Source :- ZEE NEWS
Pakistan’s Strange Law : भारतात जिथं अनेक गोष्टींची मोकळीक आहे, तिथं पाकिस्तानमध्ये काही नियम इतके विचित्र आहेत की ज्यांच्याविषयी ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही. आता तुम्ही देखील असाच विचार करत असाल की नेमकं काय आहे, तर चला तर मग जाणून घेऊया पाकिस्तानमधील 7 अजब-गजब गोष्टी…
1. गर्लफ्रेंड ठेवण्यास मनाई
भारतासारख्या देशात जिथं लीव्ह-इन रिलेशनशिपलाही कोर्टाची परवानगी आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानमध्ये मात्र, गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड बनवणंच कायद्याच्या विरोधात आहे. लग्नाशिवाय कोणी मुलगा-मुलगी एकत्र राहू शकत नाहीत. त्यामुळे तिथं नात्यांबाबत फार कडक बंधनं आहेत.
2. शिक्षणावरही लागतो टॅक्स
शिकण्यासाठी पैसे खर्च करणं सगळीकडे सामान्य गोष्ट आहे, पण पाकिस्तानमध्ये जर शिक्षणावर वार्षिक 2 लाखाहून अधिक खर्च झाला, तर त्यावर ५% टॅक्स द्यावा लागतो. भारतात मात्र, सरकारी शाळांमध्ये शिक्षण जवळपास मोफत आहे. इतकंच नाही तर खासगी शिक्षणासाठी लागणारा खर्च टॅक्स डिडक्शनमध्ये टाकता येतो.
3. इस्रायलला जाण्यास मनाई!
पाकिस्तानी नागरिकांना इस्रायलमध्ये जाण्याची परवानगी नाही. खरंतर, पाकिस्तान सरकार आपल्या नागरिकांना इस्रायलला जाण्यासाठी व्हिसा देत नाही. यामागील कारण म्हणजे पाकिस्तानने इस्रायलला देशाचा दर्जा दिलेला नाही, म्हणजेच पाकिस्तान त्याला देश मानत नाही.
4. दुसऱ्याचा मोबाईल न विचारता हात लावणं हा गुन्हा
आपल्याकडे अनेकदा आपण सहज कुणाचाही फोन उचलतो, पण पाकिस्तानमध्ये हे केल्यास तुम्हाला थेट जेलमध्ये जावं लागू शकतं. इथं नियम असा आहे की जर तुम्ही कोणाच्या परवानगीशिवाय फोन हाताळला, तर 6 महिनेपर्यंतची शिक्षा होऊ शकते.
5. पंतप्रधानांची थट्टा केली, तर शिक्षा!
पाकिस्तानात देशाच्या पंतप्रधानांची थट्टा करणं कायदेशीर गुन्हा आहे. सोशल मीडियावर एखादं मीमही शेअर केलं, तर शिक्षा होऊ शकते.
6. काही धार्मिक शब्दांचा इंग्रजी ट्रान्सलेशन कायदेशीर गुन्हा!
‘अल्लाह’, ‘मस्जिद’, ‘रसूल’ किंवा ‘नबी’ यांसारख्या शब्दांचा इंग्रजीत अनुवाद करणं पाकिस्तानात गुन्हा मानला जातो. असं केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
7. रमजानमध्ये बाहेर खाणं टाळाच
रमजानच्या काळात तुम्ही मुस्लिम असलात किंवा नसलात तरीसुद्धा बाहेर खाणं टाळावं लागतं. त्या काळात बहुतांश हॉटेल्स आणि फूड स्टॉल्स बंदच असतात.
(Disclaimer – वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही.)
SOURCE : ZEE NEWS