Home world news marathi पाकिस्तानसोबतचे संबंध तुटल्यानंतर भारतीयांच्या थेट किचनवर होणार परिणाम!

पाकिस्तानसोबतचे संबंध तुटल्यानंतर भारतीयांच्या थेट किचनवर होणार परिणाम!

5
0

Source :- ZEE NEWS

Which Things Will Get Expensive After India-Pakistan Trade : 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानचे संबंध हे खराब होत आहेत. या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये आलेल्या टुरिस्टवर निशाणा साधत त्यांच्यावर गोळी झाडत हत्या केली. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी 26 टुरिस्टची हत्या केली आणि काही लोकांना दुखापत झाली. या हल्ल्यानंतर पाकिस्तान विरोधात भारत सरकारनं अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे आता भारत आणि पाकिस्तानच्या बाजारपेठेवर या सगळ्याचा परिणाम पाहायला मिळणार आहे. जर आपले संपूर्ण संबंध संपले तर कोणत्या गोष्टी या महागणार याविषयी जाणून घेऊया.

परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार स्थगित करण्यात आला आहे. त्यासोबत भारत सरकारनं पाकिस्तानच्या रहिवाशांसाठी असलेल्या सार्क व्हीजाला देखील पूर्णपणे रद्द केलं आहे. तर सरकारनं पाकिस्तानचे जे नागरिक हे SVES व्हीजाच्या अंतर्गत आता भारतात आहेत, त्यांना 48 तासात देश सोडण्याचे आवाहन दिले. त्याशिवाय भारतानं पाकिस्तानच्या ऑफिशियल एक्स अकाऊंटला देखील बॅन केलं आहे. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानचे सगळे संबंध हे संपत आले आहेत. सरकारनं घेतलेल्या या मोठ्या निर्णयांनंतर भारत आणि पाकिस्तानच्या सगळ्या व्यापारांवर त्याचा परिणाम पाहायला मिळणार आहे. भारत-पाकिस्तानमधील नातं खराब होत असताना भारतात अनेक गोष्टी महाग होण्याची शक्यता आहे. 

ड्रायफ्रुट्स

भारत पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात ड्रायफ्रुट्स खरेदी करतो. ड्रायफ्रुट्सची मागणी भारतीय बाजारात खूप जास्त आहे. अशात पाकिस्तानसोबत व्यापारी संबंधांवर परिणाम झाल्यानं भारतात ड्रायफ्रुट्सच्या किंमतीवर बदल होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ ड्रायफ्रुट्स हे महाग होण्याची शक्यता आहे. 

सेंधव मीठ

त्याशिवाय पाकिस्तानमधून भारतात मोठ्या प्रमाणात सेंधव मीठ खरेदी करण्यात येतं. भारतात येणार सेंधव मीठ हे पूर्णपणे पाकिस्तानमधून येतं. त्याचं कारण म्हणजे पाकिस्तान त्या देशांपैकी एक आहे जिथे सगळ्यात जास्त सेंधव मीठाचं उत्पादन करण्यात येतं. त्यामुळे भारतात मीठाची किंमत वाढण्याची शक्यता आहे. 

ऑप्टिकल लेन्स

भारतात वापरण्यात येणाऱ्या चष्मांची ऑप्टिकल लेन्स ही पाकिस्तानमधून खरेदी करण्यात येते. इथे बनवण्यात येणाऱ्या ऑप्टिकल्सची भारतीय बाजारात खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आता सरकारच्या निर्णयानंतर ऑप्टिकल लेन्स देखील महागण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा : 90 कोटींचं बजेट सलमानच्या ‘या’ चित्रपटाचं पहलगाममध्ये झालं शूटिंग; कश्मीरमध्ये बनवलं ‘खोटं’ पाकिस्तान

त्यासोबत पाकिस्तानमधून भारतात फळं, सीमेंट, मुलतानी माती, कॉटन, स्टील आणि चामड्याच्या सामानाची आयात करण्याक येते. भारत पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणात अनेक गोष्टींची आयात करतो. त्यामुळे आता जवळपास सगळ्याच गोष्टी या महागण्याची शक्यता आहे. 

SOURCE : ZEE NEWS