Source :- ZEE NEWS
Lab Leak Theory: संपूर्ण जगाला अनिश्चिततेच्या गर्त छायेत लोटणाऱ्या कोरोना काळाची आणि या महामारीच्या संकटाची आठवण झाली की अनेकांचाच थरकाप उडतो. 2019 च्या अखेरीस जगभरात थैमान घालण्या सुरुवात केलले्या या महामारीची सुरुवात चीनच्या वुहान शहरापासून झाली असं म्हटलं गेलं आणि त्यासोबतच या विषाणूची उत्पत्ती एका प्रयोगशाळेतून झाल्याचे संदर्भसुद्धा चर्चेचा विषय ठरले. अमेरिकेच्या व्हाईट हाऊसनं पुन्हा एकदा या मुद्द्याला हवा दिली असून, राष्ट्राध्यक्ष कार्यालयाच्या अधिकृ संकेतस्थळावर एक नवं पेजही या देशानं सुरू केलं आहे.
अमेरिकेकडून जारी करण्यात आलेल्य़ा या पेजवर चीनच्या वुहान शहरातील लॅबलाच या विषाणूच्या उत्पत्तीमागचं मूळ संबोधत माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि अँथनी फाऊची यांच्यावर हे सत्य दडवून ठेवण्याचा प्रयत्न करण्याचा गंभीर आरोप केला. ज्यामुळं या दाव्यानं पुन्हा एकदा कोरोनाच्या मुद्द्यावरून सारं जग हादरलं आहे.
व्हाईट हाऊसच्या वेबसाईटवरील LAB LEAK: The True Origins of COVID 19 या नव्या पेजवर एक बॅनर लावण्यात आलं आहे. जिथं डॉ फाउची आणि बायडेन यांच्या सांगण्यावरून अमेरिकेतील यापूर्वीच्या सरकारनं कोरोनाच्या उत्पत्तीसंदर्भातील संवेदनशील माहिती पडद्याआड ठेवत इतकी वर्षे चुकीची माहिती पसरवल्याचा दावा केला.
व्हाईट हाऊसनं नुकत्याच जारी केलेल्या अधिकृत पत्रकानुसार आणि या संकेतस्थळानुसार कोविडची सुरुवात कुठून झाली आणि कशा पद्धतीनं लोकशाही नेत्यांनी आणि माध्यमांनी पर्यायी उपचारपद्धती आणि प्रयोगशाळेतील विविध सिद्धांतांना चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न केला यावर प्रकाश टाकला आहे. या पेजवर The Proximal Origin of SARS CoV 2 नावाच्या एका अहवालाचा उल्लेख करम्यात आला आहे. डॉ फाउची यांनीच हा अहवाल पुढे केल्याचं म्हटलं जात आहे.
अमेरिकेनं जगापुढं आणलेले काही ठळक मुद्दे खालीलप्रमाणे…
– पेजवर देण्यात आलेल्या माहितीनुसार या विषाणूमध्ये अशी जैविक रचना आणि विशेषता आहे, जी नैसर्गिकरित्या आढळत नाही.
– सर्व संक्रमणांची सुरुवात एकात स्त्रोतापासून झाली आणि यापूर्वीच्या महामारीमध्ये मात्र अशी परिस्थिती नव्हती.
– वुहानच्या ज्या प्रयोगशाळेची इथं चर्चा होतेय तिथं याआधी कोणत्या सुरक्षित उपाययोजनांशिवायच काही जनुकिय प्रयोग आणि संशोधनं केली जात होती.
– या प्रयोगशाळेत काम करणारे संशोधक 2019 च्या अखेरपासूनच कोविडसारख्या लक्षणांसह आजारी होते.
– या विषाणूची उत्पत्ती नैसर्गिकरित्या झाली आहे असं सिद्ध करणारा कोणताही वैज्ञानिक सिद्धांत अद्याप सापडलेला नाही.
SOURCE : ZEE NEWS