Home world news marathi अर्धा पाकिस्तान भारताच्या महाशक्तीशाली क्षेपणास्त्रांच्या रेंजमध्ये; भारताने ठरवलं तर…

अर्धा पाकिस्तान भारताच्या महाशक्तीशाली क्षेपणास्त्रांच्या रेंजमध्ये; भारताने ठरवलं तर…

6
0

Source :- ZEE NEWS

Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.  पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. भारत त्यांच्यावर मोठा हल्ला करू शकतो अशी भिती पाकिस्तानला वाटत आहे. काही धोरणात्मक निर्णय घेऊन भारताने पाकिस्तानचे कंबरडे मोडले आहे. मात्र, भारत पाकिस्तानविरोधात कोणती मोठी लष्करी कारवाई करणाप याची योजना उघड झालेल्या नाही. भारताकडे अशी अनेक शक्तिशाली क्षेपणास्त्रे आहेत जी पाकिस्तानमध्ये विनाश घडवून आणू शकतात. 

भारताकडे अशी दोन क्षेपणास्त्रे आहेत जी पाकिस्तानमध्ये मोठा विध्वंस घडवू शकतात. पाकिस्तानची प्रमुख शहरे भारतापासून अवघ्या काही अंतरावर आहेत. पाकिस्तानतील ही दोन्ही प्रमुख शहरे क्षेपणास्त्रांच्या रेंजमध्ये येतात. अमृतसर आणि लाहोर हे अंतर 55 किमी आहे. अमृतसर ते इस्लामाबाद अंतर 287 किमी आहे. तर, भुज ते कराची अंतर 325 किमी आहे. त्यामुळे भारत अगदी सहज  हल्ला करु शकतो. 

भारताने अग्नि- 5 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. या क्षेपणास्त्रात 55000 किमी पेक्षा जास्त अंतरावरील टार्गेटवर हल्ला  करण्याची क्षमता आहे.  स्वतःसोबत अण्वस्त्रे वाहून नेण्यास देखील हे सक्षम आहे. पाकिस्तानातील जवळजवळ सर्व प्रमुख शहरे अग्नि-5 क्षेपणास्त्राच्या रेंजमध्ये आहेत. युरोप आणि आफ्रिकन खंडातील काही भागांनाही ते लक्ष्य करू शकते यावरून याच्या श्रेणीचा अंदाज लावू शकतो. 

ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्र भारत आणि रशियाने संयुक्तपणे विकसित केले आहे. याची खासियात म्हणजे लक्ष्य हलले तरी ते त्याचा पाठलाग थांबवत नाही. ब्रह्मोस क्षेपणास्त्राची सुरुवातीची मारा क्षमता 290 किमी आहे. तथापि, त्याची मर्यादा 500 किमी पर्यंत वाढवता येते. अनेक देशांनी भारताकडून हे क्षेपणास्त्र खरेदी केले आहे. भारत ब्रह्मोस हायपरसोनिक क्षेपणास्त्र विकसित करत आहे. त्याची रेंज 1500 किमी पर्यंत असू शकते.

SOURCE : ZEE NEWS