावल यांनी या मुलाखतीत केला.

मात्र डॉक्टर सिरिएक एबी फिलिप्स यांनी परेश रावल यांचा हा दावा खोडून काढला आहे. ते सोशल मीडियावर ‘द लिव्हर डॉक’ या नावानं प्रसिद्ध आहेत. डॉक्टर सिरिएक एबी फिलिप्स म्हणाले, “लघवी प्यायल्यामुळे नुकसान होईल.”

याशिवाय सोशल मीडियावरील इतर युजरदेखील परेश रावल यांच्या दाव्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. अनेकांनी लिहिलं आहे की परेश रावल त्यांच्या वक्तव्यानं तरुणांची दिशाभूल करत आहेत.

परेश रावल यांचा दावा योग्य आहे की चुकीचा? यासंदर्भात आम्ही डॉक्टरांशी बोललो. मात्र त्याआधी परेश रावल नेमकं काय म्हणाले ते पाहूया.

परेश रावल काय म्हणाले?

परेश रावल म्हणाले, “राजकुमार संतोषी यांच्या ‘घातक’ या चित्रपटाच्या चित्रीकरण मुंबईत सुरू होतं. त्यावेळेस फरफरट नेण्याच्या दृश्याच्या वेळेस ते गुडघ्यावर पडले होते. चित्रीकरण स्थळाच्या मागच्या बाजूलाच नानावटी हॉस्पिटल होतं.”

“त्यावेळेस वीरू देवगण (अभिनेते अजय देवगण यांचे वडील आणि स्टंट मास्टर) नानावटी हॉस्पिटलमध्ये कोणाला तरी भेटायला आले होते.”

परेश रावल म्हणाले, “हॉस्पिटलमध्ये वीरू देवगण यांची भेट झाल्यावर त्यांनी मला सल्ला दिला की सकाळी उठल्यावर आधी स्वत:ची लघवी प्या. सर्व फायटर (स्टंटमॅन) असंच करतात. असं केल्यानं कोणताही त्रास राहणार नाही आणि काहीही होणार नाही.”

परेश रावल

फोटो स्रोत, Getty Images

“दुसऱ्या दिवशी सकाळी मी स्वत:च्या मनाची तयारी केली. मी विचार केला की लघवी प्यायची आहे तर मी ते लगेचच आटोपणार नाही, बियरसारखं आरामात पिईन.”

ते पुढे म्हणाले, “15 दिवस मी असं केलं. त्यानंतर जेव्हा एक्स-रे चा रिपोर्ट आला, तो पाहून डॉक्टर आश्चर्यचकीत झाले. डॉक्टरांना एक्स-रे वर पांढरी लायनिंग दिली.”

परेश रावल यांनी दावा केला की जी दुखापत बरी होण्यास किंवा आपण काम करण्यायोग्य होण्यासाठी सर्वसाधारणपणे दोन ते अडीच महिने लागतात, तीच दुखापत दीड महिन्यातच बरी झाली.

परेश रावल म्हणाले की स्वत:चीच लघवी पिण्याच्या या थेरेपीला ‘शिवाम्बू’ म्हणतात. मात्र डॉक्टरांनी बीबीसीला सांगितलं की परेश रावल यांचा दावा योग्य नाही.

लघवी पिण्याबद्दल डॉक्टर काय म्हणाले?

स्वत:चीच लघवी प्यायल्यानं शरीराला काही फायदा होतो का? डायटीशियन दिब्या प्रकाश आणि मारेंगो एशिया हॉस्पिटल्समधील डॉक्टर संजय कुमार अग्रवाल यांनी हा दावा खोडून काढला.

संजय कुमार अग्रवाल म्हणाले, “स्वत:चीच लघवी प्यायल्यानं कोणताही आजार बरा होत नाही. लघवी हा शरीरातील वेस्ट प्रॉडक्ट म्हणजे टाकाऊ पदार्थ असतो. टाकाऊ पदार्थ वापरात आणण्यासाठी नसतो.”

“म्हणूनच शरीर ते बाहेर फेकत असतं. लघवी प्यायल्यानं फायदा तर होणार नाही, उलट त्यामुळे आरोग्याला अपाय होऊ शकतो.”

आपलं शरीर लघवीद्वारे टाकाऊ पदार्थ किंवा कचरा बाहेर टाकत असतं.

दिब्या प्रकाश म्हणाले, “लघवी प्यायल्यानं फायदा होतो, असं दाखवणारं कोणतंही वैज्ञानिक संशोधन नाही.”

दिल्लीतील डॉक्टर अनिल कुमार भाटिया यांनी बीबीसीला सांगितलं, “स्वत:चीच लघवी प्यायल्यानं फायदा होतो, याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.”

डॉ. सिरिएक एबी फिलिप्स यांनी एक्स या सोशल मीडियावर लिहिलं, “कोणाच्या तरी सांगण्यावरून स्वत:ची किंवा दुसऱ्या लघवी पिऊ नये. लघवी प्यायल्यानं शरीराचा फायदा होतो, याचे कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत.”

“खरं तर लघवी पिणं खूपच अपायकारक आहे. लघवी प्यायल्यामुळे जिवाणू, टॉक्सिन्स (दूषित पदार्थ) आणि अनेक प्रकारचे अपायकारक घटक रक्तात जाऊ शकतात.”

“आपली मूत्रपिंडं लघवीवाटे शरीरातून टॉक्सिक किंवा अपायकारक पदार्थ बाहेर काढण्यासाठी खूप परिश्रम करतात. लघवी पिऊन त्या प्रक्रियेचा अपमान करू नये.”

मोरारजी देसाई

फोटो स्रोत, Getty Images

मोरारजी देसाई यांची लघवी पिण्याची सवय

रॉ या भारतीय गुप्तचर संस्थेचे माजी अधिकारी बी. रमन यांनी ‘काऊ बॉइज ऑफ रॉ’ हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात बी. रमन यांनी माजी पंतप्रधान मोरारजी देसाई स्वत:चीच लघवी पितात, या गोष्टीचा उल्लेख केला आहे.

बी. रमन यांनी पुस्तकात लिहिलं आहे, “1978 मध्ये मोरारजी देसाई फ्रान्सला सरकारी दौऱ्यानिमित्त गेले होते. तिथे त्यांचा मुक्काम भारताचे राजदूत आर. डी. साठे यांच्या घरी होता.”

“मोरारजी देसाई जेव्हा दिल्लीला परत गेले, तेव्हा मी (रमन) साठे साहेबांच्या घरी गेलो. त्यांचा नोकर जेव्हा ड्रिंक्स देत होता, तेव्हा राजदूतांच्या पत्नीनं त्याला विचारलं की तू नव्या ग्लासांचा वापर करतो आहेस ना.”

“मग त्या माझ्याकडे वळून म्हणाल्या, मोरारजी देसाई स्वत:ची लघवी पिण्यासाठी कोणत्या ग्लासाचा वापर करत होते, हे मला माहीत नाही. त्यामुळे मी सर्व जुने ग्लास फेकून देण्यास सांगितलं आहे.”

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC